2 POSTS
अविनाश दुधे हे यांनी लोकमत, तरुण भारत, पुण्यनगरी या दैनिकांत जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंत प्रवास केला. ते साप्ताहिक 'चित्रलेखा'चे विदर्भ ब्युरो चीफ होते. त्यांची रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार अशी ओळख आहे. त्यांनी ढोंगी बुवा, महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड केला आहे. त्यांची 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वाँच' ही पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. ते 'मीडिया वाँच' या अनियतकालिकाचे व वेब पोर्टलचे संपादक आहेत.