1 POSTS
आश्लेषा महाजन यांनी राज्यशास्त्र विषयातून एमए केले आहे. त्या संस्कृत विशारद व वृत्तपत्र पदविका प्राप्त आहेत. आश्लेषा यांनी बालसाहित्य, कथा, कविता, कादंबरी, कुमारकथा, पुस्तक संपादन, अनुवाद असे वैविध्यपूर्ण लेखन केले आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कविता मराठी पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहेत. महाजन यांनी लोकमत, लोकसत्ता, दिव्य मराठी या वृत्तपत्रांतून विविध सदरांचे लेखन केले. तसेच त्या आकाशवाणी, विद्यावाणी रेडिओ, बालचित्रवाणी व दूरदर्शनसाठी विविध कार्यक्रमांचे लेखन व सादरीकरण करतात. आश्लेषा महाजन पुण्याला राहतात.