Home वैभव लऊळचे संत कुर्मदास

लऊळचे संत कुर्मदास

8
carasole

संत कुर्मदास हे पैठणचे. त्यांना हाताचे पंजे आणि पायाला पावले नव्हती, तरी त्यांनी पंढरीच्या वारीचे वेड घेतले. त्यामागे एकनाथांचे आजोबा भानुदास महाराज यांची प्रेरणा होती. कुर्मदास पैठणहून लोटांगण घालत वारीस निघाले. एकादशीला तीन दिवस उरलेले असताना त्यांच्या लक्षात आले, की त्यापुढे त्यांना आयुष्य नाही. त्यांनी जेथे देह ठेवला तेच लऊळ गाव. ते गाव सोलापूरच्या माढा तालुक्यात आहे. संत कुर्मदास जेथे पडले, तेथे विठ्ठल-रुखमाईचे मंदिर असून त्यासमोर कबरीसदृश स्मारक आहे. मात्र महाराजांच्या समाधीचे स्थान स्वतंत्र आहे. ते देऊळ औरंगजेबाने बांधले असे म्हणतात. अर्थात हा चमत्कारच! मात्र त्या समाधी स्थळी सेवेकरी मुस्लिम आहेत. ब्राम्हणांतर्फे पूजा केली जाते आणि मराठ्यांकडे वात लावायची प्रथा आहे. मंदिरात आणि समाधीस्थळी अहर्निश सतत दिवा तेवत ठेवला जातो.

संत कुर्मदास यांच्याबाबत सांगितली जाणारी आख्यायिका अशी, की कुर्मदासांनी त्यांना पंढरपूरला पोचणे शक्य नसल्याचे समजल्यानंतर एका वारक-याच्या हाती विठ्ठलासाठी पत्र दिले. कुर्मदासाचे पत्र विठ्ठलाच्या चरणी पडताच विठाबो उठून कुर्मदासाच्या भेटीसाठी निघाला.

संत कुर्मदास यांच्यासंबंधी माहिती ‘भक्तिविजय’ सोळाव्या अध्यायात मिळते.

मंदिराच्या बाजूला पाठीमागे बांधलेली विहीर असून कितीही दुष्काळ पडला तरी आषाढी वारीच्या वेळी ती विहीर पाण्याने भरलेली असते, असे सांगितले जाते. पंढरीची चंद्रभागा तेथे अवतरते असे समजले जाते.

लऊळ गाव कुर्डूवाडी-पंढरपूर रस्‍त्‍यावर आहे. तेथपर्यंत एस.टी.ने पोचता येते. स्वत:चे वाहन असल्यास कुर्डुवाडीपासून लऊळला जाण्‍यासाठी साधारण एक तास वेळ लागतो.

(माहिती स्रोत – गरूड महाराज – 9960059331)

– रविप्रकाश कुलकर्णी आणि गणेश पोळ

About Post Author

8 COMMENTS

  1. छान माहिती आहे . माहिती
    छान माहिती आहे . माहिती दिल्या बद्दल धन्यवाद….

  2. माहिती छान आहे परंतु खुप
    माहिती छान आहे, परंतु खूप अपूर्ण माहिती आहे.

  3. माहीती ठिक आहे …..पण अपुर्ण
    माहिती ठिक आहे. पण अपूर्ण आहे. आता मंदीरकड़े जनेसाठी रस्ता बनवला आहे सोयी ब-याच झाल्या आहेत. ‘महाराजांनी एका वारक-याला, माझा निरोप विठोबाला सांग, असे तोंडी सांगितले होते. पत्र पाठवल्‍याचे कधी एेकले नव्‍हते.

  4. एखाद्या वेब पोर्टलवर माहिती…
    एखाद्या वेब पोर्टलवर माहिती येणे खूप महत्वाचे आहे. त्यादृष्टीने आपलं काम सुंदर केलेलं आहे आपण, थोडी अजून माहिती मिळवली तर छान होईल. संपर्क केला तरी माहिती देऊ.

Comments are closed.

Exit mobile version