महाराष्ट्राच्या कानाकोप-यात वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या कार्याचा आढावा या वेबपोर्टलच्या माध्यमातून घेत आहोत. ‘थिंक महाराष्ट्र’च्या या प्रयत्नांना यश येत असलेलेही दिसत आहे. चंद्रहास आणि सुनंदा जप्तीवाले यांच्यावरील लेखाला अनेक वाचकांकडून पसंतीची पावती देण्यात आली. तर बिनिंगेन – स्वित्झर्लंड येथील अविनाश बाबूराव जगताप यांनी जप्तीवाले यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना मदत करण्याची इच्छा प्रकट केली. हा प्रतिसाद ‘थिंक महाराष्ट्र’च्या कार्याची गरज दाखवून देतो; त्याचबरोबर या प्रकल्पाच्या माध्यमातून जे साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, ते सोशल नेटवर्किंग नक्की साध्य होईल याचा विश्वासही निर्माण करतो. लोक परस्परांशी विचार आणि मुख्य म्हणजे कृतीने जोडले जावेत हा या वेबपोर्टलचा हेतू आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोप-यात वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या कार्याचा आढावा या वेबपोर्टलच्या माध्यमातून घेत आहोत. ‘थिंक महाराष्ट्र’च्या या प्रयत्नांना यश येत असलेलेही दिसत आहे. चंद्रहास आणि सुनंदा जप्तीवाले या दांपत्याकडून केल्या जाणा-या समाजाभिमुख कार्याची माहिती या वेबपोर्टलवर काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली. त्या लेखाला अनेक वाचकांकडून पसंतीची पावती देण्यात आली. तर बिनिंगेन – स्वित्झर्लंड येथील अविनाश बाबूराव जगताप यांनी जप्तीवाले यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना मदत करण्याची इच्छा प्रकट केली. जगताप यांच्याप्रमाणे पुण्यातील चारूदत्त गुप्ते यांनीही जप्तीवाले यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांच्या कार्यास हातभार लावण्याचा मनोदय व्यक्त केला. जप्तीवाल्यांसारख्या उपयुक्त काम करणा-या व्यक्तींचे कार्य हे समाजातील इतर घटकांच्या मनातील चांगुलपणाला आवाहन करत असते. जगताप आणि गुप्ते या दोन्ही व्यक्तींकडून देण्यात आलेला प्रतिसाद हा ‘थिंक महाराष्ट्र’च्या कार्याची गरज दाखवून देतो; त्याचबरोबर या प्रकल्पाच्या माध्यमातून जे साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, ते सोशल नेटवर्किंग नक्की साध्य होईल याचा विश्वास वाटतो.
ठाण्याचे सुभाष शहा यांच्याकडून बासरीवादनातून करण्यात येणारा सामाजिक उपक्रम ‘थिंक महाराष्ट्र‘वर गेल्याच चआठवड्यात आला. तेव्हापासून त्या लेखाला भेट देणा-यांची संख्या वाढतच आहे. सुभाष शहा यांच्या अनेक चाहत्यांनी तो लेख प्रसिद्ध केल्याबद्दल ‘थिंक महाराष्ट्र‘चे अभिनंदन केले. समाजातील चांगुलपणाचा प्रभाव अशा प्रकारे दिसून येतो. जप्तीवाले व सुभाष शहा यांच्या कार्याला मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहता लोकांना या अस्थिरतेच्या काळात चांगुलपणा जपून ठेवण्याची आवश्यकता भासत असल्याचे जाणवते आणि हा चांगुलपणा लोकांसमोर आणण्यासाठी ‘थिंक महाराष्ट्र’ सदैव प्रयत्नशील राहील.
जोपर्यंत समाजामध्ये चांगल्या गोष्टींचा आणि व्यक्तीशः पुढाकाराचा प्रभाव जाणवतो तोपर्यंत तो समाज सामाजिक, आर्थिक अथवा वैचारिक अशा सर्व क्षेत्रांत प्रगतिपथावर वाटचाल करण्यास सक्षम असतो. मात्र एकदा का चांगुलपणाचा समाजातील प्रभाव खालावू लागला की समाजाचा समतोल बिघडत जातो. आज देशात सुरू असलेल्या घटना पाहून याची प्रचीती येते. भ्रष्टाचार वाढीस लागणे अथवा तत्सम अनैतिक गोष्टींमागे समाजातील सत्शक्तीचा कमी झालेला प्रभाव हेच कारण आहे असे वाटते.
चांगुलपणा, पुढाकार घेण्याची वृत्ती, समाजसेवेची कळकळ, चांगल्या गोष्टी घडवण्याचे प्रयत्न हे सारे समाजात अस्तित्वात आहेत. मात्र बौद्धिकतेची कमी झालेली आस, ग्लॅमर आणि राजकीय व गुन्हेगारी घटनांना मिळालेले महत्त्व, वेगवान जीवनमान आणि चंगळवादी वृत्ती यांच्या गदारोळात या गोष्टी झाकोळल्या जातात. महाराष्ट्रीय समाजापुरता विचार करता, समाजातील हा चांगुलपणा आणि तो ठायी असलेल्या व्यक्ती यांच्या कार्याची माहिती ‘वेबपोर्टल’च्या माध्यमातून मराठी जनतेला करून द्यावी आणि त्यांचे ‘नेटवर्किंग’ करावे या हेतूने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली. लोक परस्परांशी विचार आणि मुख्य म्हणजे कृतीने जोडले जावेत हा या वेबपोर्टलचा हेतू आहे. समाजाची ताकद व्यक्त होईल अशा रीतीने वेबपोर्टल या माध्यमाचा भारतात प्रथमच वापर होत आहे.
मात्र हा प्रकल्प तुम्हा वाचकांच्या मदतीशिवाय प्रभावीपणे उभा राहू शकत नाही. यासाठी वाचकांकडून त्यांच्या माहितीतील, परिसरातील चांगुलपणा बाळगणा-या, समाजासाठी निष्ठेने काम करणार्या व्यक्तींची माहिती ‘थिंक महाराष्ट्र’कडे पाठवावी, असे आवाहन आम्ही करत आहोत.
त्याशिवाय आपण वार्षिक 300 रू. देणगी देऊन या प्रकल्पाला मदत करू शकता. अशा प्रकारे, दरवर्षी 300 रू. देणार्या व्यक्तींना आम्ही आश्रयदाते म्हणत आहोत. हा प्रकल्प महाराष्ट्रजनांसाठी निर्माण करण्यात आला असून राज्यातील दहा कोटी जनताच त्याचे भविष्यातील लाभधारक असणार आहेत.
यापुढे बदल घडवण्यासाठी केवळ आंदोलने करून भागणार नाही. त्यासाठी समाजातील चांगुलपणाचा आणि व्यक्तीशः पुढाकाराचा स्तर वाढावा यासाठी प्रयत्न करावे लागतील. जर असे घडले तर आपोआपच अन्य प्रश्नांचीही उकल होऊ शकेल.
आपल्या देणगीची रक्कम ‘व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन’ या नावाने चेक काढून पाठवावी.
पत्ता– ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’, 3-वेणू अपार्टमेंट, केसर-बाग, बी.जे.देवरूखकर रोड, ‘शिंदेवाडी’ समोर, दादर (पू), मुंबई – 400014. 022-24183710, 9029557767 thinkm2010@gmail.com अथवा पुढील बँकांतील अकाउण्टमध्ये जमा करावी:
Cosmos Bank – Account no. -0121001015862, State Bank Of India – Account no. – 31759182464
किरण क्षीरसागर, संपादकीय सहाय्यक
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम