अनुराधा जोग
शब्दांकित
‘शब्दांकित’ हा आमचा, हौशी मैत्रिणींचा गट. आम्ही चौघी मैत्रिणींनी मिळून तो १९९९ साली सुरू केला. त्या चौघी म्हणजे आशा साठे, माधवी जोग, निशा मोकाशी आणि मी स्वत: अनुराधा जोग. आशा आणि माधवी या दोघी स्वेच्छानिवृत्त शिक्षिका आणि त्याही भाषा विषयाच्या. आम्ही एकत्र भेटलो आणि थोड्या गप्पांनंतर आशा आणि माधवी ह्या दोघींनीही शाळेतील मुलांसाठी काहीतरी करावे असे वाटत असल्याचे सांगितले. आमच्याजवळ वेळ व उत्साह, दोन्ही होते, त्याचा सदुपयोग व्हावा ही जबरदस्त इच्छा तर होतीच...