‘थिंक महाराष्ट्र’साठी तालुका प्रतिनिधी

3
91
_Maharashtra_Pratinidhi_1.jpg

‘थिंक महाराष्ट्र’ने माहिती संकलनाला चालना देण्याच्या दृष्टीने एमकेसीएलच्या सहकार्याने तालुका प्रतिनिधी नेमण्याचे योजले आहे. तालुका प्रतिनिधीला त्याच्या तालुक्यातील माहिती गोळा करून देण्याचे काम करावे लागेल. माहिती त्यांनीच लिहिली पाहिजे असे नाही, परंतु लेखन/छायाचित्रे/व्हिडिओफिती असे अभिलेखनाचे साहित्य मिळवून देणे महत्त्वाचे. तालुका प्रतिनिधींना त्यांची नियुक्ती झाल्यास महिना तीन हजार रुपये मानधन देणे शक्य होईल. इच्छुकांनी त्यांची माहिती info@thinkmaharashtra.com या ई-मेलवर पाठवावी. त्यापूर्वी ‘थिंक महाराष्ट्र’चे वेबपोर्टल पाहून घ्यावे. www.thinkmaharashtra.com म्हणजे कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.

1. सुधारित योजना १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या बारा महिन्यांच्या कालावधीत राबवली जाईल.

2. दहा तालुक्यांमध्ये हा प्रयत्न करून पाहुया. दहा तालुक्यांत प्रत्येकी एक याप्रमाणे दहा प्रतिनिधी नेमले जातील.

3. त्यांच्यावर जबाबदारी त्या तालुक्यातील सुमारे शंभरच्या आसपास असलेल्या खेड्यांतील माहिती संकलन करण्याची असेल. ही माहिती तीन प्रकारांत – प्रत्येक गावातील कर्तबगार व छांदिष्ट व्यक्ती, उपक्रमशील खासगी व सार्वजनिक संस्था आणि मंदिर-मशिदीपासून वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांपर्यंतचे संस्कृतिसंचित – संकलित केली जाईल. हे सर्व लेखन प्रतिनिधीने करावे असे अपेक्षित नाही. त्याने हे लेखन व त्याबरोबरचे फोटो/व्हिडिओ/ध्वनिफिती व तशी सामग्री तालुक्यातून मिळवून द्यायचे आहे.

4. प्रत्येक तालुका प्रतिनिधीने महिन्याला दहा लेख मिळवून द्यावे असे अपेक्षित आहे. हे उद्दिष्ट लागोपाठ दोन महिने साध्य न करता आल्यास तालुका प्रतिनिधीच्या नियुक्तीची गांभीर्याने दखल घेतली जाईल.

5. तालुका प्रतिनिधींच्या प्रशिक्षणाच्या दोन बैठका वर्षभरात होतील.

6. तालुका प्रतिनिधींकडून जे साहित्य मिळेल ते त्यावर संस्करण ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या ऑफिसशी संलग्न मंडळी करतील व ते लेखन ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध होईल. त्या लेखनास ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या पद्धतीप्रमाणे फूल ना फुलाची पाकळी स्वरूपात मानधन दिले जाईल.

7. या योजनेस गती देण्याचे व त्यामध्ये सुसूत्रता ठेवण्याचे काम नितेश शिंदे करतील.

8. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या माहिती संकलनाचा हेतू जसा अभिलेखन संग्रहाचा (डॉक्युमेंटेशन) आहे तसाच तो जनजागरणाचाही आहे. त्यामुळे तालुका प्रतिनिधींनी त्यांचे कार्य माहिती संकलनापुरते मर्यादित न ठेवता विधायकतेचा प्रसार – त्यासाठी उपक्रमशील व्यक्तींचे दौरे, काही सभासंमेलने असे कार्यक्रम योजण्यास ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’कडून प्रोत्साहन दिले जाईल. मात्र, ते तालुका प्रतिनिधींवर कामाचा भाग म्हणून बंधन नसेल.

9. तालुका प्रतिनिधीला त्या त्या तालुक्यातील ‘एमकेसीएल’चे प्रतिनिधी सहकार्य करतील.

10. तालुका प्रतिनिधीला ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या वतीने नेमणुकीचे पत्र; तसेच, त्याला ओळखपत्र दिले जाईल. प्रतिनिधीने त्याचा उपयोग ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे कार्य अधिक विस्तारण्यासाठी करावा असे अभिप्रेत आहे.

11. जो अथवा जे प्रतिनिधी माहिती संकलनाचे काम वर्षभर निष्ठेने व जनजागृतीसाठी बांधिलकीच्या भावनेने करतील त्यांना वर्ष संपल्यानंतर ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ व ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या केंद्रीय समितीत कार्य करण्याची संधी मिळू शकेल.

12. तालुका प्रतिनिधींनी स्वत:च्या कल्पनेने व हिंमतीने स्थानिक पातळीवर काही संयोजन उभे केले तर ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ची केंद्रीय समिती त्यांना शक्य ते पाठबळ पुरवील.

About Post Author

3 COMMENTS

  1. मला तालुका प्रतिनिधी व्हायचे…
    मला तालुका प्रतिनिधी व्हायचे आहे

  2. Very interesting concept who…
    Very interesting concept who’s person proud our surrounding area

Comments are closed.