दिलीप पाठक
विमामहर्षी वासुदेव गणेश तथा अण्णासाहेब चिरमुले (Anna Chirmule – Father of Indian Insurance)
इंग्रजांनी मराठी राज्य जिंकले (1818) व त्यायोगे इंग्रजी अंमल हिंदुस्तानच्या बहुतेक सर्व क्षेत्रांवर लागू झाला. तेथून पुढे नव्या मनूचा उदय सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक वगैरे क्षेत्रांमध्ये घडून आला. विविध ज्ञानशाखांची ओळख भारतीयांना इंग्रजी भाषेच्या प्रसारामुळे झाली. त्याचप्रमाणे, जगात घडणाऱ्या घडामोडी भारतीयांना कळू लागल्या. भारतीयांना इतर देशांमध्ये आर्थिक क्षेत्रात काय घडत आहे याचे ज्ञान होऊ लागले.