1 POSTS
अजय काळे शिकवतात दहिवडी (ता. तासगाव, जिल्हा - सांगली) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गास. ते तंत्रज्ञान प्रवीण शिक्षक आहेत. त्यांचे शिक्षण एम ए, बी एड, डी एड व डीएसएम असे झाले आहे. त्यांनी ई-लर्निंगच्या कामास 2009 पासून सुरुवात केली. त्यांनी तेथपासून विविध तऱ्हेचे उपक्रम केले, त्यांना 2019 मध्ये NCERT चा (नवी दिल्ली) नॅशनल अॅवार्ड फॉर इनोव्हेशन हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याच साली त्यांना एससीइआरटीतर्फे (पुणे) घेतलेल्या नवोपक्रम स्पर्धेत जिल्ह्यात पहिला क्रमांक आला आहे. काळे यांना विविध संस्थांचे राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.