अनघा प्रकाश पंडित यांचे शिक्षण एम ए इंग्लिश ऑनर्स असे झाले आहे. त्या मराठी भाषेकरता भाषांतरकार म्हणून काम करतात. त्या 'सस्नेह' या नावाने व्यवसाय करतात. त्या देवगड, सिंधुदुर्ग येथे राहतात.
महाराष्ट्रात लोकरंगभूमीचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे दशावतार. नागर रंगभूमीच्या आधीपासून दशावतारी नाटक अस्तित्वात होते असे मानले जाते आणि आजही ते जोमदार पद्धतीने सादर होत आहे. नव्या स्वरूपात ते व्यावसायिक रंगभूमीवरही कमालीचे यशस्वी झाले आहे. अत्यंत लवचिक असा हा नाट्यप्रकार कोठल्याही काळात लोकभावनेला नाट्यरूप देऊ शकतो...