श्रीदत्त उपासना मार्गातील परम अधिकारी पुरुष आणि योगसाधनेतील शक्तिसंक्रमण योगांचे दार्शनिक म्हणून श्री गुळवणी महाराज सर्वश्रुत आहेत. योगमार्गातील दीक्षागुरू श्री गुळवणी महाराज हे विख्यात दत्तावतारी श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे परमप्रिय शिष्य होते. त्यांचे माध्यमिक शिक्षण कोल्हापुरातील राजाराम हायस्कूलमध्ये झाले. आठव्या वर्षी उपनयन झाल्यावर संध्या, पूजा, पुरुषसुक्त आणि तसेच खुपसे धार्मिक शिक्षणही यथासांग झाले. त्यांना चित्रकलेचे उपजत ज्ञान होते. महाराजांचा आचारधर्मावर कटाक्ष. त्यांचे सारे जीवन हा आचारधर्माचा वस्तुपाठ होता. ‘व्रतवैकल्ये, अनुष्ठाने करावीत; परंतु न घडली तरी खिन्न होऊ नये, सदाचाराने मात्र वागावे. निर्मल अंत:करण आणि सदाचार यांच्यामुळे ईश्वर संतुष्ट होतो. ईश्वर आहे ही भावना ठेवून वागल्यामुळे जीवन सार्थकी लागेल’ अशी त्यांची शिकवण होती.
-संकलन