संमेलन अध्यक्षांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे

0
35
_Aruna_Dhere_1.jpg

एका वृत्तवाहिनीवर डॉ. अरुणा ढेरे यांची मुलाखत पाहिली (२ नोव्हेंबर २०१८). त्यातील प्रश्नाचे स्वरूप हे नवनिर्वाचित साहित्य संमेलन अध्यक्ष या मुख्यत्वे कवयत्री आहेत आणि मग ललित लेखक, कथाकार, संशोधक वगैरे… हे लक्षात घेऊन ठेवले नव्हते.

संशोधन हा त्यांच्या साहित्यिक वाटचालीचा मूळ गाभा नव्हे. साहित्यिक प्रगल्भता आणि प्रकांडता या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, याची जाणीव ठेवून त्यांच्याकडून अपेक्षा कराव्यात.

एकाच लेखकाकडून तो/ती अध्यक्ष झाले, की त्याच्या/तिच्याकडून सर्वच रोगांवर अक्सर इलाज अशा ‘कैलास जीवनी’ अपेक्षा ठेवल्या की हाती काही लागत नाही.

मराठी साहित्याचे काय होणार? बालसाहित्य मागे का? आपण पाश्चात्य साहित्याच्या तुलनेत कोठे आहोत? मराठी अभिजात भाषा आहे का/होणार का? असले अवघड प्रश्न विचारू नयेत. त्याची उत्तरे शोधण्यासाठी हाडाची काडे करावी लागतात. शेवटी, एका माणसांत य.दि. फडके/ग्रेस /श्री.ना. पेंडसे/नरहर कुरुंदकर थोडेच सापडणार आहेत?

– शुभा परांजपे, पुणे

About Post Author