लाच (Bribe)

1

निजामूल्मूल्क (निजाम-उल्मुल्क) याचा फिदबी खान नावाचा दिवाण होता. तो इनाम, वतने, सरंजाम, जहागिरी इत्यादी प्रकरणांत सारख्या शिफारसी करत असे. त्यामुळे त्याला चांगलीच प्राप्ती होत असे.

एकदा निजामुल्मुल्क याला शंका आली, की तो पैसे खात असावा. त्याने फिदबी खान याला बोलावून म्हटले, अशा अतिशयोक्तीने भरलेल्या शिफारसी करणे बरे नाही.’

त्यावर फिदबी खान म्हणाला, ‘तुमची कामे काढून घेण्याचे अनेक मार्ग लोक अवलंबतात. बादशहाने पैसे घेतले तर लोक त्याला पेशकश (खंडणी) म्हणतात, वजिराने पैसे घेतले तर त्याला नजर (देणगी) म्हणतात, खानसामाने पैसे घेतले तर त्याला दस्तुर (वहिवाट) म्हणतात, खात्याच्या सचिवांनी पैसे घेतले तर त्याला शुकराना (आभार प्रदर्शन) म्हणतात, कारकूनाने पैसे घेतले तर त्याला तहरीर (मजकूर) म्हणतात, धर्म खात्याच्या प्रमुखाने काही घेतले तर ते मेहराना (कृपा) होय, सरकारी अधिकारी यांनी काही घेतले तर ते जरीन (कांचन) होय, स्वार शिपायांनी घेतले तर ते सजावलाना (दंडेली) होय आणि फिदबी खानाने काही घेतले तर ती रिश्वत (लाच) काय? असे सणसणीत बाणेदार उत्तर करत, तो राजीनामा देऊन मक्केच्या यात्रेला निघून गेला !

(सेतुमाधवराव पगडीलिखित ‘विडा रंगतो असा’मधून उद्धृत, संग्राहक पी.व्ही. वैद्य- अमृत 1965)

———————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version