कोरोनाची साथ ही धुळे जिल्ह्यापुरती तरी इतिहासाचीपुनरावृत्तीहोतआहे!यापूर्वी अठराव्या, एकोणिसाव्या आणि विसाव्या अशा तिन्ही शतकांतसाधारण याच वर्षाच्या सुमारास धुळे जिल्ह्यात साथीच्या रोगांचा फैलाव झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. साथीच्याआजारांमुळे 1720 मध्येतत्कालीनखानदेशातकायधुळधाणउडालीअसेलयासंबंधीचाअधिकृततपशीलउपलब्धनाही. तथापि 1820 आणि 1920 मधीलमाहिती वाचण्यास मिळू शकते. या तिन्ही शतकातमहामारीची साथ जणू योजनाबध्दपध्दतीनेआलेली भासते.प्रत्येकशतकातविषाणूंच्यासंसर्गातूनविविधदेशांमध्येसाथींचाफैलावझालाआणिमोठ्याप्रमाणावरजीवितहानीझाली.तसे दाखलेइतिहासातआहेत.त्यातडाख्यातधुळेजिल्हादेखीलसापडलाहोताहेसंदर्भग्रंथांतआढळूनयेते.
खानदेशपरिसर1818 मध्येपेशवे–होळकरांच्याताब्यातूनइंग्रजांच्याताब्यातगेलाहोता. त्यामुळेविविधअहवालांच्यामाध्यमातूनअधिकृतमाहितीउपलब्धहोऊशकते. खानदेशचापहिलाब्रिटिशकलेक्टरकॅप्टन जॉनब्रिग्जयाच्याकारकिर्दीवरआधारित‘JOHN BRIGGS IN MAHARASHTRA‘हेअरविंददेशपांडेयांचेपुस्तकप्रसिद्ध आहे. त्यातसाथीच्याआजारांमुळेउद्भ्वलेल्यापरिस्थितीचाधावताउल्लेखआहे.कॉलराहावारंवारउद्भवणाराआजार1817 ते 1820 याकालावधीतहोता. सामान्यनागरिकांप्रमाणेसैन्यदलातीलजवानदेखीलकॉल–याच्यातडाख्यातसापडलेहोते. पाचशे कॉलराबाधितसैनिकांपैकीचौऱ्याऐंशीजणमृत्युमुखीपडल्याचाउल्लेखब्रिग्जयांनीपाठवलेल्या1818 च्या अहवालातआहे.
संपूर्णधुळेशहरकॉलरासाथीच्याविळख्यात1819 मध्येसापडलेहोते. तीसाथलवकरच परिसरातीलगावांतपसरलीआणिग्रामस्थांचेस्थलांतरसुरूझाले. खेडीओसपडली. कॉल–यामुळेअकराहजारपाचशे एकवीसमृत्यूजुलै 1819 अखेर झाल्याचाउल्लेखत्यापुस्तकातआहे. साथीचाउद्रेक रांजणगावयागावात, पुन्हामार्च 1820 मध्येझालाआणिएकाआठवड्यातसत्याऐंशी जणमृत्युमुखीपडले.एका छोट्या गावात असा हाहाकार माजल्याचे दुसरे उदाहरण नसावे. तेरांजणगावनेमकेकोणतेयासंबंधीचाउल्लेखमात्रसापडतनाही.त्यावेळीधुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगावआणिबागलाण हा सारापरिसरमिळूनखानदेशहाएकजिल्हाहोता. यापैकी धुळे जिल्ह्यात रांजणगाव नक्की नाही. ते चाळीसगावजवळ असल्याचे कळते.
धुळेकरांनास्पॅनिशफ्लूयासाथीच्याआजारानेमगरमिठीतआवळण्याससुरुवात1901मध्येकेल्याचेदिसते. धुळेनगरपालिकेसशंभरवर्षेपूर्णझाल्याबद्दल 1962 मध्येएकस्मरणिकाप्रकाशितकरण्यातआली. त्यास्मरणिकेमध्येस्पॅनिशफ्लूचा उल्लेखसाथीचाप्लेगअसाआहे. त्यासाथीचाशिरकाव धुळयात1901मध्येझाला. त्यावेळीतीनशेतेवीसजणमृत्युमुखीपडले. परंतुशहरातीललोकांनीगावाबाहेरस्थलांतरकेल्यामुळेपुढीलप्राणहानीटळली. मात्र 1902 आणि 1903 यावर्षीत्यासाथीच्याआजारानेधुळेशहरासभयंकरतडाखादिला आणि 20 सप्टेंबर 1902 पर्यंतएकशेसतरा जणमृत्युमुखीपडले. नगरपालिकाप्रशासनानेनागरिकांनाअन्यत्रहलवण्याचा प्रयत्न1903 मध्येकसोशीनेकेला.परंतुत्याला पावसामुळेफारसेयशआलेनाही. त्यासाथीनेदोन हजार सहाशेत्र्याऐंशी जणांचाबळीघेतला. विशेषम्हणजेत्यावेळीधुळेशहराचीलोकसंख्याअवघीसत्तावीस हजार होती.
त्यासाथीचाअंमल1905 पर्यंत होता. नगरपालिकेच्यादप्तरीअसलेल्यामाहितीमध्येप्लेगमुळेझालेल्यामानवहानीचेआकडेदेण्यातआलेआहेत. लागण 1905 नंतरतुरळकहोतअसे. त्यासाथीनेपुन्हा1916मध्ये डोकेवरकाढले. त्यावेळी सातशेजणांचाबळीत्यासाथीच्याआजारानेघेतला.
संजय झेंडे हे धुळ्याचे. त्यांनी पुणे येथून M.Lib. अभ्यासक्रमाची पदवी घेतली. ते दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’चे धुळे जिल्हा प्रतिनिधी 1993-2014 पर्यंत होते. त्यांनी पंचवीस वर्षे पत्रकारिता केली. संजय झेंडे यांच्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील जलसंधारणविषयक प्रयोगांची माहिती देणारी कव्हर स्टोरी `जलसंवाद` मासिकाच्या माध्यमातून प्रसिध्द होत आहे. त्यांनी धुळे जिल्ह्याशी संबंधित विविध प्रश्नांवर, तसेच धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्यांविषयी लिखाण केले आहे. त्यांना तडवी भिल्लांच्या सांस्कृतिक इतिहासाचा शोध घेण्यासाठी ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई’ तर्फे आणि तापी खो-यातील जल वळण योजनांचा अभ्यासकरण्यासाठी ‘उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा’ तर्फे फेलोशिप मिळाली.
संजय झेंडे यांचे खान्देश इतिहास खंड -1 व 2 मध्ये ‘तडवी भिल्लांसंबंधी लेख’ व ‘समर्थ धुळे जिल्हा 2020’ या पुस्तकामध्ये ‘धुळे जिल्ह्याच्या प्रगतीचा वेध’ हे दोन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी नदीजोड प्रकल्पावर आधारित `मंत्र जल व्यवस्थापनाचा` हे पुस्तक (2008) लिहिले आहे. झेंडे यांना पां.वा. गाडगीळ पुरस्कार (1992), अतुलभाई जोशी विकास पत्रकारिता पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकार (2002) असे सन्मान प्राप्त झाले आहेत. ते तापी खोरे गॅझेटिअर सदृष्य ग्रंथ निर्मिती प्रकल्पाचे समन्वयक आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9657717679
झेंडे सर …ससंदर्भ माहिती .