लेखक-दिग्‍दर्शक – अभिजित झुंजारराव

6
53
_Abhijit_zunjarrao_1.jpg

अभिनेता म्हणून मिळालेल्या प्लॅटफॉर्मचा आदर करून नाट्य दिग्दर्शन व अभिनय… या दोन्ही प्रकारच्या कलाविष्कारातून गगनी उंच झेपावताना पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे असलेले अभिजित झुंजारराव!

अभिजित झुंजारराव मूळचे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील नेवाळपाडा या गावातील. त्यांचे वडील जयवंत झुंजारराव. ते कामानिमित्ताने कल्याण येथे स्थायिक झाले. अभिजित यांना कॉलेजपर्यंत नाटकाची फारशी आवड निर्माण झाली नव्हती. पण नाटक त्यांच्या रक्तातच होते. अभिजित यांचे वडील जयवंत त्यांच्या ‘मरावीमं’मधील नोकरी करता करता तेथे होणाऱ्या नाटकांत काम करायचे. त्यांनी अभिजित यांना त्या क्षेत्रात येण्यासाठी प्रवृत्त केले आणि अभिजित यांना नाट्य क्षेत्राची आवड निर्माण झाली. अभिजित लहानपणापासून स्वभावाने लाजरे होते. त्यांना एकदा नाटक बघत असताना त्यांनीही तसा एखादा प्रयोग करून बघावा असे वाटून गेले. त्यावेळी त्यांचे ग्रॅज्युएशन नुकते पूर्ण झालेले होते. त्यांनी सोसायटीमधील समान आवड असणाऱ्या मुलांची ‘टीम’ बनवून त्यांचा नाट्यप्रवास चालू केला.

त्यांनी बसवलेली पहिली एकांकिका म्हणजे विजय मोंडकर लिखित ‘वडवानल’. त्यांना त्यांच्यामध्ये दडलेला कलाकार हळुहळू उमगत गेला. अभिजित यांना वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये गच्चीवर छोटे छोटे नाट्यप्रयोग करत असताना ‘हे म्हणजेच सगळं नाही’ हे जाणवत गेले अन् ते नाट्य क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी धडपडू लागले. त्यांनी रमेश रोकडे यांच्या सल्ल्याने ‘नेहरू सेंटर’मध्ये ‘नाट्यदिशा’ नावाच्या डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. त्यांच्या मेहनतीला व त्यांच्यातील कलाकाराला तेथे दिशा मिळाली. नंतर त्यांनी दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’(एनएसडी) मधून नाट्यशास्त्राशी निगडित असलेला दोन वर्षांचा डिप्लोमा केला. तो करत असताना त्यांची ओळख जयदेव हट्टंगडी यांच्याशी झाली आणि ते त्यांच्या गुरुस्थानी बनले. त्यांनी त्या दीड-दोन वर्षांच्या काळात जे काही शिकवले ते अजूनही कामी येते असे अभिजित यांचे म्हणणे आहे.

त्यांना नाटकामुळे ‘मी मराठी’ या वाहिनीच्या असिस्टंट मॅनेजर या पदाची नोकरी मिळाली. नोकरी आणि नाट्यप्रेम अशी तारेवरची कसरत सुरू झाली. ती नोकरी त्यांनी सात-आठ वर्षें केली. त्यांनी नोकरी २०१३ साली सोडली आणि पूर्ण वेळ अभिनय व दिग्दर्शन यांतच स्वत:ला झोकून दिले. ‘देऊळ बंद’ फेम प्रवीण तरडे यांची ‘तदैव लग्नम’ ही एकांकिका म्हणजे अभिजित यांचे पहिलेवहिले दिग्दर्शन. ‘स्ट्रॉबेरी’, ‘ब्रेकिंग न्यूज’, ‘जीना इसिका नाम है’, ‘पुरावाच काय आहे अमेरिकेला?’, ‘दर्दपोश’, ‘हा खेळ आयडेंटिटी थेफ्टचा’, ‘लेझिम खेळणारी पोरं’, ‘हंडाभर चांदण्या’, ‘सेल्फी’, ‘छावणी’, ‘कृष्णविवर’, ‘कॉफिन’, ‘बॅलन्सशीट’, ‘‘आयडी’चे डिकन्स्ट्रक्शन’ हे त्यांच्या दिग्दर्शनाचे काही नमुने. त्यांतील ‘लेझिम खेळणारी पोरं’ हे त्यांचे स्वत:चे आवडते नाटक.

त्यांनी त्यांचे अॅक्टिंगचे पॅशनही दिग्दर्शनाबरोबर जपले आहे. त्यांनी ‘पोस्टर बॉईज’, ‘पोस्टर गर्ल’, ‘रेगे’ अशा सिनेमांमधून अभिनय केला आहे. अभिजित यांना दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाने भारावून जायला होते. त्याचबरोबर ते अभिनेता म्हणून ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’, ‘स्टार प्रवाह’वरील ‘सख्या रे’, ‘कलर्स’ व ‘मी मराठी’वरील ‘ज्योतिबा आणि सावित्री फुले’ अशा मालिकांमधून प्रेक्षकांसमोर येत राहतात. त्यांनी ‘पैठण’ या बाबा भांड लिखित कादंबरीवर आधारित असलेल्या ‘दशक्रिया’ या फिल्ममध्येही काम केले आहे. त्या फिल्मला ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये अॅवार्ड मिळाले.

अभिजित आणि त्यांच्या टीमने २६ जानेवारी २००० साली चालू केलेली ‘अभिनय कल्याण’ ही ‘प्रयोगशाळा’ गेली सतरा वर्षें कार्यरत आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर ‘ती आता वयात आलेली आहे.’ त्या ‘प्रयोगशाळे’चे थिम साँग देखील तितकेच अप्रतिम, अर्थपूर्ण आणि त्यांच्या प्रयोगशाळेला साजेसे आहे.

त्यांचा प्रवास म्हणा वा स्ट्रगल… ते खिलाडू वृत्तीने एंजॉय करत आहेत. ते तंत्राबरोबर स्क्रिप्टलाही तितकेच महत्त्व देतात.

अभिजित झुंजारराव ९९७६०८५५०५

– श्रृती शहा ८१४९७७४३९९

About Post Author

6 COMMENTS

  1. खुप छान झुंजाराव सर आपल्या…
    खुप छान झुंजाराव सर आपल्या कष्ट मेहनतीला सलाम…. ठाणे जिल्ह्याचा मुरबाड तालुक्याच्या आपण आपल्या कार्यकर्तुत्वाने सन्मान वाढवत आहात त्याबद्दल धन्यवाद……डी एस पाटील शहापुर

  2. Abhihit Mitra khup khasta…
    Abhihit Mitra khup khasta khavun jyaveli Apan sarvana eaktritpane pudhe nenyasathi dhadpad karat asato tevha honara trasachi janiv ahe… khup mehnat karun ji unchi Gathliyes… ti Ayushyabhar ajun vadhat javo… Natya spardhetil satatyata ani Tu Maza Sangati veli Sobat kaam karat astana tuza Sahvaas labhala to pan khup ahe.. pudhil Vatchalikarita khup khup Shubhechya…

  3. छान,, अभिजित सर,,तुम्ही…
    छान,, अभिजित सर,,तुम्ही आपल्या तालुका चा नाव व आपल्या समाजात असच नाव उंचावत राहा,,

  4. अभिजित सर आपण मुरबाड…
    अभिजित सर आपण मुरबाड तालुक्याची शान आहात, आपण कला क्षेत्रात खूप खूप पुढे जाऊ हि सदिच्छा!!!
    एकनाथ देशमुख, देहरी,मुरबाड

  5. खरंच वाचून व जाणून खूप बरं…
    खरंच वाचून व जाणून खूप बरं वाटलं.खरं म्हणजे माणूस हा एक कालाकारच आहे.पण अभिजितराव तुम्ही ग्रेट आहात.समाज आपल्या पाठीशी उभा आहे.अभिनंदन व भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छ्या

Comments are closed.