सुहास मस्केची लावणी चहाच्या ठेल्यावर

14
38
carasole

सुहास मस्के यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा गावचा. त्यांचे वडील संभाजी तहसीलदार कार्यालयात लिपीक म्हणून काम करत, तर आई गृहिणी. सुहास यांना दोन भाऊ -सुधीर आणि सुनील. पाच जणांचे मध्यमवर्गीय कुटुंब. घरात शिक्षणाला पोषक वातावरण. सुहास यांनी कलाशाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केले.

सुहास म्हणतात, “वडिलांच्या बदली होत. माझे दहावीपर्यंतचे शिक्षण भूम तालुक्यात झाले. पुढे बारावी बार्शीत केली आणि पदवी शिक्षण परांड्यात केले. आमच्या वडिलांना आणि आईला वाटायचे, मुलांनी खूप शिकावे. चांगली नोकरी करावी. पदवी मिळाली पण नोकरीचा पत्ता नाही.”

त्यामुळे सुहास व्यवसायाकडे वळला. त्याने चहाचे दुकान थाटले. त्याला साहित्यात रुची होती. त्याला जगदीश खेबूडकरांची गीते, कविता वाचायला-ऐकायला आवडायच्या. त्याने 1990 नंतर कविता लिहिण्यास सुरुवात केली. सुहास यांनी पहिली कविता तेरावी-चौदावीत असताना केली. त्या कवितेला मित्रांकडून दाद मिळाली. त्यामुळे ते कविता लिहितच गेले. त्यांनी एखाददुसरी लावणीही लिहिली. अकलूजमध्ये लावणी स्पर्धा आयोजित केली जाते. सुहास सोलापुरातील ‘दैनिक सुराज्य’मध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम करत होते. ते अकलूजला गेले. सुहास त्या कार्यक्रमांना सलग दोन-तीन वर्षे जाऊ लागले. ते स्पर्धेविषयी ‘सुराज्य’मध्ये लिहू लागले.

महाराष्ट्रात दोनशे एकोणीस कला केंद्रे आहेत. सुहास गावाजवळच्या कला केंद्रांमध्ये लावणी दाखवण्यास जाऊ लागले. त्यांनी इस्लामपूर, अंबप, वठार, कोल्हापूर, सनसवाडी, टेंभुर्ली, सोलापूर, जामखेड इत्यादी ठिकाणच्या कला केंद्रांना भेटी दिल्या. कला केंद्रे सुरुवातीला एक दोनच लावण्या घेत. पण सुहास यांच्या लावण्यांना रसिकांची पसंती मिळू लागली, तसतशी कला केंद्रांकडून लावणीबाबत त्यांच्याकडे विचारणा होऊ लागली.

लावणीमध्ये विविध रूपे आहेत -जशी छक्कड, जुन्नरी, बालेघाटी, पंढरपुरी, हौद्याची इत्यादी. त्यातील जुन्नरी आणि हौद्याची लावणी ढोलकी फडाच्या तमाशात सादर होते. छक्कड ही द्रुतलयीतील उडत्या चालीतील लावणी असते, तर बालेघाटी लावणी ही रागदारी थाटातील आहे. सुहास छक्कड लावणी लिहायचे. छक्कड लावणी शृंगारिक म्हणूनही ओळखली जाते. पण सुहास यांनी नवरा-बायकोच्या भांडणाचा आधार घेऊन त्या लावणी प्रकारातून सामाजिक प्रबोधनात्मक रचना लिहिल्या.

मुंबईच्या नृत्यबिजली विजया पालव यांनी सुहास यांच्याकडे स्पर्धेसाठी लावणी लिहून देण्याबाबत विचारणा केली. त्यांनी पालव यांना हगणदारीमुक्त गाव या संकल्पनेवर छक्कड लिहून दिली. त्या छक्कडीला अकलूजच्या लावणी स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले.

ती रचना अशी होती…
गुड मॉर्निंगचा झालाय वांधा,
राया लगेच शौचालय बांधा…
रोज सकाळी पथक फिरतंया,
माझं काळीज धडधड करतंया
नाक झाकून कुठं चालायचं,
चांगल्या रस्त्याचं वाटूळ व्हायचं
सा-या घाणीचा झालाय रेंदा,
राया लगेच शौचालय बांधा…

त्यानंतर त्यांनी पुण्याच्या सारिका नगरकर यांच्या पार्टीलाही स्त्रीभ्रूण हत्येवरील छक्कड लिहून दिली. त्या छक्कडीलाही अकलूज येथे प्रथम पारितोषिक मिळाले. ती छक्कड सादर होत असताना उपस्थित सर्वच भावूक झाल्याची आठवण सुहास नमूद करतात. त्या रचनेचे बोल असे…

हट्ट तुझा पुत्राचा ठेव बाजूला, जन्मा येऊ दे आई,
आई गं होण्याला…
वाट पाहते भातुकली रमण्या खेळात
सई सखी मैत्रीण येतील अंगणात,
फुल होण्याआधी तोडू नको कळीला
जन्मा येऊ दे आई,
आई गं होण्याला…
मावशी आत्या मामी व्हायचंय मला,
इवलासा गर्भ का काढते बाजूला,
रितुन्हाणं झाकू दे पदराला,
जन्मा येऊ दे आई,
आई गं होण्याला…
सळसळत्या रक्ताची मी रणरागिणी,
जिजाऊ अहिल्या झाशीची राणी,
देश रक्षा करण्या जाईन युद्धाला
जन्मा येऊ दे आई,
आई गं होण्याला…

सोलापुरातील सागर कला केंद्र, बार्शी कला केंद्र, घुंगरू सांस्कृतिक कला केंद्र इत्यादी कला केंद्रांनी त्यांच्याकडून छक्कड लिहून घेतल्या. कला केंद्रांनी सादर केलेल्या त्यांच्या प्रत्येक छक्कडीला पारितोषिक मिळाले आहे. ते म्हणतात, “हे पारितोषिक लिहिणा-याला मिळत नाही. ते पारितोषिक छक्कड सादर करणा-या पार्टीला मिळते. कारण त्यांनी त्या छक्कडीत त्यांच्या हावभावांनी, सूरतालाने रंग भरलेले असतात. लिहिणा-याची वाहवा होते, ती मात्र पडद्यामागे.”
सुहास मस्के यांनी आतापर्यंत दीडशे लावण्या लिहिल्या. त्यांना त्यांची,

‘दिवसभर काल वाट पाहिली, निरोप नाही आला,
सांगा राया मुक्काम कुठे केला…
जागरण झालं का डोळं सुजून गेलं, गोजिरवाणं फुलं आज सुकून का गेलं
इश्काच्या या नजरेमधला बाण कुठे गेला
सांगा राया मुक्काम कुठे केला…’

ही लावणी अधिक आवडते.

त्यांनी लिहिलेल्या कविताही कौतुकास पात्र ठरल्या आहेत. 1996-97 च्या दरम्यान पुण्यात झालेल्या साहित्य कलायात्री स्पर्धेत त्यांच्या ‘जीवाभावाच्या नात्याचं मी घर बांधतोय, ममतेच्या भीकेसाठी दारोदार हिंडतोय’ या कवितेला प्रथम पारितोषिक मिळाले. त्यानंतर 1999 साली जामखेड येथे पार पडलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनातही त्यांच्या ‘विसर मला तू होते मी एक मेंदी तुझ्या हातावरची रंगून अंधूक झालेली…’ या कवितेला पहिले बक्षीस मिळाले होते.

सुहास यांची पत्नी राखी गृहिणी आहे. त्यांना दोन मुले असून मुलगी वैष्णवी आठवीत शिकते. तर मुलगा विशाल पाचवीत आहे.

सुहास त्यांचे चहाचे दुकान चालवतातच. दिवसाला जमा होणा-या शे-दीडशेच्या गल्ल्यात मदतनीसाचा खर्च झेपत नाही असे ते सांगतात. ते म्हणतात, ‘सकाळी लवकर दुकान उघडून मी स्वतःच झाडलोट करतो. टेबल, खुर्च्या साफ करतो. चहासाठी गि-हाइक आलेले असतेच, पण गल्ला कधी शे-दीडशेवर गेला नाही. त्यातच उदरनिर्वाह भागवावा लागतो.सुहास सांगतात, “साहित्यिक आणि कलाकार नेहमी अडचणीत असतो. त्याची कला दुस-यापर्यंत पोचवण्यातच फार खर्च होतो. वारंवार त्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यांनी लिखाणास पसंती दर्शवली तरी त्यातून फार मोठी रक्कम मिळत नाही. मिळते ते मानधन. काही रुपयांचे. आमच्यासारख्या कलाकाराला मान मिळतो, तोही एखाद्या दिवसापुरता. त्यानंतर मात्र तो कलाकार उपेक्षित राहतो.” सुहासची इच्छा चित्रपटासाठी लावणी लिहायला मिळावी अशी आहे.

– सुहास मस्के
9175291500
मु. पो. परांडा , जि. उस्मानाबाद

– अर्चना राणे

About Post Author

Previous articleक-हाडचा पंतप्रतिनिधींचा भुईकोट
Next articleसोलापूरची दधिमती माता
अर्चना राणे यांनी 'दैनिक प्रहार'मध्‍ये प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्‍यांनी 'लोकमत' वृत्तपत्रात शैक्षणिक तसेच साहित्य आणि सांस्कृतिक बीटसंदर्भात काम केले. राणे यांनी पर्यावरण बीटवर काम करत असताना मुंबई, ठाणे, रायगड येथील खाड्यांची स्थिती आणि तेथील जैवविविधतेवर आधारित 'बाराखाडी' ही वृत्तमालिका लिहिली होती. त्‍यांना त्‍याकरता 2013 मध्ये 'चौथा स्तंभ' पुरस्कार देण्‍यात आला. मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या 'नॉलेज एक्सप्लोरर' या शैक्षणिक मासिकाच्‍या कमात त्‍यांचा सहभाग होता. याशिवाय पुण्यातील प्रबोधन माध्यम या न्यूज एजन्सीसाठीही त्‍या कार्यरत होत्या. पर्यावरण बीटवरील उत्कृष्ट कामगिरीकरता 'दिना बामा पाटील प्रतिष्ठान'चा तर शैक्षणिक बीटवरील उत्कृष्ट कामगिरी करता 'सरस्वती चॅरिटेबल ट्रस्ट'मार्फत 2012 मध्ये आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाला होता. त्‍यांना बहुजन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संसदतर्फेही शैक्षणिक बीटवरील स्पेशल स्टोरीजसाठी 2010 मध्ये आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्‍यांनी लहान मुलांसाठी लिहिलेले 'झाडे लावूया' हे गोष्टीचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9820847339

14 COMMENTS

  1. Livni Madhya poraskar milalya
    Livni Madhya poraskar milalya
    baddhal maske yanna subhesha

  2. Suhas Maske is alumni our
    Suhas Maske is alumni our college. He was a poet in his college life. But today he has written 150 ” Lavani`s”. I feel proud to congratulate him .

  3. very very much & excellent
    very very much & excellent .best wishes for the next futures.

  4. Parandya nagaritil manmokla
    Parandya nagaritil manmokla ani samjashi nal jullela sahityik mhanje SUHAS MASKE….

  5. Our friend mr.suhas mhaske is
    Our friend mr.suhas mhaske is such a excellent ,fabulous poet..& also a lavani writer. Lavani written by him related to”FEMALE FOETICIDE” is the best one that we liked amongst all… we hope that you continue writing and get offers in movies even…hope for the best……

  6. “LITERATURE IS MIRROR OF
    “LITERATURE IS MIRROR OF SOCITY ” SMAJACHE PRATIBIMB APALYA SAHITYAT UMATAWINARA KAVI SUHAS MASKE…
    SUHAS MASKE CHE SAHITYA ANI APRITAM KAVITA YA TYNACHYA CANTIN MADHECH VACHLYA AHET……………….

  7. तुमाला देवाची देन आहे ति आशीच
    तुमाला देवाची देन आहे ति आशीच फुलत राहुदे

  8. सप्रेम नमस्कार

    सप्रेम नमस्कार
    ।।सुहास मस्केची लावणी चहाच्या ठेल्यावर।।या शिर्षकाखाली आपण घेतलेली सुहास मस्केंची मुलाखत
    वाचून आम्हाला अभिमान व आनंदच वाटतो,
    एक कष्टाळू गुणी कवि लावणीकाराची मुलाखत आपल्या वेबसाईडवर छापून सुहास मस्के यांच्या लिखानाला दिलेला न्याय व आपल्या सर्वांच्यावतीने केलेला सलामच आहे,
    प्रत्येक वर्षी अकलूज येथे होणा-या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत सुहास मस्केंच्या लावण्या या उत्कृष्ट अदाकारीने सादर होऊन रसिकांची दाद घेत प्रथम क्रमांकावर येतात, त्याच्या लिखाणातून अनेक जुन्या कविशाहीराची आम्हाला आठवण होते, याचा आम्हाला मनोमन अभिमान आहे. तुटपुंज्या उत्पनात उदरनिर्वाह करत स्वतहाचा हाँटेल व्यवसाय चालवत ते लावणी कला जपत आहेत याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार व कौतुक थोडेच आहे,अशा गुणी कवीला भावी वाटचाली आमच्या अंत:करणापासून त्रिवार शुभेच्छा.

    स्नेहांकित-
    जयसिंह मोहितेपाटील,
    {बाळदादा}
    अध्यक्ष-
    सहकार महर्षी शंकरराव मोहितेपाटील जयंती समारंभ समिती-अकलूज.

  9. लावणी हा लोककलाप्रकार लोप…
    लावणी हा लोककलाप्रकार लोप पावत चालला असताना सुहास मस्के यांनी लावणी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न चागला केलेला आहे. त्यांची लावणी सामाजिक जिवंत विषावर आहे.

Comments are closed.