तरुण पिढी घरगाडी विकत घेण्यास उत्सुक का नाही?

3
23
23621997_1793668610704817_292212250936912962_n.jpg

व्यक्तीच्या यशाचे मोजमाप घर घेण्यावरून किंवा गाडी घेण्यावरून करण्याची पद्धत मागे पडली आहे. उलट घरगाडी न घेण्याकडे कल असणारी तरुण पिढी जगभरात वाढत आहे.

एका संशोधनात असे आढळून आले आहे, की तथाकथित ‘मिलेनियल’ (हजारी) पिढी, जी आता तीस-पस्तीस वर्षांची आहे, ती क्वचितच घर विकत घेते आणि गाडी घेणे दुर्मीळ होत चालले आहे. खरे तर ती पिढी महागड्या वस्तू घेतच नाही. अमेरिकेमध्ये पस्तीस वर्षांच्या खालील लोकांना ‘भाड्याच्या घरातील पिढी’ (Generation of rentals) असे म्हटले जाते. असे का घडले?

काही समाजशास्त्रज्ञांच्या मते, सध्याची तरुण पिढी त्यांच्या पालकांच्या पिढीपेक्षा वेगळी आहे. त्यांची श्रद्धा वेगळ्या मूल्यांवर आहे. आजच्या तरुणांनी यशाकडे वेगळ्या पद्धतीने बघितले आहे. जसे, की यशस्वी माणसे नवीन घर विकत न घेता भाड्याने राहतात. यशस्वी होण्यासाठी प्रवास, धोकादायक/अवघड खेळ खेळणे, नवीन व्यापार सुरू करणे अशा अनुभवात गुंतवणूक करतात.

खरे तर, लोकांना समृद्धी आणि स्थिरता नकोच आहे. त्यांना त्याऐवजी लवचीक वेळापत्रक आणि पैशांचे व भौगोलिक स्वातंत्र्य हवे आहे. लोकांना भौतिक गोष्टींमध्ये स्वारस्य राहिलेले नाही. जर भाड्याने टॅक्सी मिळते, तर स्वतःची गाडी का बाळगा? ते  म्हणजे चालकासकट स्वतःची गाडी असण्यासारखे नाही का? आणि ते स्वतःची गाडी बाळगण्याहून महागही नाही. जेव्हा संकेतस्थळावर जागा शोधून जगाच्या कोठल्याही कानाकोपऱ्यात राहता येते तेव्हा निसर्गरम्य ठिकाणी स्वतःचे घर घेऊन फक्त सुट्टीपुरते ते वापरण्याची गरजच काय? व्यक्तीला तिच्या आवडत्या ठिकाणी अतोनात भाडे देण्याची किंवा ते विकत घेण्याची गरजच नाही. तीच गोष्ट व्यक्तीच्या गावी जागा घेण्याबद्दलही लागू पडते. व्यक्तीला कोठे माहीत आहे, की ती आता ज्या जागी राहते तेथे ती अजून किती वर्षें राहणार आहे? एकतर व्यक्तीने घर-गाडी चाळीस वर्षांसाठी गहाण ठेवून राहवे किंवा आयुष्यभर भाड्याने राहवे! सत्य स्वीकारावेच लागते. व्यक्ती तिची नोकरी पुढील काही वर्षांत दर काही वर्षांनी बदलत असते. आणि जर ती भाड्याने राहत असेल तर नवीन नोकरीच्या ठिकाणाजवळ घर घेण्यामध्ये तिला यांपैकी कसलीच अडचण येणार नाही.

फोर्बस मासिकाने केलेल्या पाहणीनुसार, आजकालचे तरुण साधारणतः दर तीन वर्षांनी त्यांची नोकरी बदलतात. मालकी हक्काची संकल्पनाच बदलत आहे. ‘अटलांटिक’ मासिकाचे स्तंभलेखक जेम्स हॅम्बलीन या घटनेचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे देतात.

_Tarun_Pidhi_1.jpgमानसशास्त्रज्ञांनी त्यांच्या गेल्या बारा वर्षांत संशोधनात असे दाखवून दिले आहे, की काहीही विकत घेऊन मिळणाऱ्या आनंदापेक्षा स्वतःकडे लक्ष देणे, नवीन अनुभवांवर पैसे खर्च करणे अशा गोष्टींमधून मिळणारा आनंद हा कितीतरी जास्त फायदेशीर आहे! अनुभवातून मित्र बनतात. सामाजिक देवाणघेवाण तशी अवघड असते. देवाणघेवाणीमध्ये आनंद मिळत आहे की नाही यावर ते अवलंबून असते. व्यक्ती दुसऱ्यांशी संवाद साधणे आणि खूप मित्रपरिवार असणे यामुळे आनंदी बनते, पण या मित्रांना काय ऐकण्यास आवडेल – एखाद्या व्यक्तीने मागासलेल्या/जंगली प्रदेशात घालवलेल्या वर्षांबद्दल की तिने किती नवीन घरे घेतली आहेत याबद्दल? लक्षात ठेवा, एखादा अगदी वाईट अनुभवही चांगली गोष्ट बनू शकतो! ते भौतिक गोष्टींबाबत घडत नाही. वस्तू विकत घेतल्याने माणूस चिंताग्रस्त होतो. अजून एक गोष्ट आहे. त्याला त्याच्याजवळच्या वस्तूंची, खास करून महागड्या वस्तूंची काळजी असते. कोणत्याही गाडीचा धोक्याचा अलार्म वाजला तर ज्या व्यक्तीकडे गाडी असेल, तर ती दचकेल. व्यक्तीने घर घेऊन जर त्यात किंमती वस्तू भरल्या, तर त्या चोरीला जाण्याची भीती त्या व्यक्तीला सतत राहील, यात गाडीला पडणारे ओरखडे, गाडी बंद पडणे, टीव्ही बिघडणे या सर्व, मन त्रस्त करणाऱ्या गोष्टी आल्या; पण केवळ एक वर्ष जुना अनुभव तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. सर्वच वस्तूंची किंमत काही काळानंतर कमी होते.

सध्याच्या तरुण पिढीचे पालक त्या तरुण पिढीएवढा प्रवास करू नाही शकले. तेवढी धमालही करू नाही शकले. नवीन उद्योग करण्यासाठी त्यावेळी सध्या एवढ्या संधीही उपलब्ध नव्हत्या आणि म्हणूनच त्यांनी घरांमध्ये आणि गाड्यांमध्ये गुंतवणूक केली. पण तरुण पिढीला तसे करायचे नाही. घर सोडून इतर कोठल्याही ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीची किंमत शेवटी कमीच होते आणि जर मंदीमध्ये घरांच्या कमी झालेल्या किंमतीबद्दल विचार केला तर सगळे अजूनच स्पष्ट होते.

अनुभव ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याची किंमत कमी होत नाही आणि कोणी त्याची चोरीही करू शकत नाही.

तात्पर्य –

या लेखाचे लेखक अमेरिकेत राहतात आणि त्यांनी अमेरिकेत होणारे बदल टिपले आहेत, पण भारतही फार मागे नाही. माझ्या ओळखीचे अनेकजण, जे मुंबई, बंगळूर, दिल्ली सारख्या शहरांत राहतात, त्यांच्या मध्येही हा मतबदल होत आहे आणि तो बदल फार वेगाने घडत आहे.

विकसनशील शहरात राहणारे तरुण लवकरच ते सामर्थ्य ओळखून त्याला अंगीकारतील. ती एक उत्क्रांती आहे, ज्यात माणूस भौतिक मूल्यांपासून फारकत घेऊन जीवनाच्या त्याहून उच्च अशा भावनिक मूल्यांकडे चालला आहे.

जर ‘मासलोव’चा पिरामिड विचारात घेतला, तर ती परमानंदाकडे नेणारी माणसाची पुढील पायरी ठरेल.

कृष्णाने भगवतगीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे परमानंदासाठी अलिप्तता महत्त्वाची आहे आणि व्यक्ती जर अजूनही भौतिक गोष्टींमध्ये आनंद शोधत असेल तर हीच वेळ आहे, की तिच्यासाठी एका सामाजिक क्रांतीची, बंडखोरीची किंवा सोयीस्कर गोष्टींना फारसा धक्का न लावता दुसऱ्या बाजूचा अनुभव घेण्याची!

– डॉ. हेमंत (मानसशास्त्रज्ञ), अनुवाद – ऋचा शेंडे-तुळसकर

(‘सोशल मीडिया’वर पसरलेला एक विचारतुकडा)

About Post Author

3 COMMENTS

Comments are closed.