Home Authors Posts by अनुपमा खवसे

अनुपमा खवसे

5 POSTS 0 COMMENTS
अनुपमा रामचंद्र खवसे या अचलपूरच्या उषाबाई देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापक आहेत. त्यांचे शिक्षण एम ए - बी एड असे असून त्यांचे अभ्यासविषय मराठी, इतिहास व पुरातत्त्व हे आहेत. त्यांचे लेखन विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध होत असते. त्या जनमंगल साप्ताहिकाच्या संपादक मंडळाच्या सदस्य आहेत. त्या ‘ऐतिहासिक अचलपूर’ या हेरिटेज वॉकचे संयोजन करतात.

पद्मा पिंपळीकर – अचलपुरावरील अमीट ठसा

पद्मा अनंत पिंपळीकर अचलपूरात राहत नाहीत. त्यांनी ते गाव सोडले व त्या लेकाकडे- श्रीरामकडे राहण्यास गेल्या. परंतु त्यांची छाप- त्यांच्या आठवणी अचलपूरच्या विशेषत: पांढरपेशा स्त्रीजीवनावर आहेत. मुख्यत: सुबोध हायस्कूलच्या शिक्षिका म्हणून त्यांच्या विविध आठवणी अचलपूरला आहेत. त्यांनी किती वेगवेगळ्या स्वरूपाची कामे गावात करून ठेवली आहेत !

अचलपूर येथील महानुभाव पंथाचे पाचवे अवतार श्री चक्रधरस्वामी

महानुभाव पंथातील पाचवे अवतार श्री चक्रधर स्वामी अचलपूर येथे दहा महिने वास्तव्य करून होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूंत रत्नपूजा मंदिर, अंबिनाथ मंदिर, अष्टमहासिद्धी मंदिर यांचा समावेश होतो...

अचलपूर नगरी- ऐतिहासिक वास्तू

अचलपूर म्हणजे पौराणिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली आणि एकेकाळी विदर्भाची म्हणजेच वऱ्हाडची राजधानी हे बिरुद मिळवणारी नगरी ! त्यामुळे त्या नगरीत विविध वंशांच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या काळात अनेक वास्तू बांधल्या. त्या शिल्प-स्थापत्यांमध्ये मंदिर स्थापत्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा अशी काही मंदिरे आहेत. त्यामध्ये केशव नारायण मंदिर, कार्तिकेय मंदिर, देवी मंदिर यांचा उल्लेख करता येईल...

अचलपूर येथील गाढवपोळा

पोळा हा सण बैलांचाच, परंतु अचलपूर येथे भोई समाजात गाढवांचा पोळा आयोजित केला जातो. गाढवांप्रती कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे गाढव पोळा होय. ही प्रथा मागील पन्नास-साठ वर्षांपासून परतवाडा शहरातील दयाल घाट येथे जपली जात आहे...

अचलपूर – त्राटिका वधाची नऊशे वर्षांची परंपरा

अचलपूरच्या जीवनपुरा भागातील बालाजी मंदिर उत्सवात समारोपाला सादर होणारे राम अवतार व त्राटिका वध हे ‘नाट्य’ त्या उत्सवाची खासीयत मानली जाते. त्या परंपरेस नऊशे वर्षे 2018 साली पूर्ण झाली. लोटांगणे घालण्याची परंपराही बालाजी मंदिरात आहे. भाविक-भक्त मंदिरापासून एक किलोमीटर दूर असलेल्या सर्पीण नदीच्या पात्रापर्यंत लोटांगणे घालत जातात…