विष्णूच्या भक्तीचे कार्य ईशान्येकडील राज्यांत करणारे महापुरुष म्हणजे श्री शंकरदेव. त्यांची वैष्णव चळवळ आसाम राज्यात ‘महापुरुषीय धर्म' या नावाने प्रसारित झाली. विष्णुभक्ती भारताच्या विविध प्रांतांत चैतन्य महाप्रभु, संत कबीर, बसवेश्वर, रामानंद यांनी नेली;