Home Authors Posts by दिनेश अडावदकर

दिनेश अडावदकर

2 POSTS 0 COMMENTS
कर्जतचे दिनेश अडावदकर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रामध्ये ज्येष्ठ निवेदक आहेत. दिनेश हे कॉमर्स पदवीधर. त्यांनी त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मुंबई विद्यापीठातून मराठी विषयात एम ए शिक्षण पूर्ण केले. त्यांनी दूरदर्शनसाठी काही मालिकांचे निवेदन केले आणि काही मुलाखतीसुद्धा घेतल्या. दिनेश ह्यांना आवाजाच्या क्षेत्रातील ’स्वराभिनय’ हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बोरिवली शाखेतर्फे 2016 मध्ये मिळाला. त्यांचा ’माझे इंद्रधनू’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. लेखकाचा दूरध्वनी 9869533983

आपली प्रिय माय मराठी…

आकाशवाणीच्या मुंबई अस्मिता केंद्रावर ‘जगुया आनंदी’ नावाचा कार्यक्रम सकाळी साडेसहा वाजता प्रसृत होतो. केंद्राच्या निवेदकांवर ती जबाबदारी असते. त्यांनीच तो लिहायचा व सादर करायचा. त्या वेळी पूर्वी ‘चिंतन’ नावाखाली पाच मिनिटांचे पाहुण्या विचारवंतांचे ध्वनिक्षेपित भाषण होत असे. त्याला पर्याय म्हणून निवेदकांमार्फत तयार झालेला हा हलकाफुलका ‘गुड मॉर्निंग’ म्हणावे असा कार्यक्रम आहे. तो त्या त्या दिवसाचे निवेदक त्यांच्या प्रकृतीप्रमाणे निभावून नेतात, पण कधी कधी, त्यावर प्रासंगिक निमित्ताने पण स्थायी स्वरूपांचे निवेदन कानी पडते. तसाच प्रकार दिनेश अडावदकर यांच्याकडून एका सकाळी घडून आला. येथे तो उद्धृत करत आहोत...

मेळघाटातील पोषणबागांचा माळी – मनोहर खके

पोषण बागेद्वारे कुपोषणावर मात करण्याचा अनोखा प्रयोग मेळघाटातील कुपोषण हटवण्याच्या व तेथील जनतेच्या विकासाच्या कार्याला आपापल्यापरीने दिशा देण्याचे काम व्यक्तीगत पातळीवर काही लोकांनी केले आहे....