Home Authors Posts by अ. पां. देशपांडे

अ. पां. देशपांडे

2 POSTS 0 COMMENTS
अनंत पांडुरंग देशपांडे हे इलेक्ट्रिकल आणि मेकेनिकल इंजिनिअर. त्यांनी पुणे व मुंबई येथे चार कारखान्यांत मिळून पस्‍तीस वर्षे नोकरी केली. देशपांडे 1974 पासून 'मराठी विज्ञान परिषदे'च्या मध्यवर्ती संस्थेचे कार्यवाह आहेत. परिषदेच्या सर्व प्रकारच्या वाढीत त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी 'नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्यूनिकेटर्स' ही संस्था 1997 साली स्थापन केली. ते त्‍या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यासोबत ते 'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया'च्या घाटकोपर शाखेचे वीस वर्षांपासून अध्यक्षपद भूषवत आहेत. ते त्‍यासोबत आकाशवाणी, नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स अॅण्‍ड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन, दिल्ली आणि महाराष्ट्र शासनाची साहित्य पुरस्कार समिती, तसेच नेहरू सायन्स सेंटर अशा अनेक संस्थांवर कार्यरत होते. देशपांडे यांनी विज्ञान विषयावर दीड हजारांहून अधिक जाहीर भाषणे दिली आहेत. त्‍यांनी हजाराहून जासत संख्‍येने लेख लिहीले आहेत. त्‍यांचे आकाशवाणीवर दोनशे साठ तर दूरदर्शनवर साठ कार्यक्रम झाले आहेत. त्‍यांच्‍या नावावर सत्‍तावन्‍न पुस्तके आहेत. त्‍यांना केंद्र सरकार, फाय फाउंडेशन, महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे, निर्माण फाउंडेशन यांच्‍याकडून विविध पुरस्कार मिळाले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9967841296
_SamajbhanAsnara_Vaidnyanik_1.jpg

भालचंद्र उदगावकर समाजभान असणारा वैज्ञानिक

प्रा.भालचंद्र माधव उदगावकर यांचे वर्णन समाजाचे भान असणारा वैज्ञानिक असे करणे योग्य ठरेल. उदगावकर 14 सप्टेंबर 1927 रोजी जन्मले. ते दादरच्या महापालिका शाळेत आणि...
carasole

ज्येष्ठराज जोशी – जगातील शंभर उत्कृष्ट संशोधकांतील एक

प्रा.ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांचे नाव भारतातील नामवंत रसायन अभियंत्यांमध्ये सन्मानाने घेतले जाते. ज्येष्ठराज हे उत्तम शिक्षक व तसेच संशोधक आहेत. ते रासायनिक कारखाने चालवताना...