Home व्यक्ती हिवरेबाजार आणि पोपट पवार

हिवरेबाजार आणि पोपट पवार

41
_Hiware_Bajar_1

आदर्श., यशवंत… निर्मल वनग्राम

पोपट पवारांचा हिवरेबाजार

सुखानं, आनंदानं, नांदणारं गाव
माझ्या गावात व्यसनाचा वास नाही
इथं कोणीही अक्षरआंधळा नाही
गावच्या घराघरात गोबरगॅस, ऊर्जाचूल
घराघरात एक नाही तर दोनच मुलं.
गावचं माळरान बारा महिने हिरवंगार
दावणीतच गावची जनावरं खाती चारा
गावकर्‍यांनी श्रमदानानं बांधल्या वाटा
बारा महिने धनधान्याचा असतो साठा
तुम्हालाही वाटतं ना, तुमचं गावदेखील
माझ्या गावासारखं असावं आदर्श गाव?

हे वर्णन आहे, ‘हिवरेबाजार’ गावचं. मी हिवरेबाजारला जाऊन आले, ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं.

हिवरेबाजारचं सध्याचं रूप आणि पूर्वीचं रूप यांत जमीनअस्मानाचा फरक आहे – असं मी वारंवार ऐकलं-वाचलं होतं. मी पाहिलं ते नवं गाव. कसं होतं पूर्वीचं ‘हिवरेबाजार?’ १९९० पूर्वीचं?

जेमतेम साडेतीनशे-चारशे मिलिमीटर पाऊस. त्यात पावसाळी पिकं थोडीफार घेतली जायची. जमिनीची धूप, पिण्याच्या पाण्याचं दुर्भीक्ष्य, जनावरांचा चारा उपलब्ध नव्हता, ना जळणासाठी लाकूड, अशा परिस्थितीमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले होते. हाताला काम नाही, त्यातून गुन्हेगारी वृत्ती वाढली होती. व्यसनाधीनता बळावली होती. लोक दारू गाळायचे आणि विकायचे. तो काही लोकांचा उत्पन्नाचा मार्ग झाला! दारूमुळे होणारे सर्व वाईट परिणामही दिसू लागले. हिवरेबाजार बदनाम गाव होतं. सरकारी खात्यातल्या ज्याची कोणाची हिवरेबाजारला बदली व्हायची, त्याला ती ‘काळ्या पाण्याची शिक्षा’ वाटे. शिक्षणाचा अभाव, आरोग्यविषयक गोष्टींचा अभाव… दारूच्या एका बाटलीवर गावातली लग्नं जमत!

सगळा अभावाचा, नन्नाचा पाढा

अशा गावाचा कायापालट कसा झाला? कोणी केला?

तर एकच नाव येतं – पोपटराव पवार. ते चौथीमध्ये गाव सोडून नगरला गेले. त्यांनी तेथे एम.कॉम.पर्यंत शिक्षण घेतलं. राज्य सरकारनं १९८९ साली पंचायत निवडणुका जाहीर केल्या होत्या. हिवरेबाजारमध्ये त्यामुळे चैतन्य निर्माण झालं. गावातील तरुणांनी पोपटराव पवारांना ग्रामसभेसाठी बोलावलं. त्यावेळी पोपटराव पवारांनी त्यांच्या गावाच्या विकासासंबंधीच्या त्यांच्या कल्पना, त्यांची स्वप्नं लोकांपुढे मांडल्या. तेव्हा लोकांनी त्यांना एकमतानं सरपंच म्हणून निवडलं.

पवारांनी पहिली ग्रामसभा २६ जानेवारी १९९० ला भरवली. सर्व लोकांना सहकार्यासाठी आवाहन केलं. त्यावेळी लोकांसमोर काही मुद्यांविषयी चर्चा केली. ते गावाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचे होते. पिण्याचं पाणी, जनावरांना चारा, शेतीसाठी पाणी, शैक्षणिक सुविधा, आरोग्याच्या सुविधा, रस्ते, वीज, नोकरी-धंदा, सोशल, कल्चरल ऑक्टिव्हिटीज. त्यांनी या मुद्यांआधारे १९९० ते १९९५ या पाच वर्षांसाठी योजना तयार केली. त्यात प्राधान्य शिक्षणाला दिलं. शिक्षणासंदर्भात ज्या सरकारी योजना होत्या. त्यांची मदत घेण्याचं ठरवलं. कारण पवारांचा दृढ विश्वास असा की –

एक शिक्षित माणूस घर बदलू शकतो.
एक शिक्षित घर गाव बदलू शकतं.
आणि एक शिक्षित गाव प्रत्येक गोष्ट बदलू शकतं.

आणि त्याचाच प्रत्यय हिवरेबाजार गावात पाहायला मिळतो. गावातील साक्षरतेचं प्रमाण पंचाण्ण्व टक्के आहे. गावातील अठरा लोकांनी आपली जमीन शाळेसाठी व शाळेच्या मैदानासाठी स्वेच्छेनं दान दिलेली आहे. पोपटराव पवार यांना ग्रामीण भागाविषयी आवड होतीच. ते जरी शिक्षणासाठी नगरला होते तरी त्यांचे गावात जाणेयेणे असे. हिवरेबाजाराहून नगरला सायकलवरून जाणारी मुले होती व आहेतही.

पोपटराव पवारांच्या घऱची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे असेल कदाचित त्यांनी मनानं असं ठरवलं होतं की गावात सुधारणा करायची, गाव सोडून ( मोठेपणी) कुठे जायचं नाही. बाबा पवार हे त्यांचे एक नातेवाईक. ते गावच्या विकासासाठी प्रयत्‍न करत. गावातील शेतकरी जुगार खेळत असत. गावात दारूच्या वीस भट्या होत्या. ते लोक पोपटराव पवार यांना विरोध करत होते. त्यांनी पवारांना गावाबाहेर देखील काढलं होतं. त्यावेळी पवार व बाबा पवार हे हिवरेबाजारजवळील ‘तास’ या गावी राहात होते व तेव्हाच दोघांनी मिळून गाव सुधारण्यासंबंधी विचार केला होता.

हिवरेबाजार जसं आणि जिथं आहे, त्या परिस्थितीचाही त्यांना फायदा झाला. मुळात हिवरेबाजारची लोकसंख्या कमी, आजुबाजूला डोंगर व एखाद्या दरीत वसलं गेलेलं गाव, त्यामुळे आजुबाजूचा निसर्ग हाही सुंदरच. एक टुमदार सुटसुटीत गाव असावं तसं. पोपटराव पवारांना त्यांच्या शिक्षणानं हात दिला-लोकांशी बोलणं, एखादी गोष्ट त्यांना पटवून देणं, कामाची व्यवस्थित मांडणी करणं हे त्यांच्यातील कौशल्य त्यांनी पणाला लावलं. त्यांनी प्रथम पाणी अडवा, पाणी जिरवा, मोहीम राबवून गावातील पाण्याचा प्रश्न हाताळला. लोकांना त्याचे फायदे जाणवू लागले. मग ते पोपटरावांना सहकार्य करू लागले. गावातील घरांना एकच रंग-पांढरा-दिला त्यात रंगाचे पैसे वाचलेच ना लोकांचे! अशा दिसायला साध्या गोष्टी युक्तीनं लोकांना पटवून देण्यात पोपटराव पवार यशस्वी झाले. त्यांनी एकीकडे गावकर्‍यांना आपल्या बाजूनं करून घेण्यात यश मिळवलं तर दुसरीकडे त्यांनी शासनाकडून योजना मंजूर करून घेणं, पैसे मिळवणं याही आघाडीवर यश मिळवलं.

मी हिवरेबाजारच्या एका माहेरवाशिणीशी बोलले. ती हिवरे झरेची सासुरवाशीण आहे. ती म्हणाली, की माझ्या बालपणापासून मी हिवरेबाजार चांगले झाले, तेच पाहिले आहे. त्यावेळी आपले गाव म्हणजे वेगळे काही आहे वगैरे कधीच जाणवले नाही. पण लग्न होऊन (वर्षापूर्वी) मी जेव्हा हिवरे झरे येथे आले तेव्हा मला जाणवू लागले की आपले हिवरेबाजार किती चांगले आहे! हिवरे झरे मधील रस्ते, मातीचे पडके वाडे, दारू पिणारे लोक, हे सर्व पाहिल्यावर आपल्या हिवरेबाजारमधे असे काहीच नाही याची जाणीव झाली. हिवरेबाजारमध्ये माईकवरून सूचना आली, की आज रात्री ९ ला ग्रामसभा आहे की सर्व लोक, पुरुष, स्त्रिया-आवर्जून येतात एवढी जागरुकता तिथं निर्माण झाली आहे. इथं हिवरेझरेत तसं नाही. खूप कमी लोक येतात ग्रामसभेला व स्त्रिया तर नाहीच दिसत तिथं.

पवारांनी आदर्श ग्राम योजनेचा प्रकल्प राबवण्यासाठी पंचसूत्री तयार केली; श्रमदान, चराईबंदी, कुर्‍हाडबंदी, नशाबंदी, कुटुंबनियोजन. श्रमदानाचं महत्त्व लोकांना पटल्यामुळे लोकांमधील कामसू वृत्ती वाढीस लागली, पण त्याशिवाय त्यांच्या व्यक्तिगत मालमत्तेतही वाढ झाली. एखाद्याच्या शेतात जे काम करायचं असेल, उदाहरणार्थ खुरपणी, पेरणी, कापणी इत्यादी, ते काम गावातील सर्वजण मिळून करतात. त्यामुळे एकतर ते काम लवकर होतं, त्याशिवाय मजुरीचे पैसेही वाचतात. चराईबंदीमुळे गावातील गवताचं उत्पादन वार्षिक दोनशे टनांवरून पाच ते सहा हजार टनांपर्यंत वाढलं – पाच वर्षांच्या कालावधीत गावात कुर्‍हाडबंदी अमलात आल्यामुळे झाडांची संख्या वाढली. तिथं नऊ लाख झाडं आहेत. नशाबंदी केल्यामुळे लोकांची काम करण्याची क्षमता वाढली. दारूमुळे होणारे दुष्परिणाम टळले. कुटुंबनियोजनचा अवलंब केल्यामुळे, जन्मदर दर हजारी अकराइतका कमी झाला. लोक लहान कुटुंबांचे फायदे अनुभवू लागले. ही पंचसूत्री हेच गावाच्या यशाचं, विकासाचं गुपित आहे असं पोपटराव म्हणतात.

हिवरेबाजार गावाची लोकसंख्या बाराशेपाच आहे. तेथील जनावरांची संख्या अकराशेचाळीस आहे. स्वत:ची शेती असणार्‍या कुटुंबांची संख्या दोनशेपाच आहे. शेती नसणारी कुटुंबं फक्त दोन आहेत. मी जेव्हा गावात फिरले, तेव्हा गावाची रचना नियोजित शहराप्रमाणे केली असल्याचं जाणवलं. रस्ते सिमेंटचे आहेत. स्वच्छ. सर्व घरांना सारखा रंग दिलेला आहे – पांढरा. पोपटराव पवारांचं घरही त्याला अपवाद नाही. सर्व घरं बैठी, फक्त ग्रामपंचायतीची इमारत दोन मजली आहे. प्रत्येक घर हे घरातील स्त्रीच्या नावावर आहे. तसं प्रत्येक घरावर ठरावीक ठिकाणी, सुवाच्य अक्षरात लिहिलेलं आहे. पहिलं नाव स्त्रीचं व त्याखाली पुरुषाचं. प्रत्येक घरासाठी वीजेचा स्वतंत्र मीटर बसवलेला आहे. घराची बिलं ही त्या घरातील स्त्रीच्या नावावर असतात. गावातील सर्व स्त्रिया, प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला ‘ग्रामसवांद’साठी ग्रामपंचायतीच्या बिल्डिंगसमोर जमतात तिथं व्यासपीठही आहे. स्त्रिया एकमेकींशी संवाद साधतात. काही समस्या असतील, तर त्यांचं निराकरण कसं करायचं ते ठरवतात. एकंदरीतच, गावातील स्त्रियांच्या विकासावर जास्त लक्ष केंद्रित केलं असं पवारांनी सांगितलं.

विद्यार्थी हे गावातील शाळा श्रमदानानं साफ ठेवतात. कोणत्या वर्गानं, कोणत्या दिवशी काय स्वच्छता करायची याचं वेळापत्रक ठरवून दिलेलं आहे आणि ते काटेकोरपणे पाळलंही जातं. शाळेत बोअरवेल सिसॉ (प्ले पंप) बसवला आहे. त्यामुळे खेळाबरोबर पंपानं पाणीही मिळतं. त्याच पाण्याचा वापर शाळेतील शौचालयं व स्वच्छतागृहांसाठी केला आहे. गावाच्या वीजपुरवठ्याची व्यवस्था चांगली केली आहे. स्वतंत्र सबस्टेशन आहे. तिथून दोन वेगळे फीडर घेतलेले आहेत. शेतीसाठी एक व घरांसाठी एक. त्यामुळे आकडे टाकून वीजेची चोरी बंद करून शंभर टक्के मीटर बसवले गेले आहेत. गावात चहाची टपरी एकही नाही. गावात दवाखाना नाही. याचा अर्थ असाही लावता येईल, की गावातील लोकांचे आरोग्य चांगले आहे. हिवरेबाजारापासून तीन किलोमीटर अंतरावर जखनी या गावी हॉस्पिटल आहे. दोन किलोमीटरवर वालकी गावात दोन डॉक्टर आहेत. नगरही सतरा किलोमीटर अंतरावर आहेच. लोकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत.

गावात पाणी साठवण्याच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या आहेत. डोंगरावरून आलेले पाणी, चर खणून जमिनीत जिरवण्याची व्यवस्था केली आहे, वरून येणारं पाणी अडवण्यासाठी बंधारे बांधले आहेत, तलाव तयार केले आहेत. त्यामुळे गावातील भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीखाली सत्तर–ऐंशी फुटांवरून वीस-पंचवीस फुटांपर्यंत आली आहे. गावात भरपूर पाणी आहे. लोकांची व शेतीची गरज भागूनही पाणी शिल्लक राहतं! गावात फक्त बीएसएनएल वापरलं जातं. गावकर्‍यांची संघटना बळकट आहे व त्यांचा सरकारवर दबावही आहे. टेलरिंग, सुतारकाम, डेअरी व्यवसाय इत्यादी रोजगार उपलब्ध झाले आहेत. स्त्रियांसाठी बचत गटाची स्थापना, को-ऑपरेटिव्ह सोसायटी, दुधाच्या डेअरीची सोसायटी, भजनी मंडळ इत्यादी उपक्रम, युथ क्लब आहेत. दुधाचं उत्पादन दिवसाला तीनशे लिटर्सवरून तीन हजार लिटर इतकं वाढलं आहे. गावाची सार्वजनिक दहनभूमी आहे.

आपल्याकडे संसाधनं भरपूर आहेत, अभाव आहे तो शिस्तीचा व नियोजनाचा, असं पवारांच्या बोलण्यात आलं, त्याचं प्रत्यंतर गावात आलं. एकशेबावीस देशांच्या प्रतिनिधींनी हिवरेबाजारला भेट दिली आहे. अजून नवीन काय प्रकल्प राबवायचे आहेत? असं मी पवारांना विचारलं तेव्हा त्यांनी बायोगॅस प्रकल्प सुरू करायचा आहे. म्हणजेच गाव ‘फुंकणीमुक्त’ करायचं आहे. त्यामुळे डोळ्यांचे आजार होणार नाहीत असं सांगितलं. पवारांनी गावात जलसंधारण, वनीकरण, शैक्षणिक प्रकल्प, आरोग्यविषयक शेती, दुग्ध- व्यवसाय तसंच सामाजिक-सांस्कृतिक… सर्वच बाबतींत योजना यशस्वीपणे राबवून गावकर्‍यांच्या सहकार्यानं गावाचा कायापालट केला आहे.

महाराष्ट्र शासनानं पवारांवर महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पाच गावं अशा प्रकारे शंभर गावांचा, हिवरेबाजारप्रमाणे कायापालट घडवून आणायचा! त्यासाठी त्यांच्या हाताखाली पंचवीस लोक काम करणार आहेत. त्यांचं ऑफिस पुण्याला आहे. पवारांशी गप्पा मारत असताना, त्यांचा साधेपणा वागण्या-बोलण्यातून, त्यांच्या देहबोलीतून जाणवत होता. त्याचप्रमाणे गावाविषयीचं प्रेम, तळमळ आपुलकी या भावनाही जाणवत होत्या. त्यांच्याशी गप्पा मारून, आम्ही स्वतंत्रपणे गावात फिरलो आणि शेवटी ‘ग्रामसंवाद’ जिथं होतो, तिथं येऊन पोचलो. तेथील आजुबाजूचा परिसर पाहत होतो, तेव्हा आमच्यानंतर पवारही तिथं आले. तेथील एका कट्ट्यावर बसून निवांतपणे वर्तमानपत्रं चाळू लागले. तिथंच आजुबाजूला, कितीतरी ग्रामस्थ आपापली कामं करत होते. पवार कोणी पुढारी नाहीत, त्यांच्यापैकीच एक आहेत असं त्यांच्या वागण्यावरुन सहज जाणवून गेलं. पवार तिथं उभे आहेत, त्यांचं दडपण जाणवत नव्हतं. अर्थात त्यांच्याबद्दल आदरयुक्त दरारा मात्र गावात आहे.

‘हिवरेबाजार’ येथे काही गोष्टींना पूर्ण बंदी आहे :

१. शेतीच्या पाण्यासाठी बोअरवेलचा वापर कोणीही करायचा नाही. तो फक्त पिण्याच्या पाण्यासाठी करायचा.
२. ज्या पिकांना भरपूर पाणी लागतं अशी पिकं…. उदाहरणार्थ ऊस, केळी लावायची नाहीत.
३. आपली जमीन, गावाबाहेरच्या परक्या माणसाला विकायची नाहीत.

पोपटरावांचे गुरू म्हणजे अण्णा हजारे. पवारांना त्यांच्याकडून अशा सामाजिक कार्यासाठी निधी कसा व कुठून मिळतो वगैरे सर्व माहिती मिळाली., ‘शिष्यात इच्छेत पराजयम’ या नात्यानं पवार हे अण्णा हजारेंच्यापेक्षाही कांकणभर पुढे गेले असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. एक कुजुबुज अशी असते, की अण्णा हजारे हे शरद पवारांना जसा हवा तसा प्रतिसाद देत नव्हते. उलट, त्यांच्या धोरणांवर टीका करत होते, म्हणून अण्णा हजारे यांचं महत्त्व कमी व्हावं या सुप्त उद्देशानं, शरद पवारांनी पोपटराव पवारांना मदत केली. पोपटराव पवारांनी एकूण सर्व परिस्थितीचा व्यवस्थित उपयोग करून घेतला आहे.

पद्मा कर्‍हाडे
९२२३२६२०२९
padmakarhade@rediffmail.com

About Post Author

41 COMMENTS

  1. रतिलाल बाबेल ,स्व.रामचंद बाबेल ट्रस्ट , धोलवड , पुणे

    आदरणीय

    आदरणीय
    आपला लेख आवडला , मी अनेक वेळा या आदर्श गावाला भेट दिली असून , आपल्या लेखाने पुन्हा एकदा भेट द्यावी अशी इच्छा व्यक्त झाली आहे. उत्कृष्ट वर्णनाबद्दल आपणास धन्यवाद

    • माझी खुप ईच्छा आहे हिरवेबाजार
      माझी खूप इच्छा आहे हिरवेबाजार गाव पाहायची. माझ्या गावातसुद्धा विकास व्हावा, माझे गावही हिरवेबाजार सारखे सुंदर व्हावे यासाठी प्रयत्न करेन. हा लेख पण खूप सुंदर होता. मला खूप आवडला.

  2. kalachi garaj asun zalelya
    kalachi garaj asun zalelya kama badal popatrao pawarache karya ubhya maharsatrache perana sthan aahe.

  3. माझी खूप इच्छा आहे हिरवेबाजार
    माझी खूप इच्छा आहे हिरवेबाजार गाव पाहायची. माझ्या गावातसुद्धा विकास व्हावा, माझे गावही हिरवेबाजार सारखे सुंदर व्हावे यासाठी प्रयत्न करेन. हा लेख पण खूप सुंदर होता. मला खूप आवडला.

  4. Popatrao Pawar saheb yanchi
    Popatrao Pawar saheb yanchi Gram vikas karnayachi prerana Maharastra v itar rajya hi ghetayet. Pawar saheb v tyancha karyas anek shubecha.

  5. आपला लेख खुप सुंदर आहे.
    आपला लेख खुप सुंदर आहे. माझ्या ही गावचा विकास व्हावा असे मनोमनी वाटू लागले आहे. त्यासाठी मी आजपासूनच सुरुवात करतो. माझही गाव सुदर हिरवगार होण्यासाठी प्रयत्न करेन. आदरणीय पोपटराव पवार यांना माझ्याकडून मन:पूर्वक शुभेच्छा!

  6. Aadarniy Popatrao Pawar
    Aadarniy Popatrao Pawar sahebancya margardarshnat aamhi sudha vidarbhat sarvat jast aslele aatmhatya grast gaon magil 4 varshyan pasun aatmhatya mukt kele aahe.v kharokharche aadarsh gaon nirman kele aahe.

  7. गणपत देवराम केदार दोडी बु ता सिन्नर (नाशिक)

    हिवरे बाजार हे गाव खरोखर
    हिवरे बाजार हे गाव खरोखर परीपुर्ण गाव आहे. वारी करावी तर ती आता पंढरपूर-आळंदीपेक्षा हिवरे बाजारचीच! माझी एकदा माझ्या सर्व गावाची हिवरे बाजारसोबत भेट घडवण्‍याची इच्‍छा आहे. एकच होवो पोपटराव पवाराचे दास, तरच होईल माझ्या दोडी गावचा विकास.
    धन्यवाद. पवार साहेब पुढील वाटचालीस शुभेच्‍छा!

  8. खरच खुप झाण लेख मी एक शासकीय
    खरच खूप छान लेख. मी एक शासकीय अधिकारी आहे. माझे गाव हिवरे बाजार सारखे नाही. पण करण्‍याची इच्छा आहे.

  9. माझे अदर्श पोपटराव पवार

    माझे आदर्श पोपटराव पवार. एक तरुण म्हणून मी खूप जवळून त्यांना भेटलेलो आहे. नक्कीच त्यांच्या विचारांवरुन आमचं गाव आम्ही आदर्श करण्याचा प्रयत्न करु. ९७६५०५८३८२.

  10. malahi hivare bazarsarkhe
    malahi hivare bazarsarkhe mazhe gav sundar ani dushkal mukta karayache ahe. tumcha lekh khup avadla. thank you.

  11. आजच्या 21व्या शतकात आनी
    तुम्‍ही आजच्या 21व्या शतकात आणि डिजिटल युगामधे खूप महान कार्य केले आहे. पोपटराव पवार साहेब, आपणास खूप खूप धन्यवाद.

  12. खुपच धन्यवाद देतो.मी हिवरे
    खूपच धन्यवाद देतो. मी हिवरे बाजाराला जाऊन आलोय. मला आणखीनही जावेसे वाटते हा लेख वाचल्यानंतर.

  13. हिवरे बाजार गावाला भेट
    हिवरे बाजार गावाला भेट दिल्यानंतर खरंच मला ह्या गावाचा हेवा वाटला, कि माझं गावही असं असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मला प्रेरणा मिळाली. घाईत असल्याने पवार यांच्याशी चर्चा झाली नाही. मात्र हा लेख वाचून झाल्यावर गावाची पुन्हा जवळून भेट झाल्याचे जाणवले. धन्यवाद.

  14. मि यापुर्वा हिवरेबाजार या
    मी यापूर्वी हिवरेबाजार या आदर्श गावाबद्दल खूप ऐकून होतो आणि आज इंटरनेटवर सर्व माहिती वाचायला मिळाली. त्यामुळे आपलंही गाव असंच आदर्श झालं पाहिजे अशी इच्छा मनात जागृत झाली. त्यामुळे आता हिवरेबाजारच्या भेटीची ओढ मनाला लागून राहिली आहे. यासंदर्भात आमच्या गावच्या सरपंच सौ. संगीताताई सरोदे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी लगेच हिवरेबाजार गावच्या भेटीचे नियोजन केले. पोपटराव पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचेही गाव लवकरच आदर्श होईल अशी अपेक्षा वाटते.

  15. आदरणीय सरजी , आपला लेख खूप
    आपला लेख खूप आवडला. आवर्जून गाव बघायची इच्छा निर्माण झाली. खरच पोपटराव पवारांना सलाम, त्यांनी केलेलं काम अवघ्या भारताला प्रेरणादायी ठरेल. आमचा भारत खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. पोपटराव पवार यांनी दाखवून दिले आहे, की खेड्यांचा विकास कसा केला पाहिजे. सर्वांच्या समोर एक आदर्श ठेवला आहे.

  16. गाडे नवनाथ भाऊसाहेब गु ग्रा पं सदस्य कोळगाव

    माझे ही गाव हिरवेबाजार
    माझे ही गाव हिरवेबाजार बनवायचंय मला फक्त आणि फक्त पोपटराव पवार यांचा आदर्श घेऊन व गावातील तरूणांना हाती धरून

  17. माझे गाव हिवरे बझार बनवण्याची
    माझे गाव हिवरे बाजार बनवण्याची इच्‍छा आहे. मला तुम्हाला भेटायचे आहे. तुमचा बहुमोल वेळ तुम्‍ही आम्हाला द्या अशी आमची अपेक्षा आहे. तुमचा contact न. आम्हाला द्या .९६२३९४३२३३

  18. pratyak gav hivars hou shakte
    pratyak gav hivare hou shakte pan tethe Popatrao pawar janmala yava lagel! Prerna ghetali tar dushkalachi chinta rahanar nahi! tayagala Salam!

  19. आपण केलेले काम खरोखरच आजच्या
    आपण केलेले काम खरोखरच आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

  20. हिवरे बाजार हे देशातील एक
    हिवरे बाजार हे देशातील एक आदर्श व विकसित गाव. याच्या मागील सर्व प्रेरणा मा. पोपटराव पवार यांची आहे. सर्वांनी यांचे अनुकरण करायला हवे.

  21. आज ही महाराष्ट्रातील अशी काही
    आज ही महाराष्ट्रातील अशी काही गावे आहेत ज्यांना हिवरे बाजार एक आदर्श गाव आहे. पवार साहेबांनी जे कार्य केले आहे ते न भूतो न भविष्य असे आहे. साहेबांच्या कीर्तिला सलाम.

  22. वाचून खुप छान वाटल खुप ऊर्जा
    वाचून खूप छान वाटलं. खूप ऊर्जा मिळाली. माझे गाव वाघोलीत हिंगणघाट जि.वर्धा हे आहे. माझ्या गावचे पंचायत समिती हिंगणघाटला सभापती आहेत. पण माझे गाव हे विकासापासून खूप दूर आहे. माझ्या गावात पोपटराव पवारांचा जन्म झाला असता तर माझे गाव पण हिवरे गाव बाजार असते यात शंका नाही. मला पण माझे गाव हिवरे बाजार करायचे आहे. त्यासाठी मी वाट्टेल ते करील. मला पोपटराव पवार यांना भेटून त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे आहे. 9860495685

  23. हिवरे बाजार है गाव पाहन्याचि
    हिवरे बाजार है गाव पाहन्याचि खुप इच्छा आहे आणि माला माझा गावातील सर्व मित्रा ना पण दाख वन्य चि इच्छा आहे लेख खुप सुंदर आहे

  24. प्रल्हाद आबासाहेब झिरपे धुमेगाव ता.गेवराइ जि.बीड

    आदरनीय पोपटराव पवार साहेब
    आदरनीय पोपटराव पवार साहेब तुम्ही छञपती शिवराया प्रमाने आदर्श ग्राम कारभार चालवत आहात तुम्हांला कोटी कोटी धण्यवाद . आम्हाला आमचे गाव आदर्श करावयाचे आहे आम्हाला मार्गदर्शन करा .ही विनंती।

  25. खरच खुपच छान लेख आहे . माझे
    खरच खुपच छान लेख आहे . माझे गावही खुपच छान आहे तरी लोक एकत्र येत नाहीत .दोन गटात विभागलेले असल्यामुळे तरूनांना योग्य सल्ला कुनीही पुढारी देत नाही व युवकही गटाचे राजकारनात रस घेऊ लागले आहेत.त्यामुळे गाव आणी विकास हे काय असतो याची कुनालाही गरज नाही . एकदा या गटाची सत्ता एकदा त्या गटाची सत्ता
    ह्या खेळामधे तरूणपिढी भरकटते आहे

  26. सर मी आपल्या कर्तबगरीतून
    सर मी आपल्या कर्तबगरीतून प्रेरणा घेऊन लवकरच माझे गाव स्मार्ट व्हिलेज म्हणून लौकिकास आणेल.

  27. मलाही माझे महाराष्ट्र
    मलाही माझे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्य़ातील माझे ” भोयरे पठार ” गाव आदर्श निर्माण करण्याची इच्छा आहे..
    गावची परिस्थिती फार गंभीर आहे साहेब……..

  28. आपला लेख खुप सुंदर आहे.
    आपला लेख खुप सुंदर आहे. माझ्या ही गावचा विकास व्हावा असे मनोमनी वाटू लागले आहे. त्यासाठी मी आजपासूनच सुरुवात करतो. माझही गाव सुदर हिरवगार होण्यासाठी प्रयत्न करेन. आदरणीय पोपटराव पवार यांना माझ्याकडून मन:पूर्वक शुभेच्छा

  29. मला ही वाटत की माझे गाव
    मला ही वाटत की माझे गाव सुध्दा हिवरे बाजारा सारखे असावे ह्या लोकांची विचार सरणी कशी बदलावी मी प्रयत्न करुन पाहिला पण पाहीजेल तसा प्रतिसाद मिळत नाही राजकारण व सरकारी निधी या मुळे त्याच्या त नैराष्य ची भावना बळकट करुन बसलि आहे

  30. गावचा विकास हिवरेबाजार आणि
    गावचा विकास हिवरेबाजार आणि पोपटराव पवार हा लेख वाचून गावाबद्दल काहितरी करावे अशी प्रेरणा मिळाली आहे. माझ्या ही गावचा विकास व्हावा असे मनोमनी वाटत आहे.त्यासाठी मी आमच्या शाळेच्या विकासास सुरुवात करतो. माझा गाव समृध्द होण्यासाठी प्रयत्न करेन. आदरणीय पोपटराव पवार यांच्या समाज सेवेस व त्यांचा आदर करणाऱ्या सर्व गावकऱ्यांना माझ्याकडून मन:पूर्वक शुभेच्छा!

  31. खरचं….. हा लेख वाचून…
    खरचं….. हा लेख वाचून गावच्या प्रगतीविषयीची संकल्पना घेऊन पोपटराव पवार यांनी गावचा साधलेला विकास अविस्मरणीय आहे…… मि खरचं खुप भारावून गेलोय…….गगनबावडा तालुक्यातील तिसंगी माझ गाव.. .. हे देखील पोपटराव पवार यांच्या प्रेरणेतून विकासाभिमुख गाव करण्याच स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा मि आणि माझे गावकरी करतील यात शंकाच नाही……

  32. Mala hiware bazaar…
    Mala hiware bazaar gawaabadal majhya 12vi chya praklpaat tar mala yaa gawaabal sarwach mahiti dwavi
    Journal work . Mala

  33. मी राजेश्वर शंकर डोडीवार, रा…
    मी राजेश्वर शंकर डोडीवार, रा. कुडेसावली, ता. गोंडपिपरी, जिल्हा. चंद्रपूर येथील रहिवासी असून मी या २३/०७/२०१९ रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आलो. हिवरे बाजार या गावाच्या विकासा बाबत खूप ऐकलं आहे. वाचलं आहे. खूप सुंदर माहिती आमच्यासारख्या ना मार्गदर्शक ठरू शकेल अशी आहे. नक्कीच आमचे गावसुध्दा तसे करण्याचा प्रयत्न करू. पुन्हा शासकीय निधी वगैरे कसा मिळवायचा. तसेच काय काय योजना असतात याची माहिती मिळाली तर फार छान होईल. सोबत वाट्सअँप नंबर देत आहे. सहकार्याचा प्रतीक्षेत. 9765021808

  34. हिवरेबाजार हे गाव आज…
    हिवरेबाजार हे गाव आज देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे. आणि मी समाजकार्याचा विद्यार्थी असल्यामुळे बारीपाडा-धुळे, भगदरी-नंदुरबार, मेंढालेखा-गडचिरोली येथे भेटी दिल्या आहेत व आदर्श गाव ही संकल्पना समजून घेणे आज प्रत्येक गावासाठी महत्वाची बाब आहे.

  35. माझी खूप इच्छा आहे…
    माझी खूप इच्छा आहे हिरवेबाजार गाव पाहायची. माझ्या गावातसुद्धा विकास व्हावा, माझे गावही हिरवेबाजार सारखे सुंदर व्हावे यासाठी प्रयत्न करेन. हा लेख पण खूप सुंदर होता. मला खूप आवडला.

  36. हिवरे बाजार या गावात आम्ही…
    हिवरे बाजार या गावात आम्ही भेटलो गांव खूप
    आवडले आमचा गांव सुध्दा आदर्श करायला आवडेल पण कसा ह्याचे मार्गदर्शन करावे
    आ . अजितकुमार बनकर
    कोळविहीरे.ता.पुरंदर जिल्हा पुणे
    ९९२२५५८६९६

  37. खूपच धन्यवाद देतो. मी हिवरे…
    खूपच धन्यवाद देतो. मी हिवरे बाजाराला जाऊन आलोय. मला आणखीनही जावेसे वाटते हा लेख वाचल्यानंतर.

Comments are closed.

Exit mobile version