Home Authors Posts by दिनकर गांगल

दिनकर गांगल

422 POSTS 0 COMMENTS
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

घरकुल – समाजाच्या स्वायत्ततेचे लक्षण (Gharkul – An Autonomous Community !)

भारतात विशेषत: महाराष्ट्रात एक माणूस – एक संस्था अशी घट्ट परंपरा आहे; त्याच वेळी, संस्थाजीवन हे त्या त्या संस्थांमध्ये गुंतलेल्या ध्येयप्रवृत्त माणसांच्या पलीकडे बहरले पाहिजे असेही समाजाला वाटत असते, ‘काडी काडी वेचताना...’ हे अविनाश बर्वे यांचे पुस्तक वाचत असताना या दोन्ही समजुतींचा प्रत्यय येतो आणि विचाराला टोक येऊ शकते. डोंबिवलीजवळच्या खोणी येथील ‘घरकुल’ या त्यांच्या संस्थेची कहाणी ‘काडी काडी वेचताना...’ या पुस्तकात आहे...

माधव सावरगावकर यांच्या औद्योगिक बोधकथा

नाशिक जिल्ह्यातील छोट्या गावचा अर्धशिक्षित मुलगा मुंबईत येतो आणि छोटीमोठी कामे करत एका कंपनीत कामगाराची नोकरी पत्करतो. सतत रात्रपाळी करून बी कॉम, एलएल बी, एमएलएस होतो आणि कामाच्या ठिकाणी प्रगती करत जातो. व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेऊन त्याच कंपनीत पर्सोनेल अधिकारी होतो आणि त्या ठिकाणी एका टप्प्यावर त्याच्या गुणांना अटकाव बसतो, तेव्हा कंपनी बदलून नव्या नोकरीत जातो. अंतिमत: अमेरिकन फायझर (भारत) औषध कंपनीत एक संचालक या पदावर स्थिरावतो. ही कहाणी आहे माधव सावरगावकर या कर्तबगार व्यक्तीची...

तालुक्या तालुक्यांतील नवजागरण! (Renaissance like movement in the villages of Maharashtra)

महाराष्ट्र हा प्रदेशच कर्तृत्वाचा आहे हे गेल्या आठशे-हजार वर्षांचा इतिहास सांगतो. त्याचे कारण महाराष्ट्र हा प्रदेश संमिश्रतेचा आहे – संकराचा आहे; देश-परदेशांतून आलेल्या स्थलांतरितांचा आहे. तो महानुभावांचा आहे, ज्ञानेश्वरांचा आहे, शिवाजीमहाराजांचा आहे...

राज्याचे भाषासंस्कृती धोरण (Maharashtra State’s Language & Cultural Policy)

4
महाराष्ट्राचे मराठी भाषाधोरण व संस्कृतिधोरण सतत काही महिने चर्चेत असे. आता तो मुद्दा साहित्य-संस्कृती क्षेत्रातून हद्दपार झालेला दिसतो. एवढे ते विश्व सोशल मीडियाने व्यापले आहे आणि त्यांचे त्यांचे ग्रूप आत्ममग्न होऊन गेले आहेत.

(मराठी) भाषेला पर्याय आहे! (The Possibility of Visual Language)

1
मी ‘मराठी भाषेचा लढा’ असे शीर्षक या लेखास आरंभी दिले होते; इतकी या विषयाची सवय गेल्या चाळीस-पन्नास वर्षांत होऊन गेली आहे! मी ते लिहिले आणि माझे मला हसू आले. तो विषय हास्यास्पद झाला आहे का?

इंटरनेटवरील मराठी लेखनाबाबत (Writing Marathi for Internet few Tips)

3
इंटरनेटवरील वाचनासाठी मराठीचे नवे रूप विकसित होणे गरजेचे आहे असे जाणवते. तेथे जगभरचे वाचक असणार, त्यामुळे लेखनातील स्थानिक संदर्भ व संपर्क आणि लकबी यांचे प्रमाण कमी करावे लागेल...

मुहूर्त मराठी विद्यापीठाचा – उद्देश संस्कृतिसंवर्धनाचा (Appeal for Marathi language university)

1
जागतिकीकरणाच्याकाळात मराठी  समाजाच्या वृत्तिप्रवृत्ती, स्वभावविशेष, सवयी, इच्छाआकांक्षा जपल्या तर जाव्यातच; पण त्याबरोबर त्यांना जागतिक चित्रात अढळ व अव्वल स्थान मिळावे ही भावना स्वाभाविक आहे. त्यासाठी विविध सूचना-योजना येत गेल्या. ‘मराठी विद्यापीठ’ ही त्यांपैकी एक. पण ‘मराठी विद्यापीठ’ या नावात जादू आहे.

विजय मायदेव – वैमानिकाचे रोमहर्षक आयुष्य (Wing Commander Vijay Maydeo from Air back to...

4
विंग कमांडर विजय मायदेव यांची कारकीर्द वैमानिक म्हणून हवेत गेली – ते प्रथम भारतीय हवाई दलात लढाऊ विमानांचे वैमानिक म्हणून आणि नंतर एअर इंडियाचे विशेष मोहिमांवरील वैमानिक म्हणून.

सुरेश लोटलीकर याची अर्कचित्रे (Caricaturist Suresh Lotlikar)

3
सुरेश लोटलीकर हा हौशी व्यंगचित्रकार आहे. त्याचे विचार प्रगल्भ असतात आणि टिप्पणी मार्मिक. त्यामुळे तो अचूक वर्म पकडून व्यक्तीचे वा घटनेचे मर्म सूक्ष्मतेने चितारून टाकतो. त्या दृष्टीने त्याची राजकीय व्यंगचित्रे व अर्कचित्रे पाहण्यासारखी आहेत.

अभय ओक यांनी मांडली कायद्याची बाजू (Justice Oak Speaks On Law and Order)

ठाण्याचे अभय ओक कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बंगलोरला गेले आहेत. ओक यांचे शिक्षण ठाण्याच्याच मो.ह. हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. त्या शाळेने ओक यांचा हृद्य सत्कार 2020 सालच्या आरंभी घडवून आणला.