2 POSTS
आदित्य दवणे हा तरूण कवी. तो ठाण्याला राहतो. त्याच्या कल्पनेतून 'नातवंडांच्या कविता' हा वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी कविता वाचनाचा कार्यक्रम सुरु झाला. तो मुंबईसह राज्यात आणि राज्याबाहेर काही ठिकाणी सादर झाला. आदित्यने लिहिलेल्या 'सारे संगीतकार' या गीताला पंडित यशवंत देव, अशोक पत्की, श्रीधर फडके, सुरेश वाडकर, अजित कडकडे, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, निलेश मोहरीर यांचा स्वरसाज लाभला. त्याने दासबोधाचे सोप्या भाषेत निरूपण करणारे 'युवा बोध' हे तरुणांसाठीचे सदर दैनिक 'महाराष्ट्र टाईम्स' (नाशिक) मध्ये 2016 साली वर्षभर लिहिले. आदित्यचे लेख-कविता विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत असतात. तो विविध कार्यक्रम-महोत्सवांत कवितांचे वाचन करतो. त्याला 'को.म.सा.प.' संस्थेचा 'सुलोचना मुरारी नार्वेकर लक्षवेधी पुरस्कार' प्राप्त झाला आहे. त्याने 'द पॉइटरी क्लब' हा नवोदितांसाठी कवितांचा कट्टा ठाण्यात सुरु केला.
लेखकाचा दूरध्वनी
80972 44465