अंजली आपटे
संविदानंदांची संजीवन चिकित्सा आजही प्रचलित (Sanvidananda’s Sanjivan Chikitsa)
वैद्य यशवंत काशिनाथ परांजपे हे योगी संन्यासी व जीवन्मुक्त असे संतमहात्मा होते. त्यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी ‘संजीवन चिकित्सा’ ही भारतीय वैद्यक पद्धत शोधून काढली. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्या राहत्या घरी समाधी घेतली! ती समाधी त्यांच्या मावळंगे येथील घराच्या आवारात पाहण्यास मिळते.