1 POSTS
चंदा निंबकर या सातारा जिल्ह्यातील फलटणच्या. त्यांनी पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन बी कॉम पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केली. त्यांनी अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून अर्थशास्त्र हा विषय घेऊन एम ए ची पदवी संपादन केली. त्यांनी ‘जेनेटिक इंप्रूव्हमेंट ऑफ लँब प्रॉडक्शन एफिशिएन्सी इन इंडियन डेक्कनी शीप’ या विषयावरील शोधनिबंध सादर करून न्यू इंग्लंड विद्यापीठाकडून पीएच डी पदवी मिळवली आहे.