Home व्यक्ती सिताफळांचा बादशहा – नवनाथ कसपटे

सिताफळांचा बादशहा – नवनाथ कसपटे

carasol1

नवनाथ कसपटे यांचे कर्तृत्व असे, की त्यांचे नाव घेतल्याबरोबर लोकांना सिताफळाची आठवण यावी! ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचे रहिवासी आहेत. नवनाथ कसपटे यांचा जन्म 1 जून 1955 रोजी बार्शी तालुक्यातील गोरमाळे या गावी झाला. वडिलांचे नाव मल्हारी आणि आईचे नाव पार्वती. कसपटे यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झाले. त्यांना दोन मुले आहेत. एका मुलाचे शिक्षण बारावी  पर्यंत झाले  आहे तर दुसऱ्या मुलाने डी. फार्मसी केले आहे.

कसपटे यांच्या लहानपणी त्यांच्या आईवडिलांची पस्तीस एकर शेती होती. त्यांनी शेतात चिकू, पेरू, आंबा व पपई यांची लागवड केली. त्यांच्या शेतात, 1985 मध्ये बोअरवेलला पाणी लागले. तत्पूर्वी त्‍यांच्‍या शेतात कोरडवाहू भुसार पिके घेतली जात असत. मात्र पाणी लागल्यानंतर कसपटे फळबागांकडे वळले आणि शेतीत परिवर्तन सुरू झाले. कसपटे यांनी वीस एकर शेतात द्राक्षे लावली, चांगले उत्पन्न येऊ लागले. इतके, की कसपटे द्राक्षे निर्यात करू लागले! त्यांनी जवळ जवळ पंचवीस वर्षे द्राक्षे निर्यात केली. त्यांच्या द्राक्षांच्या निमित्ताने त्यांना ‘युरोगॅप  सर्टिफिकेशन’ सोलापूर जिल्ह्यात प्रथमच मिळाले! शेतक-यांकडून शेतामध्ये पॅकिंग शेड, संडास बाथरूम, वॉश बेशिन इत्यादींची उभारणी केली जाते का? तसेच मजुरांची आरोग्य तपासणी, सर्व औषधांचे फवारणी वेळापत्रक या सर्व गोष्टींची नोंद ठेवणे, अशा सर्व गोष्टी शेतकरी नियमाप्रमाणे करतात का याची शेतावर जाऊन सर्व पाहणी करून ऑडिट केले जाते. त्यानंतर ज्याप्रमाणे कारखान्यांना ‘आयएसओ’ प्रमाणपत्र दिले जाते त्याचप्रमाणे शेतातील रेकॉर्ड आणि प्रत्यक्ष पाहणी करून ‘युरोगॅप सर्टिफिकेशन’ दिले जाते. कसपटे यांनी शेतावर मजुरांसाठी खोल्या बांधल्या असून निवाऱ्याची चांगली सोय केली आहे. ‘युरोगॅप सर्टिफिकेशन’मुळे कसपटेंना नावलौकिक मिळाला. त्यांची सर्वाधिक द्राक्ष निर्यात झाल्यामुळे महाराष्ट्रातून एकमेव निवड करून त्यांना मार्केटिंगच्या अभ्यासासाठी ‘महाग्रेप’ने लंडनला पाठवले.

पासष्ट बोअरवेल झाले तरीसुद्धा शेतात पाणी खूपच कमी प्रमाणात होते. काही पर्यायी करावे असे कसपटे यांना वाटू लागले. दिवसेंदिवस ती इच्छा बळावत गेली. बार्शीचे कृषी अधिकारी वि.ग. राऊळ यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र आणले, चर्चा होऊ लागल्या. चर्चेच्या मंथनातून काही चांगले प्रकट झाले व ‘अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघ’ स्थापन झाला. त्याचे फळ म्हणजे राज्यात साठ हजार हेक्टर जमिनीत सिताफळाची लागवड करण्यात आली.

‘अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघ’, पुणे ही NGO संस्था आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. संघाचे वर्षातून एकदा महाराष्ट्रात कोठेही राज्यव्यापी सीताफळ चर्चासत्र घेतले जाते. संघाने कृषिमंत्री शरद पवार यांच्या कडून सीताफळ संशोधन केंद्राकरिता आठ कोटी रुपये मंजूर करून घेतले. त्याचपैकी चार कोटी रुपये बीड येथील आंबेजोगाई संशोधन केंद्राच्या बळकटीसाठी देण्यात आले, तर उर्वरित चार कोटी पुरंदर तालुक्यातील जाधववाडी येथे नवीन सीताफळ संशोधन केंद्रास दिले. जगातील पहिला सिताफळ संघ ऑस्ट्रेलियात तर दुसरा संघ भारतात आहे. सिताफळ संघातील वीस सदस्यांनी ऑस्ट्रेलिया येथील जागतिक सीताफळ चर्चासत्रात सहभाग घेतला होता. त्‍यांनी तेथील सीताफळांच्‍या शेतात जाऊन अभ्यास केला. सीताफळ संघात एकट्या बार्शी तालुक्यातील दीडशे सभासद आहेत. दीडशेपैकी दहा ते पंधरा लोक सिताफळाची शेती करणारे आहेत.

कसपटे हे कार्यक्षम व अभ्यासू आहेत. त्यांची सिताफळाची बाग बघून थक्क व्हायला होते. त्यांच्या कष्टांची पाहणाऱ्याला कल्पना येते. त्यांच्या शेतात बत्तीस जातींची सिताफळे आहेत. नवनाथ कसपटे यांनी निरीक्षणातून NMK1 (गोल्डन) व NMK2, NMK3 आणि फिंगर प्रिंट या चार जाती विकसित केल्या. कसपटे यांनी सिताफळांच्या नव्या जातींना नावे देताना स्वतःच्या ‘नवनाथ मल्हारी कसपटे’ नावातील आद्याक्षरांचा वापर केला. त्या जातींपैकी NMK1 (गोल्डन) ही सीताफळाची जात सर्वोत्तम आहे. कसपटे यांची सिताफळ उत्पादनात स्पेशालिटी झाली आहे. त्यांनी विकसित केलेल्या जातींच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.

कसपटे सिताफळांची निर्यात परदेशी करतात. मात्र मुंबई ही त्यांची मुख्य बाजारपेठ आहे. NMK1 (गोल्डन) हे सिताफळ दुसऱ्या सिताफळांपेक्षा मोठे देखणे व चवीला गोड आहे. इतर सिताफळांच्या तुलनेत NMK1 (गोल्डन) या सीताफळात बिया कमी असतात. झाडावरून पिकलेले फळ पडले तर ते दबते, पण फुटत नाही. फळ झाडावर पंधरा दिवस व झाडावरून काढल्यावर आठ दिवस टिकते. दुसऱ्या जातीच्या सिताफळांत तीस ते पस्तीस टक्के गर असतो, तर NMK1(गोल्डन) सिताफळात पन्नास टक्के गर असतो. सिताफळांचा एकरी खर्च लागवडी नंतर दरवर्षी पंधरा हजार ते वीस हजार रुपये इतका येतो, तर उत्पन्न चार ते साडेचार लाख रुपयांपर्यंत येऊ शकते. सिताफळांना पाणी कमी लागते.

नवनाथ कसपटे यांनी 2002 पासून नर्सरी चालू केली आहे. रोपांची लागवड बारा महिने केली जाऊ शकते. पण सिताफळांच्या लागवडीचा काळ जुन -जुलै हा योग्य मानला जातो.

आफ्रिकेतील काही लोकांनी इंटरनेटवर पाहून कसपटे यांच्या शेतीला भेट दिली व  2014 साली सिताफळांची रोपे घेऊन गेले आहेत.

कसपटे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांपैकी पुढील काही –

1. सोलापूर जिल्हा परिषदेचा कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार  -1994
2. सर्वाधिक द्राक्षे निर्यातीचा महाग्रेपचा   पुरस्कार – 1997-98
3. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ पुरस्कृत कृषिभूषण राज्य पुरस्कार – 2008
4. गुजरात सरकारचा श्रेष्ठ किसान पुरस्कार, गांधी नगर, गुजरात – सप्टेंबर 2013
5. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (ATMA) अंतर्गत सिताफळ लागवड आणि पणन तंत्रज्ञान प्रसार व प्रचार प्रकल्प.
6. कै . वसंतराव नाईक कृषी माल निर्यात पुरस्कार . 2004
7. औरंगाबाद गुनीजन साहित्य संमेलनात बळीराजा  पुरस्कार. 2006-07
8. बळीराजा  मासिकाचा लेखन गौरव पुरस्कार . 2005
9. पुणे येथील भगवंत मित्रमंडळाचा भगवंतरत्न पुरस्कार .
10. सुरज क्रिडा व संस्कृतिक मंडळ बार्शी यांचा जीवन गौरव पुरस्कार . 2005-06
11. रोटरी क्लब सोलापूर शेती क्षेत्रातील कामगिरीबाबत पुरस्कार . 2005-06

नवनाथ कसपटे सिताफळांविषयी भरभरून बोलतात. त्यातून त्यांचा सिताफळ पिकाविषयीचा व्यासंग, अभ्यास व त्यांची त्या विषयाची रुची लक्षात येते. कसपटे जेवढे अभ्यासू वृत्तीचे तितकेच नम्रही आहेत. त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रयोगांमध्ये आस्था वाटते. कसपटे यांच्या शेतीतील प्रयोगांचे अनुकरण करून इतर अनेक शेतक-यांनी स्वतःचा उत्कर्ष साधला आहे. त्यापैकी बार्शीचे राजेंद्र देशमुख (09822248478) आणि उस्मानाबादमधील भागवत गोडसे (07875774952) या यशस्वी शेतक-यांची नावे उदाहरणादाखल सांगता येतील.

कसपटे यांचे शेतीतील प्रयोग आणि त्‍यांची सिताफळे यांची ख्‍याती सर्वदूर पसरलेली आहे. पंजाब नॅशनल युनिव्हर्सिटीमधून योगेश गुप्ता (09041074172) हा विद्यार्थी कसपटे यांच्‍या सिताफळांचा अभ्‍यास करण्‍यासाठी त्‍यांच्‍याकडे आला. तो तीन वर्षे कसपटे यांच्या शेतावर राहिला आणि त्याने त्याची NMK1 (गोल्डन) या सीताफळाच्या जातीवर पीएच.डी. पूर्ण केली!

नवनाथ कसपटे
09822669727,
nmkaspate@yahoo.com

– उज्ज्वला क्षीरसागर

About Post Author

94 COMMENTS

  1. सिताफळाच्या आपल्या
    सिताफळाच्या आपल्या यशस्वीतेबाबत, प्रयोगशील कृतीबाबत मी भारावलो आहे. अापली शेती बघण्याची, NMK1gold सिताफळ लावण्याची माझी इच्छा आहे.आपले मला मार्गदर्शन हवे. कसे मिळेल? माझा फोन नं.9822740555.आपला फोन नं कळल्यास मी आपल्याशी संपर्क साधतो. काही साहित्य असल्यास कळवावे. ते मला हवेत. त्‍याची किंमत मी देईन. माझा पत्ता – प्रकाश बोंबटकर,गिताईनगर,गोपुरी,वर्धा (महाराष्‍ट्र)

  2. खुप छान !!

    खूप छान! आणि मला पण वाटतं सिताफळ लावावीत. कृपा करुन रोपे अन् लागवड याबद्दल मार्गदर्शन करावे. 🙂 माझा पत्ता – मु पो नायगाव, ता. कळंब, जी. उस्मानाबाद. – 7875719229

  3. सर तुम्ही केलेले प्रयोग आनि
    सर तुम्ही केलेले प्रयोग आणि सिताफळाचे व्यवस्थापन हे खूपच छान आहे. आमच्याकडे डोंगराळ भाग आहे व सर्व जिरायत क्षेत्र असल्याने आम्ही 25 शेतकरी मिळून सिताफळ लागवड करण्याचे ठरवले आहे. तरी आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे.

  4. मला सिताफळ लागवड करायची आहे
    मला सिताफळ लागवड करायची आहे. चोपण जमिनीवर सिताफळ लागवड करता येईल का? माहिती द्यावी ही विनंती. 9421001270.

  5. बाळानगर जातिचे ५ एकर आहे आनखी
    बाळानगर जातीचे ५ एकर आहे. आणखी ८ एकर लावायची आहे तरी nmk1 ला पाणी जादा लागते. कोणती जात लावावी? मो. ९५४५३९६९८१ बाळानगरचे रोपे मिळतील.

  6. मला nmk1 gold जातीे सिताफळ
    मला nmk1 gold जाती सिताफळ रोपे हवी आहेत. nmk1 ला आवश्‍यक असलेल्‍या पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती हवी आहे.

  7. मला सिताफळाचे पिक शेतात
    मला सिताफळाचे पिक शेतात घ्यायचे आहे. कोणत्या जातीचे सिताफळ लावावे याबद्दल मार्गदर्शन हवे. मो. न. 9371783388.

  8. मला पण सिताफळांचि लागवड
    मला पण सिताफळांची लागवड करावयाची आहे. मार्गदर्शन करावे ९५६१५९७०५१.

  9. बाळासाहेब बोरकर ,वडझिरे,ता,पारनेर.जि.अ.नगर

    मला सीताफळ लागवड करायची आहे
    मला सीताफळ लागवड करायची आहे. मार्गदर्शन हवे.

  10. मी मु. पो. चिंचपूर पांगुळ ता.
    मी मु. पो. चिंचपूर पांगुळ ता. पाथर्डी जि. अहमदनगर येथे राहतो. मला सिताफळांची लागवड करायाची आहे. कोरडवाहू जमिनित सदर लागवड करता येईल काय? त्यासाठी कोणत्या जातीची निवड करावी व ती रोपे कोणत्या ठिकाणी मिळतील?

  11. संतोषभोईर मु, तमनाथ ता कर्जत जिल्हा रायगड

    खूप चांगली प्रगती आहे मी हे
    खूप चांगली प्रगती आहे. मी हे आपण विकसित केलेले सीताफळ पाहिले. खूप मोठे आहे .सुंदर आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा!

  12. कांतिलाल अरूण फड़तरे मुपो शिरभावी ता सांगोला जि सोलापुर

    मला सिताफळ लागवड करायची आहे
    मला सिताफळ लागवड करायची आहे तर गोलड़न आणि आणेणा 2 विषयी माहीती हावी

  13. Nmk1 सिताफळ रोप मिळेलका
    Nmk1 सिताफळ रोप मिळेल का

  14. मला सीताफळ लागवड करायची आहे ,
    मला सीताफळ लागवड करायची आहे , कोणती प्रजाती लावावी

  15. सिताफळ शेतकरी
    सिताफळ शेतकरी

  16. मला पन नविन शिताफळ लागवड
    मला पन नविन शिताफळ लागवड करायची आहे काळीची जमीन चालते का

  17. खुप दीवसा पासन लावाची ईच्छा
    खुप दीवसा पासन लावाची ईच्छा आहे आणी आज सापडले थोडी मदत करा?

  18. खुप छान मला n m k 1 जातीचे
    खुप छान मला n m k 1 जातीचे पाणी नियोजन व लागवडी नंतर फळे कधी येतात. फळांचे वजन सरासरी किती असते माहीती हवी आहे .मो.8805723591.

  19. माझ्या बागेतील 1
    माझ्या बागेतील 1 झाडालासीताफळ लागली असुन ती काळी पडतात कृपया उपाय सांगा .

  20. पुरुषोत्‍तम मनोहर पाचपोर मु.पो.बाभुळगाव ता. पातूर जि. अकोला

    मला एनएमके1 गोल्‍ड या जातीचे
    मला एनएमके1 गोल्‍ड या जातीचे बियाणे पाहीजे कोठे मिळेल या बाबत माहीती सांगा.९७६३८६६६९९

  21. मला पण सिताफळांची लागवड
    मला पण सिताफळांची लागवड करावयाची आहे. मार्गदर्शन करावे ९४०४४९३४३९

  22. मला सीताफळ लागवड करायची आहे,
    मला सीताफळ लागवड करायची आहे, माझी जमीन काळी आहे, कोणती जात लावावी कृपया आपले मार्गदर्शन मिळावे. मो ७८७५४४५३२५

  23. तुम्ही निर्माण केलेल्या
    तुम्ही निर्माण केलेल्या सिताफळ फार छान आहे मला तीन एकर वर बाग निर्माण करायची आहे आपले मार्गदर्शन आणि कलमे पाहिजे.कलमा चे दर आणि केव्हा मिळेल.

  24. तुम्ही निर्माण केलेल्या
    तुम्ही निर्माण केलेल्या सिताफळ फार छान आहे मला तीन एकर वर बाग निर्माण करायची आहे आपले मार्गदर्शन आणि कलमे पाहिजे.कलमा चे दर आणि केव्हा मिळेल.

  25. शेतीचे फोटो हवे होते
    शेतीचे फोटो हवे होते

  26. सिताफळविषयी सविस्तर माहिती
    सिताफळविषयी सविस्तर माहिती मिळाली.
    लागवडीसाठी रोप कोठे मिळतील व दरविषयी अधिक माहिती हवी

  27. नमस्कार nmk 1 लागवड करावयाची
    नमस्कार nmk 1 लागवड करावयाची आहे. त्यासाठी माहिती मिळाली तर बरे होईल आणि पाणी किती लागेल

  28. मी माझ्या शेतात (ॲनोना-2
    मी माझ्या शेतात (ॲनोना-2)जातीच्या सिताफळाची लागवड केली आहे . पहील्यांदा खूप अडचणीला सामोरे जावे लागले.
    पण नंतर मला भरपूर फायदा झाला.
    address – at.pusra Tq.Wadwani
    Dist.Beed
    Mo.9673974402
    9049874793

    submitted by- Ganesh Naikwade
    Date:-31-12-2016

  29. मला NMK 1 (Gold ) ह्या
    मला NMK 1 (Gold ) ह्या सितारा की लागवड करायची आहे आपले सुंदर मार्गदर्शन हवे आहे माझा पत्ता जिल्हा:- नाशिक

  30. सिताफळ लागवडी बदल माहीती
    सिताफळ लागवडी बदल माहीती दयावी 9765334446

  31. माझी शेती भूरमूठी आहे मला
    माझी शेती भूरमूठी आहे मला सीताफळ लावायचा आहे तरी मला माहीत हवी

  32. 1हेक्टर साठी किती रोपांची
    1हेक्टर साठी किती रोपांची लागवड करावी लागेल ?

  33. सऱ मला सिताफळाची लावगड करायची
    सऱ मला सिताफळाची लावगड करायची आहे. आपले मागरदरषन हवे आहे.

  34. श्री कैलास विजयराव नागरे मु पो सोनोशी ता सिं राजा जि बुलढाणा

    सीताफल लागवड करायची आहे मध्यम
    सीताफल लागवड करायची आहे मध्यम साधारण जमीन आहे

  35. सीताफळ खत व्यस्थापन बद्दल
    सीताफळ खत व्यस्थापन बद्दल माहिती द्यावी

  36. गाव: करकंब ता पंढरपूर येथे
    गाव: करकंब ता पंढरपूर येथे आमची १५ ऐकर
    बाळानगर सिताफळाची बाग आहे जोपासणे
    बाबत मला जरूर माहीती मिळावी
    मो.७०५८७५२५८४

  37. सिताफळाची लागवड करायची आहे
    सिताफळाची लागवड करायची आहे कोण्या जातीची करावी वआपल्या कडेरोपे आहेका याची माहिती द्या

  38. मला सीताफळ लावायचे आहे कोणती…
    मला सीताफळ लावायचे आहे कोणती जात व रोप कुठे मिलातील. कृपया माहिती द्या मो ९६७३८८९३७९ / ९६६५२६८१२९

  39. मलाही सिताफळ लागवड करायची…
    मलाही सिताफळ लागवड करायची आहे तरी मला रोपे पाहिजेत माझी शेती फलटण तालुक्यात आहे तरी फलटण जवळपास कोठे रोपे भेटतील कृपया मला सहकार्य करा मो.9665471125

  40. mala 1200 balanagar sitafal…
    mala 1200 balanagar sitafal Zade lavayachi krupaya bhav VA kashi poch milel

  41. मला सिताफल हवे आहेत रोज 5000…
    मला सिताफल हवे आहेत रोज 5000 किलो

  42. मला NMK1 (गोल्डन) या जातीचे…
    मला NMK1 (गोल्डन) या जातीचे बियाणे ठाणे -पालघर या भागात लागवड व रोपे तयार करून विकण्यासाठी ठेवायची आहेत. तरी हे बी व लहान रोप कुठे मिळेल याही माहिती द्यावी. ८०८७०२०८७९

  43. एन.एम.के १ गोल्डन या जातीचे…
    एन.एम.के १ गोल्डन या जातीचे बियाणे मुंबई-ठाणे येथे कुठे मिळेल, किमान १००० रोपे खरेदी करायची असल्यास कुठे संपर्क करावा याची माहिती द्यावी.

  44. माजी शेती dongral bhagat आहे…
    माजी शेती dongral bhagat आहे. सीताफल गेता येइल का

  45. NMK1 (गोल्डन) या सीताफ रोपे…
    NMK1 (गोल्डन) या सीताफ रोपे हवी आहेत mob no 9545700047 Baswaraj Tanwade

  46. सर, मला सिताफळ लावय़ाची आहे…
    सर, मला सिताफळ लावय़ाची आहे त्या करीता तुमचे मार्गदशन खुप महत्वाचे आहे. माझी विनंति आहे तुम्हाला माझा मो. 9822233737

  47. mala custer apple chi rope…
    mala custer apple chi rope kuthun miltil me nashik yethe rahato krupaya mahiti dyavi.

  48. mala sitafal lagvad karaychi…
    mala sitafal lagvad karaychi aahe tumi shetat yeun margdarshan dyal kay plz
    8975886964

  49. गावरान व नवीन जातीचे…
    गावरान व नवीन जातीचे सिताफळाच्या लागवड बाबत मार्गदर्शन करावे.ही नम्र विनंती

  50. सर मला शिताफळा लागवड करायची…
    सर मला शिताफळा लागवड करायची
    मला माहीती द्या

  51. चार एकर सीताफळ लावायचे आहे …
    चार एकर सीताफळ लावायचे आहे .जमीन साधारण मुरमाड आहे .मार्गदर्शन करावे ही विनंती .

  52. नमस्ते सर, पारंपारीक शेतीचा…
    नमस्ते सर, पारंपारीक शेतीचा कंटाळा आलाआहे सर मि सिताफळ लागवड करण्याचे ठरवले आहे तरी मला NMK1 जातीची जून2018ला 400 रोपे हवी आहेत.

  53. मला MNK1या जातीची 400 रोपटी…
    मला MNK1या जातीची 400 रोपटी हवी आहेत9096757750

  54. मी जि.प. शिक्षक असून मला…
    मी जि.प. शिक्षक असून मला माझ्या तीन एकर कोरडवाहू शेतात सीताफळाची लावगड करायची आहे. सिताफळाची जात कोणती लावावी. कारण माझ्या शेतात पाण्याची सोय नाही. पाण्याविना रोपे जगतील का. कृपया मार्गदर्शन करावे. राहुल नरवाडे मो.न. 9595909791,9689028390

  55. धंन्यवाद खूप छान माहिती…
    धंन्यवाद खूप छान माहिती मिळाली माझी पण सिताफळ लागवड करावी इच्छा आहे रोपे कुठे मिळतील माझी कोरडवाहू शेती आहे पाणी नियोजन कसे करावे मो. ९१७५४२८२२३

  56. mala sitaphalachi lagvad…
    mala sitaphalachi lagvad karaychi tari aamachya bhagat water problem aahe march paryant tari pani tikte trai plz aaple margdarshan milave
    cont. 9762986240 sattishshelke

  57. MAST… HATS OFF TO THE NMK…
    MAST… HATS OFF TO THE NMK..

    THANK YOU UJWALAJI .. DUE TO YOU ONLY WE CAME TO KNOW ABOUT THE BRILLIANCY.

  58. Khup changle ahe Kami…
    Khup changle ahe Kami kharchat ani mehanitun aapan viswa Norman keel manacha mujara

  59. मला सीताफल लागवड करायची आहे…
    मला सीताफल लागवड करायची आहे.कोणती जात लावावी.मार्गदर्शन करावे

  60. मला सीताफल लागवड करायची आहे…
    मला सीताफल लागवड करायची आहे.कोणती जात लावावी.मार्गदर्शन करावे
    किशोर नवले
    9860649498

  61. सर,प्रथमता तुमचे आभार तुम्ही…
    सर,प्रथमता तुमचे आभार तुम्ही नविन सुधारीत सिताफळ वाण विकसीत केला. मलाही यातुन प्रेरणा मिळाली आणि सिताफळ लागवड करण्याचे ठरवले तरी मला पुर्ण माहीती मिळावी.

  62. आपली रोप वाटीक शासन मान्य…
    आपली रोप वाटीक शासन मान्य आहे का?? शासन अनुदानास पात्र आहे का??? मोबाईल नंबर 9921099925

  63. सर माला पन सिता लागवड…
    सर माला पन सिता लागवड करावायाचि आहे.तरी सला देवा.ही नम् विनंती.७५८८५३६९८० घनशाम साठे.१३.०७.२०१८

  64. मला सीताफळ लागवड करायची आहे…
    मला सीताफळ लागवड करायची आहे व ती कशी करायची ते सांगा 7757948598

  65. आम्ही तूमच्याकडचीचNMK1 ही…
    आम्ही तूमच्याकडचीचNMK1 ही जात लावली असून एक वर्ष झाले आहे तरी त्याचे वव्यस्थापन छाटनी कशा पध्दतीने करावी?मो.९६२३७२०१७३

  66. सर,
    मी संजय बाळासाहेब उगले…

    सर,
    मी संजय बाळासाहेब उगले मु देवसडे ता नेवासा जि अ नगर आमची जमीन भारी काळी आहे या जमिनीत सीताफळ लागवड करता येईल का? प्लिज आपले मार्गदर्शन हवे आहे. माझा व्हॅटस ऍप नं
    9422538385

  67. मला सीताफळाच्या लागवडीचे…
    मला सीताफळाच्या लागवडीचे प्रशिक्षण हवे आहे,कधी मिळेल,07588627374.

  68. सिताफळ लागवड करावी असा विचार…
    सिताफळ लागवड करावी असा विचार मनात आहे तरी रोपांच्या किमती बद्दल मार्गदर्शन करावे

  69. सर,प्रथमता तुमचे आभार तुम्ही…
    सर,प्रथमता तुमचे आभार तुम्ही नविन सुधारीत सिताफळ वाण विकसीत केला. मलाही यातुन प्रेरणा मिळाली आणि सिताफळ लागवड करण्याचे ठरवले तरी मला पुर्ण माहीती मिळावी.मला ही रोपे घ्यायचे आहे
    मी जालना भराडखेडा येथील रहिवासी आहे
    9834400239

  70. माझी वडीलो पार्जित शेती आहे…
    माझी वडीलो पार्जित शेती आहे. मला सिताफळ लागवड करायचे आहे. त्या बाबत मार्ग दर्शन पाहिजे होते. कृपया हि विनंती .
    Jagdish wankhede 8308939384

  71. सर,प्रथमता तुमचे आभार…
    सर, प्रथम तुमचे आभार. धन्यवाद छान माहिती मिळाली. तुम्हाला खूप शुभेच्छा!
    मला माझ्या चार एकर कोरडवाहू शेतात सीताफळाची लागवड करायची आहे. सिताफळाची जात कोणती लावावी. कारण माझ्या शेतात पाण्याची सोय नाही. पाण्याविना रोपे जगतील का. कृपया मार्गदर्शन करावे. 9860530151
    धनराज थोरात, किल्ले धारूर, जिल्हा बीड.

  72. सर माझी डाळींब बाची बाग होति…
    सर माझी डाळींबाची बाग होती. ती मागील वर्षी दुष्काळामुळे काढून टाकली. त्यामुळे नुकसान झाले आहे तरी आपण मार्गदर्शन करावे.

  73. सर मला शिताफळा लागवड करायची…
    सर मला शिताफळा लागवड करायची
    मला माहीती द्या.
    एनएमके1 गोल्‍ड या जातीचे बियाणे पाहीजे कोठे मिळेल

  74. मला तीन एकर सीताफळ लागवड…
    मला तीन एकर सीताफळ लागवड करायची आहे आपले मार्गदर्शन पाहिजेत

  75. mi latur yethil sugaon ya…
    mi latur yethil sugaon ya gavacha ahe mala shetacha bandhavar aapli nmk1 ya jatichi rope kashi miltil krapaya mahiti dyavi.majha no 7620378706

  76. मला NMK GOLDAN च कलम करायच…
    मला NMK GOLDAN च कलम करायच आहे. माझ्या कडे साधी रोपे आहेत त्याला कलम करायचे आहे. Contact NO. 8459315830 AMOL

  77. मी NMK1 Golden वाणाच्या…
    मी NMK1 Golden वाणाच्या सिताफळ रोपांच्या शोधात आहे. आपल्याकडे रोपं उपलब्ध आहेत का? अथवा खात्रीशीर रोपे कुठं मिळतील, याबाबत माहिती द्यावी. साधारण एक एकर क्षेत्रावर लागवड करायची आहे.

  78. खूपच छान माहिती आहे .रोपांची…
    खूपच छान माहिती आहे .रोपांची उपलब्धता
    लागवड माहिती, व्यवस्थापन याविषयीची सविस्तर माहिती मिळेल का मी लागवडीसाठी इच्छुक आहे

  79. Mala sitafal lagwad…
    Mala sitafal lagwad karayachi aahe market and ropababt mahiti deva

  80. 8792723972 मला रोपे कुठं…
    8792723972 मला रोपे कुठं भेटतील

  81. वर्तमान पत्रातील तुमची बातमी…
    वर्तमान पत्रातील तुमची बातमी वाचुन यंदा सिताफळ लागवड करायचिच आस ठरवले आहे,तत्पुर्वी आपल्या मधुबन फार्मला भेट द्यायची आहे. .9922041965

  82. आपले नाव मी बरीच वर्षांपासुन…
    आपले नाव मी बरीच वर्षांपासुन ऐकले आहे.सिताफळ या फळाकरीता आपले प्रयत्न खरोखर स्तुत्य आहे,यामुळे माझी सुद्धा सिताफळ लागवडीची ईच्छा आहे,
    माझे३एकर बोअरवेलची शेती आहे मार्गदर्शन करावे, सिताफळाची जात,लागवड,कालावधी इत्यादी माहिती द्याव

  83. साधारण एक एकर क्षेत्रावर…
    साधारण एक एकर क्षेत्रावर लागवड करायची आहे. तरी आपण मार्गदर्शन करावे.
    mob. no 9970361877

  84. Sir you are great to…
    Sir you are great to discover NMK1 VARIETY . I WANT TO CULTIVATE CUSTARAPPLE ON MY 2 ACRE FIELD PLEASE GUIDE ME ABOUT PACKAGE OF PRACTICES.
    BHAGWAN SHELGE FROM UDGIR
    8390978279

  85. मला सिताफळा विषयी खूप आवड…
    मला सिताफळा विषयी खूप आवड आहे मला आपला प्रयोग यशस्वी वाटला मीही माझ्या रानात एक एकर सीताफळाची बाग लागवड करण्यास उत्सुक आहे तरी मला आपण मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

Comments are closed.

Exit mobile version