शंकरदेव आसाममधील वैष्णव चळवळीचा प्रणेता (Shakardev – Vaishnav Saint In Assam)

3
336

शंकरदेव

विष्णूच्या भक्तीचे कार्य ईशान्येकडील राज्यांत करणारे महापुरुष म्हणजे श्री शंकरदेव. त्यांची वैष्णव चळवळ आसाम राज्यात महापुरुषीय धर्म‘ या नावाने प्रसारित झाली. विष्णुभक्ती भारताच्या विविध प्रांतांत चैतन्य महाप्रभुसंत कबीरबसवेश्वररामानंद यांनी नेली; त्याच प्रकारे शंकरदेव यांनीही आसामातील जनतेला विष्णुभक्तीचा परिचय करून दिला. शंकरदेव हे नववैष्णववादाचे प्रवर्तक. ते संतकवीनाटककार आणि विद्वान म्हणून प्रसिद्ध आहेत. शंकरदेव यांचा जन्म आसाम राज्यातील बोरदुआ गावात 1449 साली कुसुमवर आणि सत्यसंधा देवी यांच्या पोटी झाला. त्यांचे मातृ-पितृ छत्र लहान वयातच हरपले. शंकरदेव यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केला. त्यांचे शालेय शिक्षण वयाच्या बाराव्या वर्षी सुरू झाले. त्या काळात काही विलक्षण चमत्कार घडले. त्यामुळे शंकरदेव हे दैवी व्यक्तिमत्त्व असल्याचा विश्वास लोकांना वाटू लागला. एके दिवशी, शंकरदेव शाळेच्या फरशीवर झोपलेले असताना, त्यांच्या शिक्षकांनी पाहिले, की एका सापाने त्याचा फणा शंकरदेव यांना ऊन लागू नये म्हणून त्यांच्या तोंडावर धरला आहेशंकरदेव यांनी वेद, इतिहास, पुराणे, स्मृती, तंत्रशास्त्रव्याकरण आणि काव्य अशा विविध ग्रंथांचा अभ्यास शालेय वयातच पूर्ण केलेला होता. त्यांनी ‘करतल कमल कमलदल नयन’ ही भगवान विष्णूंची स्तुती करणारी रचना त्या काळात लिहिली. त्या रचनेचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी त्यात कोणतीही मात्रा वापरलेली नव्हती. 

शंकरदेव यांचे शरीर सुदृढ होते. ते भर पावसाळ्यात पूर आलेल्या ब्रह्मपुत्रेत लीलया पोहत असत. शंकरदेव यांनी त्यांची तीर्थयात्रा 1481 साली, वयाच्या बत्तीसाव्या वर्षी सुरू केली. त्यामागे त्यांचा उद्देश जीवितकार्य शोधणे हा होता. ते वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी म्हणजे पूर्ण एका तपाने (बारा वर्षांनी) यात्रा पूर्ण करून परत आले. त्यांनी उत्तर भारतात पसरलेली आणि विष्णूच्या नामघोषात दुमदुमून गेलेली वैष्णव चळवळ आणि भक्तांच्या हृदयातील विष्णुभक्ती जवळून पाहिली. त्यांनी जगन्नाथपुरी, वाराणसी, प्रयाग, वृंदावन, मथुरा, कुरुक्षेत्र अशा सर्व वैष्णव तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. 

शंकरदेव यांनी सत्र‘ संकल्पनेचा आरंभ त्यानंतर केला. सत्र म्हणजे धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक मार्गदर्शन करणारी गुरुकुले होत. त्यांनी त्यांच्या जन्मगावी पहिले सत्र स्थापन केले. सत्र हे एक बहुउद्देशीय केंद्र होते. शंकरदेव यांनी तशा सुमारे पाचशे सत्रांची स्थापना केली. सत्राधिकारी असलेले आचार्य तेथील भिक्षूविद्यार्थी आणि भक्त यांना मार्गदर्शन करत असत; त्यांचा आध्यात्मिक आणि शैक्षणिक उत्कर्ष होण्यासाठी लक्ष देत असत.

शंकरदेव यांचे काव्य

शंकरदेव यांचे कार्य साहित्यिक म्हणूनही अजोड आहे. त्यांनी बोरगीत या स्थानिक नावाने प्रचलित असलेली कीर्तने रचली. त्यांनी स्वतअंकीय नाट नावाचा मनोरंजनाचा नाट्यप्रकार तयार केला. त्यामध्ये विष्णू देवतेचा महिमा सांगितला जात असे. भारतातील लोकप्रिय नृत्य म्हणून ओळखले जाणारे सत्रीय नृत्य हासुद्धा शंकरदेव यांच्याच प्रतिभेचा आविष्कार होय. शंकरदेव यांनी साहित्यक्षेत्राला दिलेली विशेष देणगी म्हणजे ब्रजावली ही नूतन आणि स्वनिर्मित भाषा होय.

एक सरण (शरण) हरि नाम’ हा धर्म शंकरदेव यांनी आसामातील जनतेला आणि पर्यायाने भारतभूमीला दिलेला आहे. श्रीमद भगवद्गीता आणि भागवत पुराण यांत ज्या विचारांची पाळेमुळे रुजलेली आहेत असा कृष्णभक्तीलावाहिलेला आणि केवळ विष्णू हे परमदैवत मानणारा महापुरुष धर्म हे शंकरदेव यांचे योगदान आहे.

त्यांनी त्यांच्या शंभरांहून अधिक अनुयायांना घेऊन त्यांची दुसरी यात्रा 1550 मध्ये आरंभ केली. ते त्या यात्रेत जगन्नाथपुरी येथे अनेक संत महात्म्यांना भेटले आणि सहा महिन्यांनी त्यांची यात्रा पूर्ण करून त्यांच्या गावी परत आले. शंकरदेव यांनी त्यांची इहलोकीची यात्रा वयाच्या एकशेविसाव्या वर्षी 1568साली संपवली. शंकरदेव यांनी श्रीकृष्ण हेच आराध्य दैवत आणि समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानली. त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी वेचले. त्यांनी नामघराच्या माध्यमातून समाजातील जातीय भेद आणि संघर्ष मिटवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी आध्यात्मिक विचारधारेतून समाजातील सर्व घटकांना संघटित करण्याचे बहुमोल कार्य केले. त्यांच्या त्या वैष्णव चळवळीचा आणि विचारांचा प्रभाव आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर जनमानसावर असलेला दिसतो. शंकरदेव यांनी भागवत धर्माची पताका ईशान्य भारताच्या सुदूर राज्यात फडकत ठेवली.

– अरिंदम अधिकारी (इंग्रजी लेख) arindam.adhikari@gmail.com

मराठी अनुवाद आर्या जोशी 9422059795 jaaryaa@gmail.com 

———————————————————————————————-

About Post Author

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here