2 POSTS
अरविंद कुंभार हे मूळचे कर्नाटकातील विजापूर जिल्ह्याचे. नोकरीच्या निमित्ताने गेली चाळीस वर्षे ते महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत. ते सोलापूरच्या अकलूज गावातील 'शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालया'त प्राणिशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कुंभार यांनी भारतातील विविध पक्षी अभयारण्यांना भेटी देऊन तेथील पक्ष्यांचा अभ्यास केला आहे. त्यांच्याकडे पक्ष्यांची दहा हजारांहून अधिक छायाचित्रे संग्रहित आहेत. ते सोलापूर विद्यापीठाचे पीएच.डी. मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थी पक्षीशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या विषयांवर संशोधत करत आहेत. कुंभार यांनी पक्षी आणि पर्यावरण या विषयांवर महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील नियतकालिकांमध्ये मराठी-कन्नड भाषेतून लेखन केले आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9822124191, 02185 224191