लिंगभावाची समानता आणि संवेदनशीलता (Gender Equality and Sensitivity)

1
100

 

मुल जन्माला आले, की त्याची ओळख स्त्री, पुरूष अशी होत असते. मात्र मानवी सजीवाला त्याची/तिची लिंग ओळख अकरा ते चौदा या वयात होते. त्यांच्यात त्या वयात शारीरिक आणि मानसिक बदल होत जातात. त्याच वेळी एकाद्या मुलग्याला त्यांच्यात तोनाही याची जाणीव होते. तोमुलींमध्ये रमू लागतो, नट्टापट्टा करू लागतो. लोक त्याला बायल्या म्हणून हिणवतात. तो मुलगा स्त्रीत्वाचा स्वीकार करतो तेव्हा त्याला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागते. त्याला घरातून हाकलले जाते. तोझोपडपट्टीत, रेल्वेच्या पुलाखाली राहू लागतो. कोणाला योग्य मार्गदर्शन मिळून गुरू मिळतो. त्याचा लिंगबदल होतो. त्यासाठी त्याला एका शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागते. बाकी साऱ्यांचे हिजड्यांच्या रूपात टाळ्या वाजवून भिक मागणे सुरू होते. त्यांच्यापैकी काही रंगारूपात असणारे सेक्सवर्कर म्हणून जगतात. समाजाने मूल जन्माला आल्यावर केलेले बारसे, नामकरण निरर्थक ठरते. नासिकच्या कर्मवीर शांताराम बापू वावरे महाविद्यालयालिंगभावाची समानता आणि संवेदनशीलताविशेष संदर्भ तृतीयपंथीय समाजया विषयावर झालेल्या चर्चासत्रातून हे वास्तव समोर आले.

शमीभा पाटील
तृतीय पंथीय समूह हा संख्येने मोठा आहे. पाच लाख हा 2011 च्या जनगणनेतून आलेला त्यांचा आकडा. तो लहान नाही. पाच लाख लोकांचा तो समूह नव्हे तर समाज ठरतो. त्या समाजात गुरू परंपरा आहे, त्यांची स्वतंत्र संस्कृती आहे. त्यांची तृतीय पंथीय अशी लिंग ओळख घटनेने मान्य केली आहे. अर्थात, त्यासाठी तृतीय पंथीयांना मोठा संघर्ष करावा लागला. न्यायालयात जावे लागले. शमिभा पाटील ही विद्रोही कवयत्री म्हणालीआम्हाला नागरिकत्वाचे आधिकार आता आता मिळाल्याने आम्ही बाल्यावस्थेत आहोतमात्र शिखंडीच्या परंपरेतील आहोत. आम्ही पुढील काळात संसदेत दिसून येऊ असा आशावाद त्या परिषदेतून व्यक्त झाला. तृतीय पंथीय सक्रिय राजकारण करताना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडीत दिसतात. तृतीय पंथीयांसाठी लवकरच महामंडळ स्थापन होईल असा दावा प्रिया पाटील या कार्यकर्तीने चर्चासत्रात बोलताना केला.
प्रिया पाटील
चाळीस टक्के हिजडे आत्महत्या करतात. काही सेक्सवर्करचे काम करत जगतातबाकीचे (टाळ्या वाजवून) भीक मागून जगतात असे तृतीय पंथीयांच्या प्रतिनिधीने या परिषदेत स्पष्ट केले. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने तृतीय पंथीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे उदाहरण नाही. डॉ. संजय पुजारी यांनी तसा तो निष्कर्ष 2008 मध्ये निलवसंत फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना मांडला होता. टाळ्या वाजवल्याने हृदय कार्यक्षम होत असावे असा त्याचा अर्थ या परिषदेत सांगण्यात आला.
तृतीय पंथीय समुहाचे शिक्षण याविषयी चर्चा झाली. हिजडाम्हटला, की त्याला घराबाहेर घालवले जाते. त्याचे वेगळेपण शाळेत, महाविद्यालयात हास्यास्पद, टिंगलीचा विषय बनते. त्याला प्रवेश खाजगी क्लासमध्ये नाकारला जातो. त्या संदर्भात कोतीया लघुपटाचे सादरीकरण परिषदेत करण्यात आले. तृतीय पंथीयांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणले पाहिजे. तृतीय पंथीयांना नटण्यास आवडते. ते गायन, नृत्य कलेत निपुण असतात. त्यासाठी कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम निर्माण झाले पाहिजेत. ब्युटीपार्लर, नृत्य, गायन आणि संवाद कौशल्य असे कौशल्याधारित अभ्यासक्रम विकसित करता येऊ शकतातशिक्षण हक्क सर्वांसाठी असला पाहिजे. तो मुलामुलींना आहे तसाच तृतीय पंथीयांनाही असला पाहिजे असे या परिषदेत ठामपणे मांडण्यात आले.
संदीप गिरे त्यांचे विचार मांडताना
शमीभा पाटील हिने परिवर्तनवादी चळवळी या पक्षपाती आहेत असा घणाघात बीजभाषणात केला. परिवर्तनवादी चळवळीने स्त्री प्रश्नांची चर्चा घडवून आणली. स्त्री शिक्षणाला चालना दिली, पण परिवर्तनवादी चळवळीने साडेचार लाख (जनगणनेतून आलेला आकडा) नागरिकांची तृतीय पंथीयांच्या समाजाची दखल घेतली नाही असे त्या म्हणाल्या. माणूसपणाचे सर्वसामान्य अधिकार तृतीयपंथीय समाजाला नाकारण्यात आले  असे तिचे म्हणणे होते. तृतीयपंथीय टाळी वाजवतात ती भीक मागण्यासाठी नाही तर त्यातून तिचा संताप व्यक्त होत असतो. ती टाळी परंपरेची नाही तर विद्रोहाची आहे, तुम्ही आम्हाला माणूस म्हणून स्वीकारले तरी आम्ही टाळ्या वाजवू, पण त्या आनंदाने आणि नाही स्वीकारले तर निषेध म्हणून टाळ्या वाजवू असे रोखठोक प्रतिपादन शमिभाने या परिषदेच्या बीजभाषणात मांडले.
तृतीय पंथीय समाज बदलत असल्याचे चर्चेत अधोरेखित झाले. तृतीय पंथीय विविध क्षेत्रांत कौशल्याच्या जोरावर आणि सामाजिक जाणिवेच्या बळावर काम करत आहेत. प्रिया गोसावीचा टिकटॉक व्हिडिओ प्रसिद्ध आहे. कोणी कथ्थक नृत्यात पारंगत आहे. मेकअपमन म्हणून फिल्म इंडस्ट्रीत कोणी काम करत आहे. प्रिया गोसावी ही मेकअपमन आहे. ती म्हणाली, एका मराठी मालिकेत धडधाकट पुरूष तृतीय पंथीयाचे काम करत होता. मला त्याचा मेकअप करण्यास बोलावल्यावर मी म्हणाले, ही भूमिका मला द्या. मी उत्तम करीन.तर दिग्दर्शक म्हणाले, तुला मेकअपला बोलावले तेवढेच काम तुझे. अर्थात, त्यांनी माझ्या मागणीनंतर पुढील एका भागात भूमिका दिली. ठाण्यात एक तृतीय पंथीय चारचाकी वाहने भाड्याने देण्याचा व्यवसाय करत आहे. अशी अनेक उदाहरणे समाजात आजूबाजूला दिसतील. गौरी सावंत ही तृतीय पंथीय असली तरी एक माता आहे. तिने मुलगी दत्तक घेतली आहे आणि आता तर ती आजीच्या भूमिकेतून आजीचे घरउभे करण्याच्या कामात गुंतली आहे. या परिषदेतील तृतीय पंथीय विशेष स्त्रियांनी मुले दत्तक घेतल्याची उदाहरणे पुढे आली. या विशेष मातांची महती परिषदेतून कळली. त्याच प्रमाणे भारतीय समाज बदलत असल्याची काही उदाहरणे तेथे दिसली. एक तृतीय पंथीय स्त्री विवाह करून सासरी नांदत आहे. ते उदाहरण भारतात प्रथम. तिचा स्वीकार सासरच्या मंडळींनी केला आहे.
तृतीय पंथीय समाजाला परिकल्पनेने जगायचे नाही. त्याला वास्तवात जगायचे आहेत्या मंडळींना माणूसपणाचे हक्क हवे आहेत. संविधानाने त्यांचे अस्तित्व मान्य केले आहे. आता, तृतीय पंथीयांना आत्मसन्मान मिळण्यासाठी लढायचे आहे. त्यांचे म्हणणे त्यांना माणूस म्हणून स्वीकारा असे आहे. चर्चेत पाच हजार वर्षांपूर्वीच्या शिखंडीपासून तथागतांनी त्यांच्या भिक्खू संघात तृतीय पंथीयांना स्थान कसे दिले, राजमाता जिजाऊंनी त्यांच्या शेजारी तृतीय पंथीय व्यक्तीला बसवून सन्मान कसा दिला अशी उदाहरणे सांगितली गेली, वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही तशीच चर्चा झाली. सजीव पुरूष असतो, स्त्री असतो; तसाच, हिजडा असतो, पण तो नंपुसकलिंगी नसतो. समागमाचा आनंद घेणारा आणि देणारा नंपुसकलिंगी कसा असेल? असा निष्कर्ष त्या चर्चासत्रातून निघाला.
समाजमाध्यमे चोवीस जानेवारी हा बालिका दिन साजरा करताना स्त्रीजन्माचे स्वागत करण्यास सज्ज असतात. पण तृतीय पंथीय म्हणून जगणाऱ्या या विशेष स्त्रियांना तेवढा सन्मान समाज देईल का? लिंगभावाची समानता आणि संवेदनशीलता केव्हा निर्माण होईल? तृतीय पंथीयांचा माणूस म्हणून स्वीकार कधी होईल? असे प्रश्न अनुत्तरित आहेतत्यांचा शोध परिषदेच्या निमित्ताने सुरू झाला.
चर्चासत्रासाठी मुंबईठाणेशिरूरनाशिक येथून तृतीयपंथीय सहभागी झाले होते  तर प्रतिनिधी म्हणून गोवा विद्यापीठातील प्राध्यापक हजर होते. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतूनही प्रतिनिधी उपस्थित होते.  चर्चेत तृतीय पंथीय व्यक्ती तज्ज्ञ म्हणून उपस्थित होत्या.  
शंकर बोऱ्हाडे 9226573791
shankarborhade@gmail.com
शंकर बो-हाडे हे पिंपळगाव, नाशिक येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गावात साहित्य रसास्वादहे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे राष्ट्र सेवा दलाचे सैनिक. बो-हाडे नामांतर चळवळीत सत्याग्रह करून शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून जेलमध्ये गेले. ते परिवर्तनवादी, दलित चळवळ व साहित्य याचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार जागृतिकार पाळेकर यांच्या साहित्याच्या संशोधनानिमित्ताने मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास केला. ते गेली तीन दशके नाशिकच्या वृत्तपत्रांतून लेखन करतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (ठाणे) अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षीय भाषणाची चिकित्सा करणारा त्यांचा लेख विशेष गाजला होता. त्यांची चार स्वतंत्र व दोन संपादित पुस्तके प्रसिध्द आहेत. त्यांची कार्यकर्ता लेखक अशी ओळख आहे.
———————————————————————————————————
———————————————————————————————————

About Post Author

Previous articleचले जाव : भारतीय स्वातंत्र्याचा अखेरचा लढा (Quit India – Last Phase of the Struggle)
Next articleविष्णूचे उपासक – वैष्णव संप्रदाय (Sect of Vaishnav – Vishnu’s Worshippers)
शंकर बो-हाडे हे पिंपळगाव, नाशिक येथील 'कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालया'त मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गावात 'साहित्य रसास्वाद' हे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे 'राष्ट्र सेवा दला'चे सैनिक. बो-हाडे नामांतर चळवळीत सत्याग्रह करून शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून जेलमध्ये गेले. ते परिवर्तनवादी, दलित चळवळ व साहित्य याचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार 'जागृति'कार पाळेकर यांच्या साहित्याच्या संशोधनानिमित्ताने मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास केला. ते गेली तीन दशके नाशिकच्या वृत्तपत्रातून लेखन करतात. त्यांनी लिहिलेला, 'ठाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षीय भाषणाची चिकित्सा करणारा लेख विशेष गाजला होता. त्यांची चार स्वतंत्र व दोन संपादित पुस्तके प्रसिध्द आहेत. त्यांची कार्यकर्ता लेखक अशी ओळख आहे. लेखकाचा दूरध्वनी 9226573791

1 COMMENT

  1. Khup chan!!! अश्या गंभीर मुद्द्यांवर, ज्यावर लोकं मोकळ्या पणाने बोलत सुद्धा नाहित अश्या विषय वरचा हा लेख खरचं अप्रतिम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here