दत्तप्रसाद दाभोळकर हे संशोधक आणि लेखक आहेत. त्यांचा स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर अभ्यास आहे. ते स्वामी विवेकानंदांचे जातीअंताचे विचार युवकांपर्यंत पोचवण्याचे काम करतात. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
दत्तप्रसाद दाभोलकर यांनी ‘अन्वयाची अक्षरलिपी’ या कवितासंग्रहाचे परीक्षण करत असताना एक किस्सा कथन केला आहे. बाबा आमटे यांच्या ‘माती जागवील त्याला मत’ या गाजलेल्या कवितासंग्रहावर ‘शब्दांकन- रमेश गुप्ता’ असे आहे. आता, कवितांचे शब्दांकन म्हणजे काय? मग ही कवितानिर्मितीची प्रक्रिया कोणती? कविता बाबा आमटे यांची की रमेश गुप्ता यांची?...
निबंधात जसा नुसता निबंध, लघुनिबंध, ललित निबंध असा प्रवास झाला आहे, त्याप्रमाणे ‘गंध अंतरीचा’ हे आहे भानू काळे यांचे ललित चिंतन. काळे हे मराठीतील आघाडीचे लेखक...