–नरेंद्र पटवारी
एस.टी.महामंडळामधून 2008 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर दीड-दोन वर्षे इकडेतिकडे फिरण्यात घालवले. त्यानंतर दिवस कंटाळवाणे जात होते. तेवढ्यात ‘रयत रुग्णालया’ची ‘प्रशासकीय अधिकारी पाहिजे’ अशी जाहिरात वाचली. म्हणून विचार केला, की बघावा अर्ज करून. माझा दिवस चांगला जाईल व एका सेवाभावी संस्थेमध्ये काम केल्याचे समाधानही मिळेल! रयत आरोग्य मंडळात एक नाव मी ऐकून होतो. ती व्यक्ती होती डॉ.एस.टी.खुरसाळे. खुरसाळे फार कडक आहेत, रागीट आहेत, कोणाला मदत वगैरे करत नाहीत इत्यादी. मी माझा अर्ज घेऊन मुलाखतीसाठी गेलो, इतरही पाच-सहा जण होते.
–नरेंद्र पटवारी
एस.टी.महामंडळामधून 2008 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर दीड-दोन वर्षे इकडेतिकडे फिरण्यात घालवले. त्यानंतर दिवस कंटाळवाणे जात होते. तेवढ्यात ‘रयत रुग्णालया’ची ‘प्रशासकीय अधिकारी पाहिजे’ अशी जाहिरात वाचली. म्हणून विचार केला, की बघावा अर्ज करून. माझा दिवस चांगला जाईल व एका सेवाभावी संस्थेमध्ये काम केल्याचे समाधानही मिळेल! रयत आरोग्य मंडळात एक नाव मी ऐकून होतो. ती व्यक्ती होती डॉ.एस.टी.खुरसाळे. खुरसाळे फार कडक आहेत, रागीट आहेत, कोणाला मदत वगैरे करत नाहीत इत्यादी. मी माझा अर्ज घेऊन मुलाखतीसाठी गेलो, इतरही पाच-सहा जण होते.
मुलाखत घेण्यासाठी खुरसाळे यांच्यासमवेत बोराळकर व के.ए.शेटे हे होते. मुलाखतीनंतर मला सांगण्यात आले, की तुम्हाला एक-दोन दिवसांत कळवू. त्यानंतर खरोखरच, एक-दोन दिवसांनी मला ‘रयत रुग्णालया’तून निरोप आला, की माझी निवड झाली आहे व मला त्वरित हजर व्हायचे आहे! त्याप्रमाणे मी ‘रयत रुग्णालया’त प्रशासकीय अधिकारी या पदावर रुजू झालो. एस.टी.महामंडळातील काम व रयत रुग्णालयातील काम एकदम भिन्न भिन्न स्वरूपाचे होते. तरी-परंतु तेथील सर्व पदाधिकारी, डॉक्टर्स व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे काही दिवसांतच मला कामाचे आकलन झाले व मी कामास सुरुवात केली.
नांदेडमधील काही डॉक्टर्स, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक यांनी एकत्र येऊन गोरगरीब, गरजू रुग्णांसाठी माफक दरात सर्व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘रयत आरोग्य मंडळ’ स्थापन करून ‘कलामंदिर’च्या मागे, जुन्या बी.के.इन लॉजमध्ये भाड्याच्या वास्तूत ‘रयत रुग्णालया’ची मुहूर्तमेढ मे-2005 मध्ये रोवली.
वैद्यकीय उपचार हा गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. इतर ठिकाणी रुग्णाची तपासणी दीडशे ते एकशेवीस रुपये एवढी फी आकारून केली जाते, रयत रुग्णालयात मात्र त्यासाठी केवळ चाळीस रुपये आकारले जातात. या रुग्णालयात इतर रुग्णालयांप्रमाणेच सर्व आवश्यक वैद्यकीय सेवा, सोयी आहेत; दोन ऑपरेशन थिएटर्स, जयपूर फुट विभाग, नेत्रतपासणी विभाग, स्त्रियांच्या आजारासाठी तज्ञ महिला डॉक्टर्स, पॅथॉलॉजिकल टेस्टसाठी अद्ययावत प्रयोगशाळा, डिजिटल एक्सरे मशीन, औषधी विभाग इत्यादी. खुरसाळेसरांच्या रुग्णालयात काम करणार्या डॉक्टर्संना सक्त सूचना आहेत, की आवश्यक तेव्हाच पॅथॉलॉजिकल टेस्ट (गरजेएवढ्याच) करायच्या व योग्य तेवढेच औषध-गोळ्या रुग्णास द्यायच्या.
माझे जावई एका महिन्याच्या सुट्टीसाठी भारतात आले होते, तेव्हा त्यांनी त्यांचा गुडघा दुखत असल्याबाबत मला सांगितले. मी म्हणालो, की खुरसाळेसर हे अस्थितज्ञ आहेत. आपण त्यांच्याकडून वैद्यकीय सल्ला घेऊ. माझ्या जावयांनी त्यांना दुखण्याची कल्पना दिली. त्यानंतर डॉक्टरसाहेबांनी दोन-तीन व्यायाम सांगितले व महिन्याच्या गोळ्या लिहून दिल्या. खुरसाळे यांनी लिहून दिलेली औषधांची चिठ्ठी घेऊन माझे जावई औषधी विभागात गेले व त्यांनी गोळ्यांची मागणी केली. त्यांनी फार्मासिस्टला नेहमीच्या सवयीनुसार पाचशेची नोट दिली. तेव्हा फार्मासिस्ट म्हणाला, ‘सत्तावीस रुपये फक्त. चिल्लर द्या.’ ते ऐकून माझे जावई आश्चर्यचकित झाले. मी त्यांना म्हणालो, हे रयत रुग्णालय आहे. येथे अनावश्यक औषधे-गोळ्या रुग्णांच्या गळी उतरवत नाहीत आणि औषधंदेखील ‘लो-क़ोस्ट’ची असतात.
‘रयत रुग्णालया’मधील त्यांच्या डॉक्टर्स मंडळीची नावे पाहिली तर ही मंडळीपण त्यांच्या विषयातील तज्ञ आहेत. उदा. डॉ.अर्जुन मापारे, डॉ.अरुण रामकृष्ण महाले, डॉ.सुनील माधवराव गायकवाड. डॉ.अवधिया, डॉ.अजय खुरसाळे, डॉ.देवेंद्रसिंग लालासिंग पालीवाल, डॉ.सौ.मंगला देशमुख, डॉ.सौ. मनीषा खुरसाळे, डॉ.विजया अण्णाराव गऊळकर, डॉ.काझीमखाह मोझ माह, डॉ.चिलकेवार, डॉ.सुभाष विश्वनाथप्पा हुरणे इत्यादी. ‘रयत रुग्णालय’ ही सेवाभावी संस्था आहे. त्यासाठी आपलेही योगदान असावे या भावनेपोटी डॉ. हुरणे हे प्रत्येक महिन्यात डोळ्याचे ऑपरेशन झालेल्या एका पेशंटची फी स्वत: देतात.
‘रयत रुग्णालया’त काम करत असताना माझ्या असे लक्षात आले. की या मंडळामध्ये असलेले पदाधिकारी, सदस्य हे रुग्णांचे हित हेच ध्येय डोळ्यांपुढे ठेवून रुग्णालय चालवण्याची कसरत करतात. रयत रुग्णालय सुरू करण्यची मूळ कल्पना एस.टी.खुरसाळे यांची. ते या रुग्णालयाचे चांगले नाव होण्यासाठी या वयातदेखील सतत तनाने व मनाने, वेळेचे भान विसरून काम करतात. त्याचप्रमाणे त्यांच्या साथीला बोराळकर, सुधाकरराव टाक, डॉ. अर्जुन मापारेसर, कमलाकरराव शेटे, एम.आर.जाधव हे पदाधिकारीपण रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजावर बारीक लक्ष ठेवून असतात.
एकदा एका खेड्यातील आजी तिच्या मुलासह व तीन वर्षे वयाच्या नातवासह आली होती. नातू पडल्याने फ्रॅक्चर झाला होता व त्यावर उपचार करणे आवश्यक होते. खुरसाळेसरांनी त्या मुलाच्या वडिलांना कल्पना दिली व प्लास्टर घालण्याचे सांगितले. मुलाचे वडील त्यास तयार होत नव्हते व दोन-चार दिवसांनी परत येतो म्हणून जाण्यास निघाले. मुलावर त्वरित उपचारांची आवश्यकता होती, म्हणून मी व रुग्णालयाचे टेक्निशीयन हनुमंत पापडू यांनी त्या आजीबाईकडे चौकशी केली. त्यांनी पैशांची अडचण असल्याचे सांगितले. आम्ही सदर बाब खुरसाळेसरांच्या कानावर घातली, तेव्हा त्यांनी तात्काळ मुलास अॅडमिट करून घेऊन योग्य ते उपचार केले व त्याची फी व औषधोपचाराचा, प्लॅस्टरचा खर्च घेऊ नये अशा सूचना दिल्या.
संत पाचलेगावकर आश्रमाचे श्री गोविंदगुरू व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीपला अपघात झाल्याचे समजताच सुधाकरराव टाक यांनी ‘रयत रुग्णालया’त फोन करून स्वतंत्र खोली तीन-चार बेडसह तयार ठेवण्याच्या व डोक्टर्संनाही तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या. जखमी परिवारास अॅडमिट करून, त्वरित उपचारांची व्यवस्था करून घेतली. गोविंदगुरू व त्यांचा परिवार रुग्णालयात असेपर्यंत त्यांच्या वैद्यकीय उपचारावर देखरेख ठेवून होते. एवढेच नव्हे तर गोविंदगुरू यांच्या बिलाची रक्कम टाकसरांनी स्वत: भरली.
मिलिटरीतून सेवानिवृत्त झालेले एक वयस्कर अधिकारी त्यांच्या परिवारासह नांदेड येथे गुरुद्वारा दर्शनासाठी आले होते. त्यांच्या पत्नीची प्रकृती अचानक खूपच बिघडली व त्या बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात चार-पाच दिवस राहिल्यानंतर सदर परिवाराने आर्थिक अडचणीमुळे अमृतसर येथे परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना अॅम्ब्युलन्स व इतर वैद्यकीय मदतीसाठी रयत रूग्णालयात चौकशीसाठी पाठवले गेले. मी शेटेसरांना फोनवरून ही माहिती सांगितली. ते त्वरित रुग्णालयात आले. त्यांनी त्या परिवारास अमृतसर येथे जाण्यासाठी सेवानिवृत्त सैनिकांच्या महिलांद्वारे चालवण्यात येणारी रुग्णवाहिका, एक डॉक्टर, एक कंपाऊंडर व दोन चालकांची व्यवस्था उपलब्ध करून दिली.
या घटनांचा उल्लेख करायचे कारण म्हाणजे ‘रयत रुग्णालया’चे सर्व पदाधिकारी रुग्णालयाच्या उत्पन्नास प्राधान्य न देता रुग्णसेवेस प्राधान्य देतात हे वाचकांच्या लक्षात आणून द्यावे, म्हणून .
एवढ्या चांगल्या संस्थेत काम करायची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. तेथे काम करत असताना खुरसाळेसरांशी वारंवार संबंध यायचा, परंतु मला ते चांगले, सहृदय व गरजूंना मदत करणारे, कर्तव्यकठोर गृहस्थ वाटले. मला पूर्वी लोकांनी त्यांच्याबद्दल जे सांगितले तसे काही मला खुरसाळेसर वाटले नाहीत. ‘रयत’चे पदाधिकारी प्रसिद्धीपासून दूर राहून काम करतात.
मला माझ्या कौटुंबिक कारणास्तव दु:खी मनाने ‘रयत’चे काम सोडावे लागले.
– नरेंद्र पटवारी-
(रयत आरोग्य मंडळ रयत आरोग्य पत्रिका’ नावाचे मासिक प्रसिध्द करते. ते माहितीपूर्ण व उदबोधक असते. त्यामधून हा लेख उचलला आहे.)
रयत अरोग्य रुग्णालय- फोन नंबर (02462) 47444
डॉ. सुरेश खुरसाळे – 9422172832
मला तुमच्या कार्याचा अभिमान
मला तुमच्या कार्याचा अभिमान आहे
nitant sundar kam.garju…
nitant sundar kam. garju lokana niramaya arogya uplabdh karun denyache kam tumhi karat aahat.
Comments are closed.