‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चा जन्मच महाराष्ट्र समाजातील चांगुलपणा व्यक्त व्हावा म्हणून झालेला आहे. त्या चांगुलपणाचे परमोच्च टोक म्हणजे प्रज्ञा आणि प्रतिभा. म्हणून ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्र समाजातील चांगुलपणा व प्रज्ञा आणि प्रतिभा यांचे नेटवर्क व्हावे असे योजले आहे. चांगुलपणा हा रस्ता ओलांडण्यास मदत केली तरीदेखील व्यक्त होतो. चांगुलपणाच्या एवढ्या नेहमीच्या व सर्वसाधारण गोष्टी आपण येथे नमूद करणार नाही. परंतु ज्यामधून माणसाचा चांगुलपणा प्रातिनिधीक रीत्या व्यक्त होतो आणि ज्यामधून काही मूल्ये प्रकट होतात. अशा चांगुलपणाच्या हकिगती या दालनात प्रसिद्ध होतील. त्यांचे संकलन विविध प्रसिद्ध मजकूरातून जसे केले जाईल. तसेच ते संबंधित व्यक्तीने सच्चेपणाने केलेल्या हकिगतींमधूनही प्रकट होताना जाणवतो. तर असा मजकूर वाचकांच्या नजरेस आला तरी त्यानेही तो सच्चेपणाने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’कडे मूळ स्रोतासह पाठवावा. मजकूर त्याची सत्यासत्यता तपासूनच प्रसिद्ध केला जाईल.
-थिंक महाराष्ट्र डॉट कॉम