Home Authors Posts by दीपक महाजन

दीपक महाजन

1 POSTS 0 COMMENTS
दीपक महाजन ‘आगोम औषधालय’ कारखान्याचे एक संचालक आहेत. त्यांचे तितकेच मोलाचे काम आहे ते कोळथरे गावाच्या विकासासंदर्भात. शिक्षण, संस्था, व्यायामशाळा, उद्योग, रक्तदान शिबिरे ते कासव संवर्धन प्रकल्प असा त्यांच्या स्थानिक कामाचा विस्तार आहे. ते संघ स्वयंसेवक व भाजप पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ते त्या ओघात रत्नागिरी जिल्ह्याशी जोडले गेले आहेत. त्यांचा उच्चशिक्षित पत्नी अंजली(भट) व मुलगा मिहीर महाजन (जन्म 1995) असा संसार आहे.

आगोम : निरामय सूक्ष्म औषधांचा वसा (Story of ‘Agom’ medicines)

0
ही गोष्ट आहे 1994 सालची. ‘गुटिका केशरंजना’ची धून आकाशवाणीवरून सकाळी सहा वाजता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गुंजू लागली आणि ‘आगोम’ हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोचले ! ‘आगोम’चे गूढ त्याच्या नावापासून सुरू होते, पण लोक आकृष्ट झाले ते त्या गुटिकेमुळे, ‘डोक्याचे केस शाबूत राहतात’ या प्रभावाने. ‘आगोम’ हे औषधालय रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी एका छोट्याशा खेड्यात वसले आहे. दापोली तालुक्यातील कोळथरे हे ते गाव. ते सध्या कासव महोत्सवामुळेही गाजत आहे...