मराठी भाषक ख्रिस्ती समाजात चरित्र आणि आत्मचरित्र यांचे प्रमाण अगदी कमी होते. कॅथॉलिक पंथीय ख्रिस्ती समाजात तर संत चरित्र आणि अनुवादित (इंग्रजीतून) अशी धर्मगुरुंचीआत्मचरित्रेलिहिण्यावरच भर अधिक होता. मी या गोष्टीचा उच्चार मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात 2000 साली केला होता. त्यानंतरच्या वीस वर्षांत वसईतील मराठी भाषक ख्रिस्ती समाजातून काही चरित्रे-आत्मचरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यांत नैमित्तिक अशा गौरवग्रंथांचे प्रमाण विपुल आहे. गौरवपर ग्रंथांत अनेक व्यक्तींनी एका व्यक्तीविषयीलिहिलेले असल्यामुळे एखाद्या व्यक्तिमत्त्वाची विविध बाजू प्रकाशात येते. मात्र तो त्या व्यक्तिमत्त्वाचा समग्र धांडोळा नसतो. त्यामुळे गौरवग्रंथाचा समावेश ‘चरित्रा’त केला जात नाही.
वसईतील मराठी भाषक कॅथॉलिक पंथियांची चरित्रे व आत्मचरित्रे यांचा शोध घेताना असे दिसून आले, की काही धर्मगुरू व धर्माधिकारी यांचे ‘गौरवग्रंथ’ प्रापंचिकांनी संपादित वा संकलित केलेले आहेत. मात्र धर्माधिकाऱ्यांनी प्रापंचिकांचे गौरवग्रंथ संपादित वा संकलित केलेले नाहीत. त्यावरून ख्रिस्ती समाजातील चर्चच्या वर्चस्वाची कल्पना येऊ शकते. प्रापंचिकांनी प्रापंचिकांचेच केलेले गौरवग्रंथ अथवा परिचयात्मक संकलित केलेले असेही ग्रंथ काही सापडले. परंतु त्या त्या व्यक्तिमत्त्वाचा समग्र शोध त्यात दिसत नाही. असे ग्रंथ कितीही परिश्रमपूर्वक साकार झालेले असले तरीही त्याला चरित्रग्रंथाचे मोल येत नाही.
वसईतील मराठी भाषक कॅथॉलिक पंथीय प्रापंचिकांच्या चरित्र-आत्मचरित्राचा अभ्यास मांडावा असे वाटल्यावरून मी ज्या प्रापंचिकांनी आत्मचरित्रे लिहिलेलीआहेत आणि ज्या व्यक्तींची चरित्रेप्रसिद्ध झालेली आहेत, अशा ग्रंथांचा शोध घेतला, तेव्हा मला हाताच्या बोटांवर मोजता येतील असे ग्रंथ सापडले. त्यातही काही ग्रंथ खाजगी वितरणासाठी होते आणि ते लिहिलेलेहीस्वान्तसुखाय आहेत. त्यामुळे त्यावरील निरीक्षणे मांङणे मला अगत्याचे वाटले. त्या पुस्तकांचा परिचय ख्रिस्ती समाजापलीकडे कोणाला झालेला नसेल, तरीही आत्मचरित्राची काही मूल्ये त्यांत सापडतात. तो धागा मला महत्त्वाचावाटला.
3. कामगार आहे मी – मार्कुस डाबरे, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई16, 26 नोर्व्हबर 2014. किंमत 250/- रुपये, पृष्ठे – 241
4. बाबांची सावली – नातालिया पास्कोल मिनेझीस, संपादन – जोसेफ तुस्कानो, (खाजगी वितरण) स्मित प्रकाशन- माणिकपूर, वसई, 15 नोव्हेंबर 2017 पृष्ठे –100
5.टिपंवणी – डॉ. सिसिलिया कार्व्हालो, ग्रंथाली प्रकाशन मुंबई 16, 25 डिसेंबर 2019 (पहिली आवृत्ती) किंमत 400 रुपये, 26 जानेवारी 2020 (दुसरी आवृत्ती) पृष्ठे – 332
चरित्रग्रंथ कसा असावा याचा वस्तुपाठ वसईतीलचवीणागवाणकर यांनी साऱ्या मराठी जगतासमोर ठेवलेलाआहे. त्यांनी वसईतील रॉबी डिसिल्वा यांचेचरित्रयथार्थ स्वरूपात उभे केलेले आहे.मीअभ्यासलेल्या चरित्रग्रंथांपैकी फक्त रॉबी डिसिल्वा यांचेव्यक्तिमत्त्व सांस्कृतिक मूल्यांसह मूर्तिमंत रूपात उभे राहते.‘वळणावळणाच्या वाटा’ हे नेपोलियन डिसिल्वा यांचे आत्मचरित्रही सांस्कृतिक मूल्यांनी समृद्ध असे आहे. छोटेखानी असले तरीही! त्यात बालपणाचे संदर्भ अधिक येतात आणि कौटुंबिक संघर्ष, सांसारिक संघर्ष यांची प्रतिबिंबे फारशी येत नाहीत.
चरित्र आणि आत्मचरित्र या दोन्ही प्रकारच्याग्रंथांतील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे जीव्यक्तिमत्त्वे चर्चच्या प्रांगणांतून बाहेर पडली, त्यांनामोठा व व्यापक अवकाश प्राप्त झालेला आहे. त्यांचा संघर्ष चर्चच्या व्यवस्थापनाशीआणि एकूणच व्यवस्थेशी झालेला असला, तरी त्या त्या व्यक्तिमत्त्वांनीत्यांच्याख्रिस्ती नावांशी मात्र फारकत घेतलेली नाही. तसेच,त्यांनीचर्चची जी कामे विनामूल्य केली, त्या सेवाभावी कार्यामुळे त्यांना समोरचामाणूस ओळखण्याची शक्ती प्राप्त झाली. सेवाभावी कार्यामुळे त्यांना अनुभवसंपन्नताप्राप्त झाली. त्यांच्यावर झालेले मूल्यसंस्कार अधिक उजळून निघाले. काहीचरित्रग्रंथात धर्माधिकाऱ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. ते चर्चचा चरित्रनायक आणिचरित्रलेखक यांच्यावरील चर्चचा प्रभाव सूचित करतात. त्यामुळे चरित्रलेखक धर्मगुरूवा धर्माधिकारी यांचे संदर्भ सांभाळून लिहितात व आम्ही चर्चपासून दुरावलेलो नाहीहे अधोरेखित करतात.
वसईतील मराठी भाषक कॅथॉलिक पंथीय स्थानिक बोलीत त्यांचा संवाद साधत असतात. त्यांचे शिक्षणाचे माध्यम मराठी आहे. परंतु ती व्यक्तिमत्त्वे प्रमाण मराठी आणि इंग्रजीही उत्तम रीतीने लिहू-बोलू शकतात.
उपलब्ध चरित्रे आणि आत्मचरित्रे यांचा एकत्रितपणे अभ्यास करताना असे दिसून आले, की ती ‘व्यक्तिमत्त्वे’ एकमेकांशी आणि समाजातील घटनाप्रसंगांशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ, ‘कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटल’ची उभारणी वाचताना डेव्हिड डिकुन्हा, व्हिक्टर डाबरे, अँन्थनी तुस्कानोयांचे संदर्भ येतात, तर कार्डिनल ग्रेशस हाँस्पिटलमधील संपाविषयी विवियन बरबोज आणि मार्कुस डाबरे यांचे संदर्भ एकत्रितपणे येतात. त्यामुळे त्या समाजातील एकी आणि एकाच विचारांनी झपाटलेलीं व्यक्तिमत्त्वे दिसून येतात.
तथापि, काही चरित्रांत लेखकांनी चरित्रनायकाच्या जीवनात चंचुप्रवेश केलेला आहे. उदाहरणार्थ जोसेफ तुस्कानो यांनी शब्दांकन, संपादन केलेली चरित्रे आणि एक आत्मकथन ‘म्हशीपासून मर्सिडिजपर्यंत’, ‘समाजधुरीण’ हे चरित्रग्रंथ आणि ‘बाबांचीं सावली’ हा आत्मचरित्र ग्रंथ त्यांमध्ये चरित्रलेखक स्वत:विषयी काही सांगतो वा वाचकाला आवङलेली काही अवतरणे त्यात घालतो. तेव्हा चरित्रनायकाच्या व्यक्तिमत्त्वाला धक्का पोचतो. ‘अविश्रांत‘मध्ये अचला मच्याडो यांनीही तशीच गफलत केलेली आहे. त्यांनी सहकार महर्षी व्हिक्टर डाबरे यांचे चरित्रलिहिताना तेत्यांचेआजोबा असल्याचासंदर्भ बऱ्याचदादिला आहे. त्यामुळे चरित्रव्यक्तिगत पातळीवर जाते. चरित्रनायक जसा घडला तसे त्याच्याबाबतच्या व्यक्तिमत्त्वाचेदर्शन उपलब्ध सामुग्रीवरून घडते.तीकसोटीअसते. त्याचे भान ठेवणे अगत्याचे असते.
अर्पणपत्रिकेतचरित्रनायकाचे छायाचित्र दिल्याने ते केवळ स्मृतिखातरलिहिलेले पुस्तक असल्याचे सूचित होते. काही चरित्र–आत्मचरित्रग्रंथ घाईगर्दीत पूर्णकेल्याचे दिसून येते.तोप्रत्यय संकलितसंपादनात विशेषत्वाने येतो. त्यामुळे मुद्रणदोष, रचनादोष, कालक्रमचुकणे वा कालविपर्यास, परस्परविरोधी विधाने असे दोषपुस्तकांमध्ये राहून जातात. उदाहरणार्थ ‘बाबांचीसावली‘ यातचरित्रनायिका अशिक्षित वा अर्धशिक्षित असल्याचे संदर्भ अनेकदा त्यांच्याच तोंडीयेतात, परंतुप्रेमपत्र पाठवल्याचे संदर्भ आणि कवितांची अवतरणे त्यामधून वाचकाच्या मनात तयार झालेल्याव्यक्तिमत्त्व दर्शनालाधक्का लावतात.चरित्रनायिकेचेशिक्षणचौथीपर्यंत झाले असल्याचा संदर्भ शेवटच्या प्रकरणात सापडतो. आत्मकथनातनायक/नायिकेचा जीवनप्रवासत्यांनी स्वत:चलिहिलेला असतो; कधी त्या कथनाचे शब्दांकन केलेले असते. चरित्रग्रंथात चरित्रलेखकत्याला उपलब्धझालेल्या साधनांवर एखादे व्यक्तिमत्त्व उभे करत असतो. त्यामुळेव्यक्तींचीबलस्थाने आणिशबलस्थाने ताकदीने उभी करणे हे मोठे आव्हान असते, ते समतोलपणाने मांडता येण्यास हवे.फक्त‘रॉबीडिसिल्वा एका कलावंताचा मनस्वी प्रवास‘या चरित्रग्रंथाततसा समतोल दिसून येतो.
स्वातंत्र्याआधीचाकालखंड, स्वातंत्र्यानंतरचा कालखंड आणि त्या काळातीलवसईचे दर्शन या चरित्र-आत्मचरित्र ग्रंथांतून घडते.त्यामुळे स्वातंत्र्य शिक्षण यांच्याशी संबंधित सुविधा उपलब्ध झाल्यावर जो बदलअपेक्षित असतो; तसाबदल चरित्रनायक आणि आत्मचरित्र नायक यांच्या जीवनात दिसून येतो आणि तसा तो दिसणेस्वाभाविकअसते. विशेषतः आत्मचरित्रातील नायकांचा धर्म, राजकारण, समाजकारणयांच्यातील सहभाग लक्षणीय आहे. चरित्र-आत्मचरित्रग्रंथ अभ्यासल्यावर असे दिसून आले, की घटना–प्रसंगांतील‘नेमकेपणा‘बद्दल शंकानिर्माणव्हावी. उदाहरणार्थ 1. ‘हरवलेलेदिवस’मध्येशेव्हेलियर अण्ड्राडीस पदवीदान समारंभ, 29नोव्हेंबर 1971 या दिवशी वसईत झाला (पृष्ठ 31) तर‘समाजधुरीण‘मध्ये‘शेव्हेलियर‘ ही पदवी 28नोव्हेंबर 1971 रोजी दिल्याचासंदर्भ सापडतो. (पृष्ठ 26)2. ‘हरवलेलेदिवस‘मध्येकार्डिनल ग्रेशस हॉस्पिटलचा संपसत्तेचाळीस दिवस चालल्याचा संदर्भ(पृष्ठ 17,65) आहे. ‘कामगारआहे मी‘मध्ये‘पन्नासदिवसांचा संप‘ याशीर्षकाचेप्रकरणच आहे. (पृष्ठ 179) आणि पृष्ठ 181 वरतरसहादिवसांचा संपकरण्याचा निर्णय घेतला; तो संप पुढे एकावन्न दिवसचालला असे म्हटले आहे. 3. व्हेलेरियनकार्डिनल ग्रेशस यांच्या निधनानंतर त्यांच्यानावाने वसईत हॉस्पिटल उभारावे अशी कल्पना माणिकपूरचे पायस आल्मेडा यांनी1978 साली प्रथम मांडली असा संदर्भ‘कामगारआहे मी‘मध्येपृष्ठ 179वर सापडतो; तर‘समाजधुरीण‘मध्ये हॉस्पिटललाकार्डिनल ग्रेशसमेमोरियल असे नावसर्वानुमते देण्यात आल्याचेपृष्ठ38 वर म्हटले आहे. अर्थाततसा ठरावकोणी मांडला, त्याला अनुमोदन कोणी दिलेहासंदर्भ या दोन्ही ग्रंथांत वा अन्यत्र कोठेसापडत नाही. तथापि‘हरवलेले दिवस‘मध्येसंस्थेच्या नोंदणीच्या कामी माणिकपूरचे चार्टर्ड अकाऊंट एस.पी. डिमेलो, अॅडव्होकेट फेलिक्सगेर, अॅडव्होकेट फ्रान्सिस नुनीस, सहकारक्षेत्रातीलअग्रणी व्हिक्टर डाबरे यांनी सहकार्य केले आणि हॉस्पिटलप्रमुखप्रणेते मॉन्सिनियर फिलीप तवारीस, सेंटथॉमस चर्चचे तत्कालीन धर्मगुरू फादर भंडारी आणि देणग्या देऊन विश्वस्तझालेले तिघेजण यांनी‘कार्डिनल ग्रेशस मेमोरियल हॉस्पिटल ट्रस्ट‘ यासंस्थेची रीतसर नोंदणी केल्याचा संदर्भ पृष्ठ 34 वर आहे. प्रत्येक लेखकानेत्याच्यास्मरणशक्तीवर आधारित विधाने केलेली असल्याने एकाच घटनेसंदर्भात एकवाक्यता आढळतनाही. किंवा लेखकांनी त्यांच्या मगदुरानुसार त्यात्या व्यक्तींना त्या विशिष्ट कार्याचे श्रेयदिलेले आहे.
(जनपरिवार, 5 ऑक्टोबर 2020 अंकातून उद्धृत, संस्कारीत)
सिसिलिया कार्व्हालो या मराठी कवी आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ललितगद्य कथा, आस्वादनपर, संशोधनात्मक, चरित्रपर, अनुवाद अशा सर्व प्रकारच्या लेखनावर त्यांच्या ललितरम्य लेखनशैलीची मुद्रा उमटवली आहे. त्यांच्या ललितगद्य लेखनास अनंत काणेकर, पु.ल.देशपांडे आणि मधुकर केचे यांच्या नावांचे राज्यशासनाचे तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवर साहित्याचे अध्यापन केले आहे. त्या पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्यांनी बालभारती, उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रम आणि मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष म्हणून शैक्षणिक कार्यात योगदान दिले. त्यांनी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समिती, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अशा शासकीय समित्यांवर सदस्य म्हणून केलेले कार्य संस्मरणीय आहे. त्यांनी मराठी भाषक ख्रिस्ती समाजीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच, गुजरात, गोवा, कर्नाटक येथील विभागीय साहित्य संमेलनांचेही अध्यक्षपद भूषवले आहे.
सिसिलिया कार्व्हालो या मराठी कवी आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ललितगद्य कथा, आस्वादनपर, संशोधनात्मक, चरित्रपर, अनुवाद अशा सर्व प्रकारच्या लेखनावर त्यांच्या ललितरम्य लेखनशैलीची मुद्रा उमटवली आहे. त्यांच्या ललितगद्य लेखनास अनंत काणेकर, पु.ल.देशपांडे आणि मधुकर केचे यांच्या नावांचे राज्यशासनाचे तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवर साहित्याचे अध्यापन केले आहे. त्या पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी बालभारती, उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रम आणि मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष म्हणून शैक्षणिक कार्यात योगदान दिले. त्यांनी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समिती, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अशा शासकीय समित्यांवर सदस्य म्हणून केलेले कार्य संस्मरणीय आहे. त्यांनी मराठी भाषक ख्रिस्ती समाजीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच, गुजरात, गोवा, कर्नाटक येथील विभागीय साहित्य संमेलनांचेही अध्यक्षपद भूषवले आहे.
तुमचा लेख फारच छान झाला आहे. एखादे साहित्य वाचताना ते कसे वाचले जावे याचा हा उत्तम नमुना आहे.