अतुल लव्हाळे
अचलपूरचे कृषिधन – कपाशी ते केळी-संत्री
अचलपूर तालुक्याच्या शेतीतील गेल्या साठ वर्षांतील बदल शेतीशास्त्राप्रमाणेच समाजशास्त्रीय दृष्ट्यादेखील अभ्यासण्यासारखे आहेत. अचलपूरला कपास हे तसे पारंपरिक रोकड उत्पादन होतेच. अचलपूरचा कापूस उत्तम प्रतीच्या वस्त्रप्रावरणांसाठी जगभर प्रसिद्ध होता. साठ वर्षांतील ठळक बदल म्हणजे त्या कपाशीबरोबर केळी, मिरची व संत्री या पिकांनीही अचलपूरला नवी ओळख दिली आहे. त्यातून तालुका समृद्ध होत आहे व तरुण पिढी शेतीकडे पुन्हा वळत आहे...