1 POSTS
अजित मगदूम यांनी ‘रयत शिक्षण संस्थे’च्या वाशी येथील 'कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालया'मध्ये इंग्रजी विषयाचा अधिव्याख्याता, विभागप्रमुख आणि उपप्राचार्य अशा विविध पदांवर काम केले. त्यांनी एम. ए, एम. फिल आणि पीएचडी या पदवी मिळवल्या आहेत. मगदूम हे संस्थेच्या उरण आणि मलकापूर येथील महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. तौलनिक साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. त्यांनी मराठी दलित साहित्य आणि आफ्रिकन-अमेरिकन साहित्य या विषयांवर संशोधन केले आहे. मुल्कराज आनंद, चेकॉव्ह, टॉलस्टॉय अशा अनेक कथांचे मराठी अनुवाद केले. त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून सत्तर हून अधिक पुस्तकांचे परीक्षण लिहिले आहे. तसेच, आकाशवाणी, दूरदर्शनवर मुलाखती घेण्याचे कार्यक्रम केले आहेत. ते किशोरवयीन व महाविद्यालयीन युवकांशी व्यसन विरोधी काtर्यक्रमांद्वारे संवाद साधतात.
लेखकाचा दूरध्वनी
7506067709