Home Authors Posts by अनिकेत कोनकर

अनिकेत कोनकर

2 POSTS 0 COMMENTS
अनिकेत कोनकर यांनी दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठातून बीएस्सी अ‍ॅग्रिकल्चरचे शिक्षण घेऊन पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांनी सकाळ-अ‍ॅग्रोवन, महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रांमध्ये उपसंपादक म्हणून, तसेच पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागात भाषांतरकार-वृत्तनिवेदक म्हणून काम केले. त्यांना सोशल मीडियासाठीचा राज्य शासनाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे. ते आकाशवाणी वृत्त विभागात रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.

झोंपाळ्यावरची गीता (The Geeta in Leisure)

विनोबांची ‘गीताई’ घराघरांत पोचली. मात्र त्याआधीही गीतेतील तत्त्वज्ञान सोप्या मराठी भाषेत मांडले होते ते अनंततनय यांनी. त्यांचे नाव दत्तात्रेय अनंत आपटे. त्यांनी 1917 मध्ये ‘झोंपाळ्यावरची गीता’ या पुस्तकाची रचना केली. त्या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करावे असा विचार मनात आला. त्यानुसार लोकमान्य टिळक यांच्या ‘गीतारहस्य’च्या प्रकाशनाच्या शताब्दीनिमित्त टिळकांच्या जन्मभूमीत विशेष चर्चासत्र होणार असल्याचे समजले. ‘झोपाळ्यावरच्या गीते’च्या पुनर्प्रकाशनासाठी तोच मुहूर्त योग्य म्हणून तो साधला गेला. सदानंद मोरे यांच्या हस्ते रत्नागिरीतील ‘गीता भवन’मध्ये पुस्तकाचे प्रकाशन झाले. तो बहुमोल ठेवा शंभर वर्षांनी पुन्हा एकदा उपलब्ध करता आला याचा आनंद मोठा होता. त्यानंतर त्याचा इंग्रजी अनुवाद मसुरकर यांनी केला आणि आनंद द्विगुणित झाला...

राजापूरची गंगा – श्रद्धा आणि विज्ञान

मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर नावाचं रम्य गाववजा शहर आहे. राजापूरवरून गोव्याकडे जाताना अर्जुना नदीवरचा पूल आणि नंतरचा छोटा घाट ओलांडल्यावर शहरापासून...