1 POSTS
चांगदेव काळे यांचे शिक्षण बी ए, एल एल बी, डिप्लोमा इन जर्नालिझम असे झाले आहे. त्यांची बारा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कादंबऱ्या, कविता आहेत. काही पुस्तके - आशाळभूत, सुभेदार, नूरजहान, खुदराई, राखुळी, घण,घाव आणि ऐरण. ते ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तसेच विविध ग्रंथालय चळवळीशी जोडलेले कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक एकांकिका आणि स्वलिखित नाटके सादर केली आहेत. त्यांचा दूरदर्शन आणि आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमांत सहभाग असतो.