1 POSTS
दिलीप मुरलीधर देशपांडे हे मुक्त लेखक आहेत. ते जळगाव जिल्हा बँकेत विभागीय उपव्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले. त्यांचे 'सारांश' व 'व्यथा बळीराजा'च्या हे दोन लेखसंग्रह प्रकाशित आहेत. त्यांनी सामाजिक, साहित्यिक, राजकीय, आध्यात्मिक विषयांवर लेखन व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचा 'ग्रंथाली वाचक चळवळी'त सहभाग होता.
जामनेर हा जळगाव जिल्ह्यातील एक प्रमुख तालुका आहे. तो जळगाव शहरापासून साधारणपणे छत्तीस किलोमीटर अंतरावर आहे. जामनेर तालुका पाचोरा, भुसावळ, बोदवड, जळगाव, बुलढाणा या गावांनी वेढलेला आहे. जामनेर तालुक्यात एकशेअठ्ठावन्न गावे आहेत. त्यांपैकी शेंदुर्णी, फत्तेपूर, तोंडापूर, कापुसवाडी, नेरी, पहूर, देऊळगाव, वाकडी ही मोठी अशी गावे आहेत. जामनेर हे गाव टेकडीवजा एका डोंगराच्या कोपऱ्यात पायथ्याशी वसले आहे. मात्र त्या डोंगराला सिद्धगड या भारदस्त नावाने संबोधले जाते. गाव सुखी, संपन्न आणि समृद्ध असे आहे. जामनेर गाव नदीमुळे दोन विभागांत विभागले गेले आहे- जामनेर आणि जामनेरपुरा. दोन्ही गावांना सांधण्यासाठी नदीवर दोन ठिकाणी पूल बांधलेले आहेत. नदीचे नाव कांग असे आहे...