Home मराठीकारण

मराठीकारण

मराठी (व एकूणच स्थानिक) भाषा व संस्कृती ही मुळात टिकणार कशी हा प्रश्न जाणकार (मराठी) जनांना भेडसावत असतो. त्याच बरोबर भाषा व संस्कृती यांच्या संवर्धनाच्या गोष्टीही काही डोक्यात असतातच. त्याकरता क्रियाशील मंडळी त्यांच्या त्यांच्या परीने वेगवेगळ्या तऱ्हांची कामे करत असतात. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ आणि त्याचे माध्यम ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ यांमार्फत आम्ही असे ठरवत आहोत, की जगातील साऱ्या कर्तबगार मराठी जनांना, त्यांच्या कार्याला एका सांस्कृतिक दुव्याने जोडून घ्यावे – त्यांच्याकडील माहितीचे व ज्ञानाचे आदानप्रदान व्हावे आणि अशा तऱ्हेने मराठी माणसाचे शक्तिसामर्थ्य प्रकटावे. तेच ‘मराठीकारणा’चे स्वप्न ! शिवाजी राजांना रयतेचा राजा म्हटले जाते, ते वेगळे काय होते? ते स्वप्न जगभर पसरलेल्या मराठी समाजाने साकारण्याचे आहे. जागतिकीकरणाच्या काळात मराठी समाजाच्या इष्ट वृत्तिप्रवृत्ती, स्वभावविशेष, सवयी, इच्छाआकांक्षा जपल्या तर जाव्यातच; पण त्याबरोबर त्यांना जागतिक चित्रात अढळ व अव्वल स्थान मिळावे ही भावना आहे. बदलत्या काळात मराठी भाषा बदलणार, नवे रूप घेणार, ते जाणून घ्यावे आणि त्याच वेळी मराठी भाषेचे संवर्धन सार्वजनिक पातळीवर निकोप पद्धतीने व्हावे यासाठी ‘इंटरअॅक्टिव्ह’ पद्धतीने प्रयत्नशील राहवे यासाठी तीन सदरे योजली आहेत.

मराठी भाषा                          शब्दशोध                           शब्‍दार्थ