सुभाष शेलार
आदिवासी कातकरी जमातीचे झिंगीनृत्य
ठाणे जिल्ह्यातील ‘झिंगीनृत्य’ हे नुसत्या ‘झिंगी’ या शब्दाने किंवा ‘झिंगीचिकी’ या नावाने ओळखले जाते. कातकरी लोक त्याला ‘डबा-ढोलकीचा नाच’ म्हणतात. आरंभी, ताल पत्र्याचा डबा आणि ढोलकीचा ठेका यांवर धरला जातो. ‘झिंगीनृत्य’ या शब्दाविषयी आणखीही काही बोलवा आहेत. एक निरीक्षण असे, की “कातकरी लोक दारू पितात. दारू प्यायल्याने त्यांना झिंग येते. त्या झिंगलेल्या अवस्थेत केला जाणारा नाच म्हणजे झिंगीचा नाच...