आर्या आशुतोष जोशी
उपनयन- शैक्षणिक संस्कार
व्यक्तिविकासाचा विचार पाच प्रमुख पैलूंच्या संदर्भात केला जातो- शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक. मुलांच्या घडणीच्या वयातील टप्प्याचे महत्त्व ओळखून प्राचीन अभ्यासकांनी उपनयन संस्काराची योजना केली असावी. मुले पूर्वी उपनयनानंतर गुरुच्या घरी ब्रह्मचारी म्हणून निवास करत आणि अभ्यास पूर्ण करून मग स्वत:च्या घरी परत येत असत. तो काळ ब्रह्मचारी म्हणून आयुष्य जगत असताना, अभ्यास करून स्वत:च्या भावी जीवनाची दिशा निश्चितपणे घडवण्याचा होय...
ग्रामजीवनाची ऊबदार गोधडी (Village Life In Lockdown Period)
तांदळाची लुसलुशीत भाकरी. सोबत घरचे ओले काजू आणि बटाटा घातलेली झणझणीत भाजी. त्याने डब्यातून असा घास घेत न्याहरी संपवली. मोठ्ठी ढेकर ऐकू आली. तृप्ततेची... त्याने मी दिलेला कोरा चहा घेतला... आलं, गवती चहाची पात, भरपूर साखर आणि चहाची पावडर घातलेला.. दूध नाही हं त्यात.
आर्याचा आडखेड्यातील अभ्यासवर्ग (Village Education in Lockdown)
रत्नागिरी जिल्ह्यातलं राजापूर तालुक्यातलं ताम्हाने हे आमचं बारा वाड्यांचं गाव. आम्ही इथं सेंद्रीय शेती करतो. मी आणि कन्या होळीच्या सणासाठी गावाला आलो आणि लॉकडाऊनचे पडघम वाजायला लागले होळीचा उत्सव, प्रत्येक वाडीत घरोघरी फिरणारी पालखी अशा वातावरणात सगळे दंग असतानाच लॉकडाऊनची घोषणा झाली आणि आम्ही इथं अडकून पडलो.
गुढीपाडवा – हिंदू नववर्षाचा आरंभ (Gudhi Padwa)
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. हिंदू नववर्षाचा तो पहिला दिवस. त्या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.शालिवाहन शकाचे वर्ष त्या दिवसापासून सुरू होते. तो पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.
धर्मविधींसाठी ‘ज्ञानप्रबोधिनी’ पौरोहित्य व्यवस्था
पुणे येथील ‘ज्ञानप्रबोधिनी’ संस्थेची स्थापना कै. विनायक विश्वनाथ तथा अप्पा पेंडसे यांनी 1962 साली केली. प्रबोधिनी ही मुख्यतः गुणवंत विद्यार्थ्यांची शाळा म्हणून परिचित आहे....
महालय – पितृ पंधरवडा
भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ. हिंदू धर्म-परंपरेत पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. पितृपक्ष म्हणजे भारतीयांचे दिवंगत पूर्वज/ पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात असा समज आहे. म्हणून त्यांची पूजा त्या दिवसांत केली जाते, म्हणूनच तो काल शुभ मानला जात नाही. त्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्य करत नाहीत; त्याविषयी बोलणी करत नाहीत आणि मोठी खरेदीही करत नाहीत. मध्य प्रदेश आदी हिंदी भाषी प्रदेशांत पौर्णिमान्त महिने पाळले जातात. तो तेथील आश्विन महिन्यातील पहिला पंधररवडा असतो...
भाद्रपद महिन्यातील व्रते
भाद्रपद महिन्यात येणारी 'धार्मिक व्रते' हा श्रावण महिन्याच्या जोडीने समाजमनाच्या आस्थेचा विषय बनतो. ती क्रमाने एकापाठोपाठ येणारी स्वतंत्र व्रते आहेत. परंतु, ती पाठोपाठ येत...
मानसोल्लास ग्रंथातील पाकशास्त्र
राजा सोमेश्वर हा पश्चिमी चालुक्य कुळातील राजा. त्याने इसवी सन 1127 मध्ये (बारावे शतक) राज्यकारभार स्वीकारला. राजा सोमेश्वर याला ‘भूलोकमल्ल’ आणि ‘सत्याश्रयकुलतिलक’ अशी दोन...
वारली विवाह संस्कार
वारली समाज हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी या डोंगराळ भागात राहतो. त्यांची बोलीभाषा मराठी आहे. निसर्ग ही त्या जमातीसाठी ‘माता’ असते. ‘निसर्ग माता’...
आली चैत्रमासी गौराई
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंम्बके गौरि नारायणि नमोsस्तुते।।
चैत्र महिना वसंताची चाहूल घेऊन येतो आणि त्याचवेळी आगमन होते 'चैत्रगौरी'चे. गौरी म्हणजे पार्वती त्या काळात...