नांदखेडा हे गाव बदनापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला आहे. तेथील देवदरी हे बदनापूर, फुलंब्री व औरंगाबाद या तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेले चौदाव्या शतकातील महादेव मंदिर आहे. ते निसर्गाच्या कुशीत व डोंगरांच्या रांगेत वसलेले आहे. मात्र मंदिर दुर्लक्षित आहे, कारण ते पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्याचा विकास झालेला नाही...
देवेश पाथ्रीकर हे आहेत बदनापूर येथे मानसशास्त्राचे प्राध्यापक, पण त्यांनी वसा घेतला आहे तालुका मोतिबिंदू मुक्त करण्याचा. ते तालुक्यातील गावोगावी नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करून राहिले आहेत. डोळ्यांचा रोगी सापडला, की ते त्याला जरुरीप्रमाणे ‘औषधी-ड्रॉप्स’चे विनामूल्य वाटप करतात अथवा ऑपरेशनसाठी हॉस्पिटलात नेतात. त्यांचा प्रत्येक आठवड्याचा कार्यक्रम लागलेला असतो. त्यात मोतिबिंदूचे निदान असलेल्या रूग्णांवर थेट मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना घरपोच सोडले जाते...