जवाहरलाल शेतकी विद्यालय मंगळवेढा

0
33

जवाहरलाल शेतकी विद्यालय हे गावकऱ्यांच्या वर्गणीतून बांधले गेले आहे. तेथे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग चालतात. शाळेत कर्मचारी छत्तीस आहेत, त्यांपैकी एकोणतीस शिक्षक. सहाशेपन्नास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. 1. दैनंदिन पंचांग लेखन, 2. मोफत जादा तास, 3. वस्त्र बँक, 4. शैक्षणिक सहल, 5. वार्षिक हस्तलिखित, 6. शालेय पोषण आहार, 7. व्याख्यानमाला, 8. एस.एस.सी. दत्तक योजना, 9. श्रमदान, 10. परिसर स्वच्छता.

शिक्षक उत्साही असून सर्व कार्यक्रमांत विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या संख्येने असतो. विज्ञानदिन, शिक्षकदिन, कालिदासदिन असे सात विविध दिनही साजरे होतात. पर्यावरण उपक्रम म्हणजे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, प्राणवायूचा कोपरा (मोठ्या वृक्षांभोवती भरपूर तुळशीची रोपे लावणे), बीज बँक, वैज्ञानिक जाणीव प्रकल्प असे आगळे उपक्रम तेथे बघायला मिळाले. सैनिक कल्याण निधी जमवला जातो. पालक शिक्षण संघही आहे. शाळेत योग व प्राणायामाचे वर्गही घेतले जातात. खरोखरीच, विद्यार्थी तंदुरुस्त आणि उत्साही होतात. शाळेला मोठे मैदान लाभले आहे. विद्यार्थांकडून या मैदानाभोवती कडुनिंब, बाभूळ आदी मोठे वृक्ष व कोरफड, तुळशी आणि विविध फुलझाडे लावल्याने मैदान सुशोभित दिसते. झाडांना ठिबक सिंचनाची सोय लाभली आहे. त्यामुळे पाण्याचीही बचत होते. दुपारच्या जेवणाची चव आधी शिक्षक घेतात व मगच विद्यार्थ्यांना गरम डाळ-भात जेवायला मिळतो. शाळेचा रिझल्ट उत्तम आहे. क्रीडास्पर्धाही घेतल्या जातात. गावकऱ्यांसाठी पहाटे पाच वाजता योगाचा वर्ग घेण्यात येतो. त्याचा लाभ पन्नास प्रौढ स्त्रीपुरुष घेतात. ते वर्ग अन्य ठिकाणीही मागणीप्रमाणे घेण्यात येतात.

शाळेत ग्रंथालय, प्रयोगशाळा व व्यायामशाळा आहे.

– राजा/राणी पटवर्धन, प्रमोद शेंडे

About Post Author