संत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali)

संत सावता माळी हे नामदेवकालीन संत कवी. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या जवळ अरणभेंडी या गावात शके 1152 मध्ये झाला. त्यांच्यामुळे अरणभेंडी हे क्षेत्र झाले. त्यांच्या पित्याचे नाव परसूबा, आईचे नाव नांगिताबाई. पत्नीचे नाव जनाबाई. अरणभेंडी येथे ज्या मळ्यात सावता माळी भाज्या पिकवता पिकवता विठ्ठलभक्ती करत, त्या मळ्यातच विठ्ठलाला पाहत. त्यांनी त्यांचा देहदेखील त्या मळ्यातच विठ्ठलाचे नाम घेत ठेवला. त्या ठिकाणी समाधिमंदिर बांधण्यात आले आहे. पंढरपूरला जाताना भक्तमंडळी आवर्जून अरणभेंडी येथे थांबतात आणि सावता महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. संत सावता माळी यांनी त्यांच्या अभंगांमधून आणि जगण्यामधून कर्म हाच ईश्वर हा संदेश महाराष्ट्राला दिला.

संत सावता माळी यांनी हे सांगितले, की परमेश्वराची आराधना करताना भाव महत्त्वाचा असतो. मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांपेक्षा भक्तिभाव हा खरा. त्यांनी मानवता धर्म हा महत्त्वाचा मानला.

सावता माळी यांनी त्यांचा ‘माळ्या’चा धर्म आचरत, शेती करत करत परमेश्वराची आराधना केली. शेतात भरपूर कष्ट करावेत, लोकांना खरा मानवता धर्म समाजावून सांगावा. त्यांच्या मनातील अंधश्रद्धांचे तण उपटून काढून समाजमनाची मशागत करावी, समाजात जागृती करावी या हेतूने सावता माळी अभंग लिहीत, कीर्तन करत. सावता माळी हे बंडखोर, कर्ते सुधारकच होते असे म्हणावे लागेल.

सावता माळी यांच्या गावाजवळ पंढरपूर आहे, परंतु ते कधीही पंढरपूरला जात नसत. सावता यांना तेथील संतांच्या मांदियाळीत सामील होण्याची इच्छा झाली नाही. त्यांना वाटे, की ते जातीचे माळी आहेत. त्यामुळे त्यांनी मनापासून शेतीत-मातीत राबावे, पिकांची मशागत करावी, गाईगुरांना प्रेमाने सांभाळावे. शेतीला पाणी द्यावे, चांगले भरघोस पीक काढावे, अडल्यानडल्यांना मदत करावी हीच खरी पांडुरंग भक्ती आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे ते शेतीत रमत. ते शेती सोडून कुठेच कधी गेले नाहीत.

एके दिवशी, पंढरपूरला जाणाऱ्या वारक-यांची दिंडी त्यांच्या शेताजवळच्या रस्त्यावरून चालली होती. सावता माळी यांनी त्यांच्या भजनांचा, टाळमृदंगाचा आवाज ऐकला आणि ते शेतातून बाहेर आले. त्यांनी त्या वारकऱ्यांची पाणी, भाकरी, फळे, फुले देऊन पूजा केली. निघताना सावता यांनी त्यांच्या पायांवर डोके टेकवले व ते म्हणाले, “पंढरपूरला निघाला आहात. पांडुरंगाला माझाही नमस्कार सांगा.” वारकरी चकित झाले. त्यांना वाटले, अरणभेंडी तर पंढरपूरच्या वाटेवरच, किती जवळ आहे, मग ते त्यांच्याबरोबर का येत नाहीत? त्यांनी त्यांच्या मनातील शंका सावता यांना विचारली. तेव्हा सावता माळी उद्गारले, “मी कसा येऊ? मी आलो तर देव माझ्यावर रुसेल. मला रागवेल.” वारक-यांनी विचारले, “का रागावेल?” त्यावर सावता माळी यांनी सांगितले, “अहो, माझा पांडुरंग या शेतात राहतो. या शेतात-मळ्यात राबणे, भाज्या-फळे पिकवणे, वाटसरूला भाकरी देणे हीच माझी विठ्ठलभक्ती. हा मळा हेच माझे पंढरपूर! ही ज्वारीची ताटे म्हणजे माझ्या पांडुरंगाची कमरेवर हात ठेवलेली जिवंत रूपे आहेत. ही सळसळणारी पाने, ही उडणारी पाखरे, हे झुळझुळ वाहणारे पाणी विठ्ठलभक्तीचीच तर गाणी सदासर्वदा गात आहेत. हे सर्व येथे, या मळ्यात आहे, तर मी पंढरपूरला येऊन काय करू? ”

त्यांचे हे बोल ऐकून वारकरी खजील झाले. पांडुरंग केवळ मूर्तीत नाही तर आपण जे रोजचे काम करतो ते हसतमुखाने, मनापासून करण्यात पांडुरंगाची खरी भेट होते. असा संदेशच सावता माळी यांनी त्यांना दिला होता! संत एकनाथ त्यांच्याविषयी म्हणतात, “एका जनार्दनी सावता तो धन्य | तयाचे महिमान न कळे काही” ज्ञानदेव-नामदेव यांच्याबरोबर ते तीर्थयात्रेला गेले होते. त्यांना संत ज्ञानदेव-नामदेव यांचा सहवास लाभला. त्यांचे भावविश्व नामदेवांच्या उपदेशाने भारावून गेले होते. त्यांची दृढ श्रध्दा कर्मावर होती. ज्ञानेश्वरांनी सावता माळी यांना ‘भक्ती, कर्माचे आगर’ असे संबोधले आहे. संत सावता माळी यांच्या जीवनात भक्ती आणि कर्म यांचा मनोज्ञ संगम झाला होता. श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला कर्मयोग त्यांनी आचरणात आणला. ईश्वरदत्त कार्य निष्ठेने, श्रद्धेने, मनापासून करणे म्हणजे खरी ईश्वराची सेवा आहे. भक्ती आहे. कर्माशिवाय धर्म घडत नाही, भगवंत भावाचा भुकेला आहे, कर्मकांडाचा नाही, हा मौलिक विचार त्यांनी त्यांच्या अभंगांतून प्रभावीपणे मांडला आहे. कामात देव पाहणारा तो कर्मयोगी संत म्हणतो.

कांदा, मुळा, भाजी | अवघी विठाई माझी ||
लसुण, मिरची, कोथिंबिर | अवघा झाला माझा हरी ||
अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आमुचि माळियाची जात | शेत लावू बागाईत ||
आम्हा हाती मोट नाडा | पाणी जाते फुलझाडा ||
चाफा, शेवंती फुलली | प्रेमे जाईजुई व्याली ||
सावताने केला मळा | विठ्ठल देखियला डोळा ||

असे अभंग गात सावता महाराज त्यांच्या मळ्यात अखंड काम करत असत. पिकांना पाणी देताना, खुरपताना मुखाने अखंड हरिनाम घेत असत, म्हणून त्यांच्या जीवनात शांतता होती.

अरणभेंडी गावात त्यांच्याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. ती दंतकथा अशी आहे, की पैठणच्या कूर्मदास या अपंग भक्ताच्या बोलावण्यावरून प्रत्यक्ष विठ्ठल त्याला भेटण्यास निघाले असताना, वाटेत ते सावतोबाच्या मळ्यात थांबले. त्यांनी बरोबर संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांनाही घेतले होते. विठ्ठलाच्या मनात नामदेवांना भक्तीची पराकाष्ठा किती असते ते दाखवायचे होते. विठ्ठल त्या दोघांची नजर चुकवून सावता माळी यांच्यासमोर उभे राहिले आणि त्यांनी सावतोबांना घट्ट मिठी मारली. म्हणाले, “सावतोबा, माझ्या मागे दोन चोर लागलेत. मला पटकन् कोठेतरी लपव.” त्यावर सावतोबा म्हणाले, “देवा, अशी कोणती जागा आहे, जेथे तू कोणाला दिसणार नाहीस?” विठ्ठल म्हणाले, “मग तू मला तुझ्या उदरात लपव.” त्याबरोबर सावता माळी यांनी खुरपे घेऊन आपले पोट फाडले व देवास त्यात लपवले! इकडे, देवाचा शोध घेत घेत ज्ञानदेव, नामदेव सावता महाराजांपाशी आले आणि म्हणाले, “आमचा देव पाहिला आहे का तुम्ही?” सावता माळी यांनी काहीच उत्तर दिले नाही. नामदेवांनी देवाचा धावा सुरू केला. ते विठ्ठलभेटीसाठी व्याकूळ झाले. विठ्ठलाला ते पाहवेना. त्यांनी सावतास सांगितले, “काढ रे मला बाहेर, माझ्या वियोगाने त्याचा जीव जाईल.” तेव्हा सावतोबाने पुन्हा खुरप्याने पोट फाडून पांडुरंगास बाहेर काढले! सावतोबांना त्यांच्या उदरात प्रत्यक्ष विठ्ठलाने वास केला याचा परमानंद झाला. त्यांनी तो

 

 

‘सर्व सुखाचे सुख निर्मळ | कैसे दिसत आहे श्रीमुख निर्मळा ||
सावत्या स्वामी परब्रम्हपुतळा | तनुमनाची कुरवंडी ओवाळा ||’

अशा शब्दांत व्यक्त केला.

संत सावता महाराज आजारी पडल्यावर, त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केला आणि ते अखंड नामस्मरण करू लागले. त्यांनी त्यांचा देह पांडुरंगाला अर्पण करण्याचा निश्चय केला आणि ते शके 1217 मध्ये आषाढात पांडुरंगचरणी विलीन झाले! अरणभेंडी या गावात सावता महाराजांच्या शेतातच त्यांचे समाधिमंदिर बांधण्यात आले. त्यांनी मळ्यात जेथे देह ठेवला तेथेच त्यांच्या स्मृती जतन करून ठेवल्या गेल्या.

सावता यांच्यासारख्याच साधेपणाने त्यांचे समाधिमंदिर उभे आहे. गाभाऱ्यात विठ्ठल-रखुमाईची आणि सावता महाराजांची प्रसन्न मूर्ती आहे. सावतोबांचे अभंग भिंतीवर चारी बाजूंनी कोरलेले आहेत. वीणाधा-याच्या वीणेच्या झंकारात अहोरात्र मंदिर भरून जाते. लोक विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतात, सावता महाराजांच्या मूर्तीच्या पायांवर मस्तक टेकवतात, वीणाधाऱ्याच्या पुढे झुकतात आणि प्रसादाचे साखरफुटाणे खात खात, सावतोबांच्या अभंगांचे वाचन करतात. प्रपंच आणि परमार्थ एकच असल्याचे म्हणणारे, कांदा-मुळा, भाजीत विठ्ठल पाहणारे, मोट-नाडा-विहीर-दोरी यांनी अवघी पंढरी व्यापली आहे असे म्हणणारे सावता माळी त्यांना अभंगा अभंगातून भेटत राहतात. देवळातून मागच्या दरवाज्यात आले, की सावता यांच्या हिरव्यागार शेताच्या, निळ्याभोर आभाळाच्या पार्श्वभूमीवर भलामोठा वृक्ष सळसळत असलेला त्यांना दिसतो आणि त्या वृक्षावर किलबिलाट करत थव्याथव्यांनी उतरणारे पोपट, इतर पक्षी बघून आणि तेथील नीरव, शांत, प्रसन्न वातावरणात केवळ त्या वृक्षाची सळसळ आणि पक्ष्यांची गोड किलबिल ऐकत माणसे घटका-दोन घटका समाधिमग्न होतात. जणू तो मळा, ते आकाश, ती भल्यामोठ्या वृक्षाची सळसळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट यांतून त्यांना सावता माळी यांचा पांडुरंगच भेटायला आलेला असतो!
– अंजली कुळकर्णी

 

About Post Author

106 COMMENTS

  1. आपण संग्रहीत केलेल्या या
    आपण संग्रहीत केलेल्या या माहीती मूळे आम्हाला आमचे आराध्य देवता सावता माळी यांची माहीती मिळाली आणी ती आमच्यासाठी फार महत्वाची आहे
    मी आपले फार आभार मानतो
    धन्यवाद

  2. चांगली माहिती दिलीत धन्यवादः
    चांगली माहिती दिलीत धन्यवादः

  3. मला संत सावता महाराज याची
    मला संत सावता महाराज यांची माहिती मिळाली. मी एक माळीच आहे. धन्यवाद.

  4. खुप चागंली माहिती मिळाली

    खूप चांगली माहिती मिळाली. माझा माळी समाजात जन्म झाला याचा मला अभिमान आहे.

  5. संत सावता माळी यांचे अभंग
    संत सावता माळी यांचे अभंग लेखन करणारे काशिबा गुरव यांच्याविषयी माहिती द्या.

  6. खूप चांगली माहिती मिळाली.
    खूप चांगली माहिती मिळाली. माझा माळी समाजात जन्म झाला याचा मला अभिमान आहे. श्री.संत सावता माळी मंडळ दौलावडगाव आपले हार्दिक स्वागत करीत आहे. 9763555914

  7. मला संत सावता माळी

    मला संत सावता माळी यांची माहीती मिळाल्याबद्दल धन्यवाद. – सुनिल ननवरे

  8. कोण माळी?
    कोण माळी? कुठल्या कुळी? अजुन जात धर्म मपल्या भाळी ! विठ्याचा बुक्का मर हटृ कपाळी. आजि देखली कपाळकरंट्यांची मांदियाळी!

  9. खूप छान माहिती। असाच उपक्रम
    खूप छान माहिती। असाच उपक्रम चालू ठेवा।। धन्यवाद।।

  10. संत सावता माळी महाराज यांच्या
    संत सावता माळी महाराज यांच्या बद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे मी आपला खूप खूप आभारी आहे. कृपया करून महाराजांचे जास्तीत जास्त फोटो अपलोड करावेत हि विनंती. जय सावता महाराज.

  11. संत सावता माळी महाराज यांच्या
    संत सावता माळी महाराज यांच्या बद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे मी आपला खूप खूप आभारी आहे. कृपया करून महाराजांचे जास्तीत जास्त फोटो अपलोड करावेत हि विनंती. जय सावता महाराज.

  12. सावता माळी यांच्याबद्दल
    सावता माळी यांच्याबद्दल इतक्या मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून आभार. आपल्या या उपक्रमाला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा. जय सावता.

  13. गिताराम कोंडीराम साळुंके मु अमळनेर ताराहुरी

    माळी समाज साठी आतिशय मोठा आशे
    आपण माळी समाजासाठी अतिशय मोठे असे काम करत आहात. शतशः नमन.

  14. ही माहिती अतिशय चांगली आहे
    ही माहिती अतिशय चांगली आहे.

  15. आपण दिलेली माहिती अतिशय
    आपण दिलेली माहिती अतिशय महत्त्वाची वाटली. यामुळे संत शिरोमणी सावता महाराज यांचा जीवन परिचय झाला, त्यांच्या कार्याचा परिचय झाला. त्यांचे सर्व अभंग वाचनास मिळावेत. त्यांच्या कार्यावर एम. फिल., पीएच. डी. संशोधने व्हावीत.

  16. खुुप छान माहिती असाच उपक्रम
    खूप छान माहिती. असाच उपक्रम चालू ठेवा.

  17. संंत शिरोमणी सावता
    संंत शिरोमणी सावता महाराजांंबद्दल छान माहिती मिळाली. धन्यवाद

  18. चागली माहीती मीळाली
    चांगली माहीती मिळाली.

  19. आपण खुप चांगली माहिती पूरवत
    आपण खूप चांगली माहिती पुरवत आहात.

  20. आपण संत सावतामाळी यांची खुप
    आपण संत सावतामाळी यांची खूप छान माहिती दिली. अशीच समाज जागृती पुढे चालत राहो ही सावतामाळी चरणी प्रार्थना. धन्यवाद.

  21. चांगली माहिती दिली धनवाद
    चांगली माहिती दिली धनवाद

  22. खूप छान माहिती दिली .धन्यवाद
    खूप छान माहिती दिली .धन्यवाद Jay Savta Mali.

  23. माळी मायति खुप छान

    माळी माहिती खूप छान. धन्यवाद

  24. आमुचि माळियाची जात | शेत लावू
    आमुचि माळियाची जात | शेत लावू बागाईत ||

  25. फारच सुंदर

    फारच सुंदर. या कामी आपणास कोटि कोटी प्रणाम आणि लाख लाख शुभेच्छा
    महाराजांचे अभंग अर्थास असावे अपेक्षा. लबडे महाराज अहमदनगर 9850561249

  26. माझ शेत माझा सावता (जय सावता)
    माझ शेत माझा सावता (जय सावता)

  27. खुपचांगली माहिती मिळाली
    खुपचांगली माहिती मिळाली धन्यवाद

  28. खुप चांगली माहीती आहे आजच्या
    खुप चांगली माहीती आहे आजच्या तरुन पिढिला याची नितांत गरज आहे

  29. जय ज्योती जय क्रांती
    जय ज्योती जय क्रांती

  30. कांदा मुळा भाजी अवघी विठाई
    कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी .असा संदेश खरच आजच्या काळातही उपयोगी आहे.कामातच राम आहे हेच खरे.आपण कोणत्याही क्षेत्रात काम करा पण सर्वोत्तम करा.हीच खरी सावता महाराजांना आदरांजली ठरेल.असे मला वाटते. जय सावता.

  31. अतिशय छान माहिती दिल्या बद्दल
    अतिशय छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

  32. सं सावता माळी याचा पुनतिथि
    सं सावता माळी याचा पुनतिथि निमित हादीक शुभछा

  33. nice mi aapla khup khup
    nice mi aapla khup khup aabhari aahe ki tumcha muly maza vvshajachi mahiti milali

  34. चांगली माहीती दिल्या बदधल मी
    चांगली माहीती दिल्या बदधल मी मनापासून अभीनंदन करतो धन्यवाद

  35. मला सावता महाराज यांची
    मला सावता महाराज यांची कहानीआवडली

  36. खुप छान माहीती मिळाली हा
    खुप छान माहीती मिळाली हा उपक्रम असाच पुठे चालु ठेवावा धन्यवाद

  37. आपण संग्रहीत केलेल्या या
    आपण संग्रहीत केलेल्या या माहीती मूळे आम्हाला आमचे आराध्य देवता सावता माळी यांची माहीती मिळाली आणी ती आमच्यासाठी फार महत्वाची आहे मी आपले फार आभार मानतो धन्यवाद

  38. एकदम झ्क्क्क्क्कास
    एकदम झ्क्क्क्क्कास

  39. मला अरण ला जायच आहे तरी मला
    मला अरण ला जायच आहे तरी मला माहीती द्या

  40. श्रीसंत सावता ची कथा वाचून मन
    श्रीसंत सावता ची कथा वाचून मन प्रसन्न झाले. सावता महाराजचे महात्म्य

  41. 9822830797उकृष्ट माहीती आहे
    9822830797उकृष्ट माहीती आहे हा वाटसॅपनंबर आहे

  42. वाचुन खुप आनंद झाला मला
    वाचुन खुप आनंद झाला मला आभिमान आहे मी माळी आसल्याचा

  43. रानकृृष्णहरी….संत शिरोमणी…
    रानकृृष्णहरी….संत शिरोमणी यांचे थोडक्यात दिलेले चरित्र स्तुत्य आहे.संकलन कर्त्यांना शतश:नमन…धन्यवाद…

  44. आमचे आराध्य दैवत श्री संत…
    आमचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सांवता महाराजा ची माहिती मिळाल्या
    बाबत मी तुमचा खूप आभारी आहे माळी सेना शेंगाव शहर आपले हार्दिक अभिनंदन करतो .मी सुरज शेगोकार माळी

  45. सावता माळी यांच्याबद्दल…
    सावता माळी यांच्याबद्दल इतक्या मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून आभार. आपल्या या उपक्रमाला
    माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा. जय सावता.
    vilas jayprakash kandalkar
    kurum ta -murtizapur
    dist – AKOLA

  46. खुप छान माहिती…
    खुप छान माहिती.
    आपण माळी समाजासाठी अतिशय मोठे असे काम करत आहात. शतशः नमन.

  47. संत सावता महाराज ग्रंथ अॉप…
    संत सावता महाराज ग्रंथ अॉप किंवा पिडीएफ मध्य उपलब्ध करुन द्यावा ही विनंती
    धन्यवाद

  48. Dear All, Very nice &…
    Dear All, Very nice & collective information is shared here..Thank you for the efforts.
    More added improvement in data will be advantage

  49. खुप छान आहे माहिती
    खुप छान आहे माहिती

  50. संथ सावता महाराज खरच खूप…
    संथ सावता महाराज खरच खूप समाज सेवक व विठ्ठल भक्त होते, आज याची माहिती वाचून खूप छान वाटले, आपण ही माहिती आम्हा पर्यंत उपलब्ध करून दिली त्या बद्दल धन्यवाद,

  51. खुप खुप छान माहिती सागितली…
    खुप खुप छान माहिती सागितली. संत सावतामाळी महाराज हे भक्ती अभंगातून समाजकल्याणा तून लोकांना जिवन जगण्याचा एक चांगला संदेश देत असे जय संत सावतामहाराजकी जय

  52. छान माहीती…श्रीकृष्ण म…
    छान माहीती…श्रीकृष्ण म. असंबे 10/08/18

  53. रामकृष्णहरी…
    छान माहिती…

    रामकृष्णहरी…
    छान माहिती दिल्याबद्दल आभार….

  54. किशोर जाधव कविटखेडा तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद

    संत शिरोमणी सावता महाराज…
    संत शिरोमणी सावता महाराज यांच्या जिवन चरीत्र चा ऊजाळा करुन दीला त्या बद्दल लेखकाचे आभार

  55. खुप छान माहिती मिळाली…?…
    खुप छान माहिती मिळाली…? अशीच माहिती आपल्या पुठच्या पिठीला पण मिळावी…हिच अपेक्षा व्यक्त करतो…धन्यवाद
    २०/०८/२०१८

  56. खुप सुंदर माहिती मिळाली मि…
    खुप सुंदर माहिती मिळाली मि शाळेत मुलांना मिहिती देतो

  57. नवीन पिढीला मार्गदर्शक अशी…
    नवीन पिढीला मार्गदर्शक अशी सावता महाराजांबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद…..

  58. व्हॉट्सफ ग्रुप तयार करून…
    व्हॉट्सफ ग्रुप तयार करून एकजूट करायला सुरुवात केली पाहिजे

  59. मला संत सावतामाळी याची खुप…
    मला संत सावतामाळी याची खुप छान माहिती मिळाली समाजात जागृती पुढे चालत राहो हीच प्रार्थना करतो…..

  60. खूप छान उपक्रम,
    आम्ही…

    खूप छान उपक्रम,
    आम्ही भक्तीच्या मळ्यात जन्मलो हेच आमचे भाग्य.

  61. आपन दिलेली माहिती खूपच सुंदर…
    आपन दिलेली माहिती खूपच सुंदर आहे यात संपूर्ण असा इतिहास माहिती मिळतो तसाच संत सावतोबांचे अभंग वाचतांना मनाला फार आनंद होतो… खूप छान माहिती आहे .
    धन्य सावतोबा
    परब्रह्म विठोबा
    राम कृष्ण हरी।।

  62. Jay Jay vithoba Rukhmai
    Sant…

    जय जय विठोबा रखुमाई, संत सावता माळी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. खूपच छान संत चरित्र. धन्यवाद.

  63. संत सावता माळी यांच्या विषयी…
    संत सावता माळी यांच्या विषयी खूप चांगली माहिती दिलीत दिलीत. अशीच समाज जागृती आपल्या हातात होत राहो सदिच्छा.

  64. संत सावता माळी यांच्या विषयी…
    संत सावता माळी यांच्याविषयी खूप चांगली माहिती दिलीत. अशीच समाज जागृती तुमच्या माध्यमातून होत राहो. सदिच्छा.

  65. खुप सुंदर माहिती
    खुप सुंदर माहिती.

  66. खूप छान माहिती. असाच उपक्रम…
    खूप छान माहिती. असाच उपक्रम चालू ठेवा.

  67. चांगली माहीत दिली धन्यवाद…
    चांगली माहीत दिली धन्यवाद धाडगे आदिनाथ

  68. खरोखरच ही माहीती लाखमोलाची…
    खरोखरच ही माहीती लाखमोलाची आहे. यामुळे सावता महाराजाची खरी माहीती लोकापर्यत पोहचते व प्रबोधन होते. ही माहीती अपार कष्ट घेवुन संग्रहीत केल्या बद्दल अभिनंदन तुकाराम डांगे.

  69. खरोखरच ही माहीती लाखमोलाची…
    खरोखरच ही माहीती लाखमोलाची आहे. सावता महाराजाची खरी माहिती लोकांपर्यंत पोचते व समाज प्रबोधन होते आणि ही माहिती अपार कष्ट घेऊन संग्रहीत केल्याबद्दल अभिनंदन. तुकाराम डांगे सलगरा खु

  70. खूप छान माहिती मी जस सावता…
    खूप छान माहिती मी जस सावता महाराजांच्या ग्रंथा मध्ये वाचन केले तीच माहिती दिली खूप छान या उपक्रमाला हार्दिक शुभेच्या जय हरी, जय सावता
    केशव बचाटे हरतखेड,ता,अंबड,जी,जालना

  71. सावता माझा मी सावता चा जय…
    सावता माझा मी सावता चा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय सावता महाराज बीड_७_८_२०१९

  72. आपन दिलेली माहिती खूपच सुंदर…
    आपन दिलेली माहिती खूपच सुंदर आहे. वाचुन खुप आनंद झाला. मला आभिमान आहे मी माळी आसल्याचा. धन्यवाद.

    Vijay Raghunath Inamke

  73. महाराष्ट्रातील या आपल्या…
    महाराष्ट्रातील या आपल्या महान संत शिरोमणीचे तीर्थ क्षेत्राचा विकास होण्यासाठी सर्व माळी बांधवांनी एकत्र येऊन घरटी किमान रुपये 100 जमा करावेत आणि योग्य त्या सोई सुविथा निर्माण करणे गरजेचे आहे. कारण माळी समाजाचे आमदार सत्तेत गेल्यावर बेईमान होतात. म्हणून आपणच पुढाकार घेऊन काम केले पाहिजे.

  74. खरच खूप छान माहिती आहे…
    खरच खूप छान माहिती आहे…..
    आनंद वाटला. ९४२०४६८४००

  75. अतिशय छान माहिती आहे
    अतिशय छान माहिती आहे.

  76. कोणतेही काम श्रध्देने…
    कोणतेही काम श्रध्देने मनापासून केले तर ती सुद्धा भक्तीच आहे. मुर्तीपुजा आणि कर्मकांड यापेक्षा भक्तीभाव खरा ,जो आपल्या कर्मात असतो याची शिकवण संतश्रेष्ठ सावतामाळी यांनी संपूर्ण जगाला दिली.

  77. माहीती छान मिळाली.परंतु…
    माहीती छान मिळाली.परंतु माहितीचा दर्जा वाढवण्यास खुप संधी आहे.

  78. आमचे आराध्य दैवत संत सावता…
    आमचे आराध्य दैवत संत सावता माळी यांच्याविषयी सविस्तर माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद मानतो..असेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावरील लेखन प्रसिद्ध करावे विनंती..
    ईश्वर महाजन शिक्षक तथा पत्रकार अमळनेर
    9860352960

  79. छान माहिती
    छान माहिती

  80. संत सावता महाराज यांच्या…
    संत सावता महाराज यांच्या बद्दल जी माहिती तुम्ही उपलब्ध करून दिली त्यामुळे खूप लोकांच्या जीवनात बदल होऊन ते पण कामातच विठ्ठल आहे असे समजून घेऊन ते पण अशीच विठ्ठल भक्ती करेन . धन्यवाद

  81. ‘संतश्रेष्ठ सावतामाळी’…
    ‘संतश्रेष्ठ सावतामाळी’ सविस्तर माहिती बद्दल प्रथमतः धंन्यवाद आता विनंती कि मंदिराचा नव्याने फोटो घ्या.

  82. संत ज्ञानेश्वर व संत नामदेव…
    संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांचा सहवास लाभलेले सत सावतामाळी हे ‘कांदा मुळा भाजी।अवघी विठाई माझी।।’असे म्हणत ते खर्या अर्थाने भगवद्गीतेतील कर्मयोग जगले. आज आषाढ वद्य चतुर्दशी. त्यांना विनम्रपणे साष्टांग नमस्कार. आपल्या लेखामुळे छान माहिती मिळाली. धन्यवाद.

  83. संत ज्ञानेश्वर व संत नामदेव…
    संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांचा सहवास लाभलेले सत सावतामाळी हे ‘कांदा मुळा भाजी।अवघी विठाई माझी।।’असे म्हणत ते खर्या अर्थाने भगवद्गीतेतील कर्मयोग जगले. आज आषाढ वद्य चतुर्दशी. त्यांना विनम्रपणे साष्टांग नमस्कार. आपल्या लेखामुळे छान माहिती मिळाली. धन्यवाद.

  84. खरोखरच आपण दिलेली माहिती…
    खरोखरच आपण दिलेली माहिती अभ्यासपूर्ण निश्चितच आहे तसेच सावता माळी हे महान संत परंपरेतील महत्वपूर्ण संत होते हे सांगण्याचा आपण प्रयत्न केला धन्यवाद!

  85. आपण संत सावता माळी यांची जी…
    आपण संत सावता माळी यांची जी माहिती दिली आहे ती अतिशय महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्रात संतांचे कार्य हे खूप महान होते. त्यापैकीच संत सावता यांचेही नाव घ्यावे लागेल. आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद!

  86. माहिती खूपच सुंदर व परिपूर्ण…
    माहिती खूपच सुंदर व परिपूर्ण असून संत वचन आणि त्यांची शिकवण मानवाच्या उद्धारासाठी आहे.

  87. माहीती मिलाली,आभार व्यक्त…
    माहीती मिलाली,आभार व्यक्त करतो अशीच माहीती मिलत राहो.

  88. Jay savata mali.
    Given…

    Jay savata mali.

    Given information is very good and nice
    Request you yo please uploade more pictures of shri savata maharaj

  89. खूप छान माहिती.. वाचुन खुप…
    खूप छान माहिती.. वाचुन खुप आनंद झाला.

  90. छान माहिति,
    धन्यवाद !!!!…

    छान माहिति,
    धन्यवाद !!!!

    अरुण ताजने,संगमनेर .जि.अहमदनगर

  91. apan dileli v puravleli…
    apan dileli v puravleli mahiti khup molachi ahe. ..mala Ph.D. karita khup upyukt ahe. …..Dhanywad. …!

  92. Very relevant and…
    Very relevant and resourceful information you have provided on Sant Savta Mali containing his greatness, great deeds and his exemplary contribution as a KARMAYOGI and as a Great Sant.

    Ramdas Narsu Wadkar
    Mob No 8008171951

Comments are closed.