सुंदरबाई पवार – ब्रिटिशांच्या अफू धोरणाविरूद्ध लढा

2
297

ब्रिटिशांच्या अफूधोरणाच्या विरूद्ध लढा सुंदरबाई एच पवार या एका हिंदू – ख्रिस्ती महिलेने दिला. ब्रिटिशांनी अफूच्या व्यापाराला भारतात उत्तेजन देण्याचे जे धोरण स्वीकारले होते त्या विरूद्ध सुंदरबाईंनी खुद्द इंग्लंडात जाऊन तब्बल एकशेसोळा भाषणे दिली होती ! 

ब्रिटिशांचे अफू धोरण हा कायदा नेहमी चर्चाविषय राहिला आहे. त्याच अफूधोरणाच्या विरूद्ध लढा एका हिंदूख्रिस्ती महिलेने केला. त्या महिलेचे नाव सुंदरबाई एच पवार. ती नावावरून मराठी वाटते. त्या रामचंद्र आणि गुन्देरबाई पवार या ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या दाम्पत्याच्या कन्यात्यांचा जन्म 1856 सालचात्यांनीही ख्रिस्ती धर्मप्रसाराला हातभार लावलामात्र त्याहून महत्त्वाचे असे सुंदरबार्इंचे कार्य म्हणजे ब्रिटिशांनी अफूच्या व्यापाराला भारतात उत्तेजन देण्याचे जे धोरण स्वीकारले होते त्या विरूद्ध त्यांनी खुद्द इंग्लंडात जाऊन तब्बल एकशेसोळा भाषणे दिली होती मुंबईत त्याअगोदर अफूचा प्रसार करण्याचे काम उघडपणे गुपचूप’ चालत असे. सुंदरबाई यांनी त्याविरुद्ध आवाज सतत दोन वर्षे उठवलात्यांनी त्यांच्या भाषणात काय सांगितले होते?

उच्च वर्णियांच्या जनानखान्यात हजारो स्त्रिया उपासमारीने मरत आहेत आणि त्याचे कारण म्हणजे त्यांचे नवरे अफूच्या अड्ड्यांवर अफू पिऊन स्वतःचा सर्वनाश करून घेत आहेतत्या तरुण माणसांना अफूचे व्यसन लागते ते अफू पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी रचलेल्या सापळ्यात अडकल्यामुळेशेतकरी त्यांच्या नोकरांना रस्त्यांच्या कोपऱ्यांवर अफूची नळकांडी घेऊन उभे करतात आणि तरुण माणसांना मोहात पाडतातशेतकरी किंवा अफूविषयक अधिकारी गुपचूपपणे उपहारगृहात चहामध्ये अफू मिसळतातत्यामुळे पुरुषांना अफूची चटक लागते आणि ते काय करत आहेत हे त्यांच्या लक्षात येण्यापूर्वीच ती माणसे अफूची बळी होतात !

सुंदरबाई यांच्या त्या विधानांत मुंबईच्या अफूविषयक धोरणावरकारभारावर आरोप केले गेले होते. त्यामुळे त्या विधानांच्या सत्यतेबद्दल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेपोलिस कमिशनर (मुंबई) आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत केल्या गेलेल्या चौकशीत असे ‘निष्पन्न’ झालेकी सुंदरबाई यांचे आरोप सर्वस्वी निराधार आहेतसुंदरबाई यांच्या जाहीर तक्रारींपूर्वी दोन वर्षे अशी एक अफवा उठली होतीकी एका इराण्याने – पर्शियन पारशी माणसाने – त्याच्या चहापानगृहात चहाला रंग आणण्यासाठी चहात अफूची बोण्डे घातलीसहायक अबकारी आयुक्त मिस्टर अल्मान (ते हॉटेल व उपहारगृह यांच्या परवान्याबाबतचे प्रमुख अधिकारीदेखील होतेयांनी चौकशी केलीत्या चौकशीतही सुंदरबाई यांच्या आरोपात तथ्य नाही असे आढळून आले.

सुंदरबार्इंना सरकारी पातळीवर केलेल्या चौकशीचा निष्कर्ष काय निघणार हे माहीत असावेत्यामुळे बहुधा त्यांनी अफूला विरोध लंडनमध्येच करावा असे ठरवलेत्यांचे जे भाषण 12 जानेवारी 1892 या दिवशी लंडन येथील एक्स्टर सभागृहात झाले त्याचा वृत्तांत माहितीजालावर उपलब्ध आहेत्यात त्या म्हणाल्या 

एखादा राजपुत्र किंवा सत्ताधारी त्याच्याच प्रजेचा सर्वनाश व्हावा अशा प्रकारचा निश्चय करतोअसे तुम्ही कधी ऐकले किंवा बघितले आहे कामला वाटते तसे ते कधीच झाले नसेल पण मी ते बघितले आहेब्रिटनने हिंदुस्थानचे राज्यकर्ते ही भूमिका स्वीकारली आहे आणि आमच्या लोकांना शिक्षण देण्याचे व सुसंस्कृत करण्याचे काम हाती घेतले आहेपरंतु दुर्दैवाने त्याच वेळेलाहजारो परवाने दिले आहेत आणि शहरातून सर्वत्र संचार करण्यासाठी दहा हजार माणसे नियुक्त केली गेली आहेतते लोक सर्व गावांतून आणि शहरांतून फिरतात आणि स्वतःच्या प्रजेवर विषप्रयोग करतात त्यांनी ते विष पुरेशा प्रमाणात संपवले नाही (अफू पाजली नाहीतर त्यांना मोठा दंड केला जातो !

आता प्रभू येशूने सांगितले होतेजा आणि सर्वाना ईश्वराचा उपदेश समजावून सांगापरंतु मिशनाऱ्यांसोबत हे लोक आले आणि आम्हाला सर्वतोपरी संपवण्याचा प्रयत्न करू लागलेलक्षावधी बालके खाण्यास नाही म्हणून टाहो फोडत आहेत आणि त्यांना अन्न मिळत नाहीकारण त्यांचे वडीलत्यांच्याकडे असलेला पैसा अफूवर उधळत असतातलक्षावधी स्त्रियांची हृदये विदीर्ण झालेली आहेतकारण सरकारच्या दलालांनीत्या स्त्रियांच्या पतींना विषाचे व्यसन लावले आहेस्वतःच्या ताब्यात देखरेखीसाठी आलेल्या लहानग्या बाळांना अफू घालणाऱ्या नर्सेस आम्हाला ठाऊक आहेतत्यामुळे आम्ही आणि ती लहान बाळेदोघांना असुरक्षित वाटत आहेआम्ही असेही भयंकर वृत्त ऐकले आहेकी लष्करातील पुरुषांच्या सोयीसाठी तरुण स्त्रिया आणि विधवा गोळा करण्यासही काही स्त्रियांना सरकारने नेमणूक दिली आहे.

हे सारे असेच चालू राहिले तर काही वर्षांत आमचा सर्वनाश ओढावेल आणि जर हिंदुस्तानचा सर्वनाश झाला तर सरकारला महसूल कोठून मिळेलमाझी खात्री आहेकी तुम्ही तुमच्या सरकारकडे मागणी कराल की जर तुम्हाला हिंदुस्तानवर न्यायपूर्ण आणि उचित पद्धतीने राज्य करता येत नसेल तर ते राज्य सोडून देणे हीच सर्वात चांगली गोष्ट ठरेल !”

लंडनमधील त्यांच्या कार्याबद्दलचा एक उल्लेख Our Day – A Record and Review of Current Reforms’ या पुस्तकाच्या संपादकीय टिपणात आहे. “गेल्या काही महिन्यांत ग्रेट ब्रिटनमध्ये एक नवीनच आंदोलन उभे राहिले आहेते अफूच्या प्रश्नाबाबत आहेख्रिस्ती इंग्लंडवासीयांचा सदसद्विवेक जागृत होऊ पाहत आहेअनेक जण अजूनहीलंडन टाइम्सच्या भूमिकेला पाठिंबा देतात आणि असे मानतातकी हे आंदोलन म्हणजे तथाकथित पावित्र्यप्रेमींचा थिल्लरपणा आहेएक्स्टर हॉलमध्ये अनेक जाहीर सभा झाल्या आणि अफूच्या व्यापारामुळे ज्या देशातील लोकांचे अतीव नुकसान झाले त्या देशातून आलेले प्रतिनिधी यांनी या सभांतून भाषणे दिलीसरकारच्या पक्षपाती धोरणामुळे ज्या हिंदुस्तानातील महिलांना दीर्घकाळ दुःख सहन करावे लागलेत्यांचा आवाज त्यांच्यातील एका महिलेच्या रूपाने व्यक्त झालाही महिला म्हणजे मिस सुंदरबाई एच पवारतिचे आईवडील उच्चवर्णीय हिंदू होतेत्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलात्यामुळे उच्चवर्णीय ब्राह्मण मुलींच्या वाट्याला येतात तसे दुर्दैवी अनुभव सुंदरबार्इंना घ्यावे लागले नाहीतअस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या मिस सुंदरबाई म्हणजे त्यांच्या देशवासीय महिलांना ज्या वेळी मदतीची गरज वाटेल त्या वेळेला मदत करणे हे ध्येय बाळगलेली महिलाहिंदुस्तानात त्यांनी जेव्हा अफूविरूद्ध सभा घेतल्या तेव्हा तेथील स्त्रियांच्या त्याबाबतच्या धारणा अतिशय तीव्र होत्याइतक्याकी एक स्त्री म्हणाली, ‘सरकारने जर अफूवर बंदी घातली तर मी आणि माझ्या देशभगिनी सरकारची पूजा बांधतील.’ दुसरी स्त्री म्हणाली, ‘आम्ही जे दुःख सहन करत आहोत त्यापासून आमची सुटका करण्यासाठी सरकारने अशा कष्टी आणि दुःखी महिला व त्यांची मुले यांना ठार मारण्यासाठी हाती तलवार घ्यावीतसे झाले तर आम्ही सरकारचे आभार मानू.

  ह्या सभेतील वृत्तान्तानंतर संपादकीयातहिंदुस्थानी महिलांच्या मर्यादा ब्रिटिश नि अमेरिकन महिलांच्या तुलनेत काय आहेत याचे स्पष्टीकरण दिले होतेसुंदरबाई यांची माहिती 19 मे 1892 रोजीच्या The Fort Scot Weekly Tribune च्या अंकात ‘वूमेन ऑफ द अवर’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाली.

पंडिता रमाबाई आणि सुंदरबाई यांची भेट 1883 मध्ये झाली होतीपुढेसुंदरबाई पंडिता रमाबाई यांचा उजवा हात बनल्यारमाबाई अमेरिकेला 1898 मध्ये गेल्या. त्यानंतर पुढील सात वर्षे त्यांच्या आश्रमाची सारी व्यवस्था सुंदरबाई यांनी बघितलीत्यांनी पुढे शिक्षिका प्रशिक्षित करण्याचे केंद्र काढले.

सुंदरबाई यांनी दोन पुस्तके लिहिली – Is Zenana Work a Failure? आणि Hinduism and Womanhood. त्यांची हिंदू धर्मातील खटकणाऱ्या गोष्टींबद्दलची मते दुसऱ्या पुस्तकात तीव्रपणे व्यक्त झाली आहेत. त्यांनी हिंदू धर्मातील चालीरीती आणि स्त्रियांची दास्यवृत्ती या दोन गोष्टींबद्दल पुरुषांना अधिक दोष देत टीका केली आहे.

सुंदरबाई पवार यांचा मृत्यू 1921 साली झाला.

– रामचंद्र वझे 98209 46547 vazemukund@yahoo.com

———————————————————————————————-

About Post Author

2 COMMENTS

  1. फारच छान माहिती दिली आहे . त्या स्त्रीचे नाव आत्ताच कळले . आभार

  2. सुंदर माहिती. पंडिता रमाबाईंसारखेच काम करणा-या त्यांच्या सहका-यांवर नवा प्रकाशझोत पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here