Home Authors Posts by आर्या जोशी

आर्या जोशी

3 POSTS 0 COMMENTS
आर्याआशुतोष जोशी यांनी ‘श्राद्धविधीची दान संकल्पना‘ या विषयावर संशोधन केले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत विषयात एम ए केले आहे. आर्या यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधे हिंदू धर्म, तत्वज्ञान, संस्कृती, धर्मशास्र अशा विषयांवर सतरा शोधनिबंधांचे सादरीकरण केले आहे. त्यांना धर्मशास्त्र या विषयातील अभ्यासासाठी आणि ज्ञान प्रबोधिनीतील संशोधनासाठी 2010 मध्ये पूर्णकन्या प्रतिष्ठानचा ‘कन्यारत्न पुरस्कार‘ आणि 2011 मध्ये सुलोचना नातू ट्रस्टचा ‘स्री शक्ती पुरस्कार‘ प्राप्त झाला. त्या मराठी विकिपीडियावर दोन वर्षांपासून संपादक म्हणून कार्यरत आहेत.9422059795

उपनयन- शैक्षणिक संस्कार

0
व्यक्तिविकासाचा विचार पाच प्रमुख पैलूंच्या संदर्भात केला जातो- शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक. मुलांच्या घडणीच्या वयातील टप्प्याचे महत्त्व ओळखून प्राचीन अभ्यासकांनी उपनयन संस्काराची योजना केली असावी. मुले पूर्वी उपनयनानंतर गुरुच्या घरी ब्रह्मचारी म्हणून निवास करत आणि अभ्यास पूर्ण करून मग स्वत:च्या घरी परत येत असत. तो काळ ब्रह्मचारी म्हणून आयुष्य जगत असताना, अभ्यास करून स्वत:च्या भावी जीवनाची दिशा निश्चितपणे घडवण्याचा होय...

ग्रामजीवनाची ऊबदार गोधडी (Village Life In Lockdown Period)

तांदळाची लुसलुशीत भाकरी. सोबत घरचे ओले काजू आणि बटाटा घातलेली झणझणीत भाजी. त्याने डब्यातून असा घास घेत न्याहरी संपवली. मोठ्ठी ढेकर ऐकू आली. तृप्ततेची... त्याने मी दिलेला कोरा चहा घेतला... आलं, गवती चहाची पात, भरपूर साखर आणि चहाची पावडर घातलेला.. दूध नाही हं त्यात.

आर्याचा आडखेड्यातील अभ्यासवर्ग (Village Education in Lockdown)

रत्नागिरी जिल्ह्यातलं राजापूर तालुक्यातलं ताम्हाने हे आमचं बारा वाड्यांचं गाव. आम्ही इथं सेंद्रीय शेती करतो. मी आणि कन्या होळीच्या सणासाठी गावाला आलो आणि लॉकडाऊनचे पडघम वाजायला लागले होळीचा उत्सव, प्रत्येक वाडीत घरोघरी फिरणारी पालखी अशा वातावरणात सगळे दंग असतानाच लॉकडाऊनची घोषणा झाली आणि आम्ही इथं अडकून पडलो.