अमृता अनिल हन्नुरकर
दक्षिण कोरिया : कोरोनाची सतर्क हाताळणी (South Korea : Prompt Action Against Corona)
दक्षिण कोरिया हा पूर्व आशियातील छोटा देश. तो चीनच्या दक्षिणेला आहे. कोरियन द्वीपकल्पाचे विभाजन दुसऱ्या महायुद्धानंतर, 1945 साली झाले. त्यातून दोन देश जन्माला आले -उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला देश आहे. त्यांनी हिरवेगार डोंगर, चेरीच्या बागा, सागर किनारा व अनेक सुंदर बेटे ही नैसर्गिक संपत्ती खूप छान जोपासली. कोरियाची लोकसंख्या सव्वा पाच कोटी आहे.