धीरज वाटेकर
पालशेतची ‘पुराश्मयुगकालीन गुहा’ – कोकणातील पहिली (Palshet’s Paleolithic cave – first in Konkan)
रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील सुसरोंडी-पालशेतची ‘पुराश्मयुगकालीन गुहा’ हे आश्चर्यच ठरले आहे ! तिचा शोध पुण्याच्या डेक्कन पोस्ट ग्रज्युएट रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रा. डॉ. अशोक मराठे यांनी 2001 साली लावला. ती किमान नव्वद हजार वर्षे जुनी असावी. भारताच्या साडेसात हजार किलोमीटर लांब समुद्र किनाऱ्यावरील ती पहिली गुहा आहे. ती मानवनिर्मित गुहा आहे...
परीटाचा दिवा – कोकणातील मानसन्मानाची रीत (Washerman Community – Ritual in Konkan)
‘परीटाचा दिवा’ हा शब्द कोकणात एकेकाळी प्रसिद्ध होता. तेव्हा परीट समाजाकडून दिवाळीत दिव्यांनी होणारी ओवाळणी सन्मानाची, प्रतिष्ठेची गावोगावी मानली जात असे.
चांगभलं करणारं ‘पवतं’ (Sacred Thread for Public Good – Tradition)
‘पवतं’ बांधण्याची परंपरा कोकणसह महाराष्ट्रभर अनेक गावांत सुरू आहे. ‘पवतं’ म्हणजे पवित्र रक्षक धागा. हाताला गंड्याचा दोरा, कंबरेला करगोटा बांधतात तसे. पवत्यांचे उल्लेख वेगवेगळ्या पद्धतींसह आढळतात.
अपरान्तातील प्राचीनतेला संशोधन केंद्राचे कोंदण
‘अपरान्त संशोधन केंद्रा’ची मुहूर्तमेढ चिपळुणात रोवली गेली आहे. विद्यावाचस्पती, प्राचीन मूर्तिशास्त्राचे अभ्यासक, पुरातत्त्व संशोधक डॉ. गोरक्ष देगलूरकर, गड-किल्ल्यांचे अभ्यासक, लेखक प्र. के. घाणेकर,...