नितिन महाजन |
नितिन आणि सोनाली हे दोघे सॉफ्टवेअर उद्योगात आहेत. त्यामुळे त्यांचा संपर्क जगभर आहे. बघता बघता, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान, इंग्लंड, न्यूझीलंड अशा देशांत माणसे जोडली गेली. स्पर्धेचे तपशील ठरू लागले. आरंभी चित्रकला, गायन, छायाचित्रे, नृत्य आणि अभिनय या पाच कलांत आणि तीन वयोगटांत स्पर्धा घेण्याचे ठरले आहे. प्रवेशिका कोणत्याही विभागात कोणालाही सादर करता येईल. त्यास भाषा, धर्म, देश असे कसलेही बंधन नाही. संयोजकांनी ही पहिली स्पर्धा आहे असे म्हटले आहे. त्यामुळे अशा आणखी स्पर्धा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याबाबत सोनालीला विचारले. तेव्हा ती म्हणाली, की जगात अशी ही ऑनलाईन स्पर्धा प्रथमच भरत आहे.
ती जाहीर झाल्यानंतर स्वाभाविकच लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत. वाद्यसंगीत, लेखन या कलांचा सध्याच्या स्पर्धेत समावेश नाही. तोही पुढील स्पर्धांत जाहीर करता येईल. नितिन महाजन यांची इनपॅकेबल सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. त्या कंपनीचे इव्हेंटग्लिंट आणि लीडग्लिंट हे दोन प्रॉडक्ट आहेत. त्यांच्यामार्फत या स्पर्धेचे संयोजन केले जात आहे. नितिन म्हणाला, की ही वैशिष्ट्यपूर्ण व एकमेवाद्वितीय स्पर्धा होणार आहे. त्यामुळे त्यासंबंधी जगभर औत्सुक्य व्यक्त केले जात आहे. जगातील वेगवेगळ्या देशांतून मान्यवर, तज्ज्ञ परीक्षक स्पर्धेतील प्रवेशिकांची तपासणी करण्यासाठी लाभले आहेत. सगळे त्यांच्या त्यांच्या कलाशाखांत प्रवीण आहेत.
सोनाली जोग – पानसरे |
स्पर्धेचे उद्घाटन भारतीय वेळेप्रमाणे सोमवारी, 25 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता झाले. जगाच्या वेगवेगळ्या देशांतील सुमारे पन्नास प्रतिनिधी झूम अॅपद्वारा एकत्र जमले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियात रात्र होती व दुसऱ्या दिवशीच्या पहाटेची प्रतीक्षा होती; तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला सकाळ झाली होती व पश्चिम किनार्याला पहाट होती. असे काळवेळेचे वेगवेगळे संदर्भ देत-घेत प्रतिनिधी बोलत होते, वेगवेगळ्या कल्पना सुचवत होते. कार्यक्रमाची सुरुवात नितिनच्या पत्नी प्रतिमा महाजन यांच्या गणेशवंदनेने झाली. त्या संगीत विशारद आहेत. त्यांचे ‘ओंकार स्वरूपा’… या गीताचे सूर मीटिंगची चाळीस मिनिटे कानात घुमतील असेच होते. नितिन व सोनाली यांनी प्रास्ताविक केले, तेच देशोदेशींच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन. त्यामुळे प्रतिनिधी एकमेकांची ओळख जरी पडद्यावर करून देत-घेत होते तरीही सर्वांमध्ये छान हार्दिक भाव तयार झाला व स्पर्धेचा शुभारंभ प्रतिनिधींच्या मनाला भिडून गेला. समारंभ संपताच प्रतिनिधींच्या तशा मेसेजेसचा अक्षरशः पाऊस पडला. मग रोटरी क्लबचे वीरेंद्र शोरेन व कानपूर आयआयटीचे शैलेंद्र अग्रवाल यांनी आणि मित्रांनी स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रतिनिधींनी शंका विचारल्या, सूचना केल्या आणि स्पर्धेला भरघोस यश लाभेल असा विश्वास व्यक्त केला. सुमारे पन्नास जणांनी एकमुखाने ‘थ्री चिअर्स’ केले. तो आवाज साऱ्या जगभर कित्येक काळ घुमत राहिला असेल! त्या लाटांवरून स्पर्धेचा प्रसार जगभर होणार आहे आणि त्याची परिणती म्हणून वेगवेगळ्या कलाविभागांत शेकडो-हजारो प्रवेशिका येतील अशी खात्री नितिन व सोनाली यांना वाटत आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी पुढे लिंक देत आहोत, https://www.eventglint.com/umang तसेच इंग्रजी प्रकटनही. कोरोनाला हरवण्याचे नाना तऱ्हेचे प्रयत्न लॉकडाऊन काळात सर्वत्र होत आहेत, त्यांपैकी जगभर ऑनलाईन होणारा हा एकमेव व विधायक प्रयत्न आहे. तो महाराष्ट्राच्या भूमीतून रूजला गेला आहे, हे विशेष!
Best of Luck Sonali for this event.All the best.
It's great event, all the best !!